Migdol
हे नावानेही ओळखले जाते: tower
30.0200, 32.3700 गूगल नकाशावर पाहा
Migdol चा उल्लेख असलेली वचने
“इस्राएली लोकांस सांग मागे फिरा आणि पी-हाहीरोथ जवळ, मिग्दोल व समुद्र यांच्यामध्ये, समुद्राजवळ तळ द्या, जो थेट बआल-सफोनासमोर आहे.
त्यांनी एथाम सोडले व बआल-सफोनच्या पूर्वेकडे पी-हाहीरोथ कडे वळले आणि मिग्दोलकडे तळ दिला.
इजिप्तच्या उत्तरेस मिग्दोल, तहपनहेस, व मेम्फीस या शहरात व संबंध दक्षिण इजिप्तमधील पथरोस प्रदेशात राहत असलेल्या यहूद्यांसंबंधी याहवेहचे यिर्मयाहला हे वचन आले:
“इजिप्तमध्ये घोषणा करा, मिग्दोलमध्ये जाहीर करा; मेम्फीस व तहपनहेस या शहरांमध्येही जाहीर करा! ‘चला, सिद्ध व्हा, व मोर्चा बांधा, कारण तुमच्या सभोवतालच्यांना तलवार गिळंकृत करीत आहे.’
म्हणून मी तुझ्याविरुद्ध आणि तुझ्या प्रवाहांच्या विरुद्ध आहे आणि मिग्दोलपासून असवानपर्यंत, अगदी कूशच्या सीमेपर्यंत मी इजिप्त देश ओसाड व वैराण करेन.
“ ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: “ ‘इजिप्तचे मित्रगण पडतील तिचे अहंकारी बळ सुद्धा पडेल. मिग्दोलपासून असवानपर्यंत सर्व तिच्यामध्ये तलवारीने पडतील, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.