Skip to content

Towers बद्दल बायबलमधील वचने

40 वचने · 33 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. मग ते म्हणाले, “आपण स्वतःसाठी एक मोठे शहर आणि आकाशाला भिडणारा अतिउंच बुरूज बांधू म्हणजे आपण प्रसिद्ध होऊ; नाहीतर पृथ्वीतलावर आपली पांगापांग होईल.”

  2. म्हणून त्या शहराला बाबिलोन म्हणतात, कारण याहवेहने मानवांना गोंधळात पाडून अनेक भाषा दिल्या आणि सर्व पृथ्वीभर त्यांची पांगापांग केली.

  3. मग इस्राएल पुढे प्रवास करीत निघाला आणि त्याने एदेरच्या बुरुजापलीकडे आपला तळ दिला.

  4. त्याने पेनुएल येथील बुरूज मोडून टाकला व त्या शहरातील पुरुषांचा संहार केला.

  5. हे ऐकून शेखेमाचे नागरिक जे बुरुजात होते त्यांनी बआल-बरीथच्या मंदिराशेजारी असलेल्या किल्ल्यामध्ये आश्रय घेतला

  6. म्हणून सर्व माणसांनी फांद्या तोडल्या आणि अबीमेलेखाच्या मागे चालले. त्यांनी फांद्यांची रास बुरुजाच्या चहूबाजूंनी लावली आणि लोक आत असता त्याला आग लावली. अशा रीतीने शेखेमाच्या बुरुजामध्ये असलेले सुमारे एक हजार स्त्रीपुरुष मरण पावले.

  7. त्यानंतर अबीमेलेख तेबेस येथे गेला आणि त्याला वेढा दिला आणि ते हस्तगत केले.

  8. त्या शहरात एक मजबूत बुरूज होता, ज्यामध्ये सर्व पुरुष आणि सर्व स्त्रिया—शहरातील सर्व लोक—बुरुजाकडे पळाले. त्यांनी स्वतःला आतमध्ये बंद करून घेतले आणि बुरुजाच्या छतावर चढले.

  9. माझे परमेश्वर माझे खडक आहेत, ज्यांच्या ठायी मी आश्रय घेतो, तेच माझी ढाल आणि माझ्या तारणाचे शिंग आहे. ते माझे गड, माझे शरणस्थान आणि माझे तारणारे आहेत; हिंसक लोकांपासून याहवेह, तुम्ही मला वाचवितात.

  10. “ते आपल्या राजाला महान विजय देतात; ते आपल्या अभिषिक्तावर, दावीदावर आणि त्याच्या वंशजांवरही सर्वदा कृपा करतात.”

  11. येज्रीलच्या बुरुजावर असलेला पहारेकरी येहू व त्याची टोळी येताना पाहून ओरडून म्हणाला, “मला एक टोळी येताना दिसत आहे.” यहोरामाने आदेश दिला, “एका घोडेस्वारास त्यांना भेटण्यास पाठवा, जो त्यांना विचारेल, शांतीने येत आहात ना?”

  12. तो यहूदीयांना म्हणाला, “चला, आपण या गावांची बांधणी करू या आणि त्यांच्याभोवती बुरूज, फाटके आणि गज लावूया. भूमी अजूनही आमची आहे, कारण आम्ही आमचे परमेश्वर याहवेहचा आश्रय घेतला आहे; आम्ही त्यांचा आश्रय घेतला आणि त्यांनी आम्हाला प्रत्येक बाजूंनी विश्रांती दिली आहे.” म्हणून त्यांनी ते बांधले आणि समृद्ध झाले.

  13. उज्जीयाहने यरुशलेममध्ये कोपऱ्याच्या फाटकाजवळ, खोऱ्यांच्या फाटकाजवळ आणि दोन भिंतीच्या कोपऱ्याजवळ बुरूज बांधले आणि त्यांची तटबंदी केली.

  14. त्याने वाळवंटात बुरूजही बांधले आणि पुष्कळ पाण्याच्या टाक्या बांधल्या, कारण त्याच्याकडे डोंगरपायथ्याजवळ आणि मैदानात भरपूर गुरे होती. त्याच्या शेतामध्ये आणि डोंगरामधील द्राक्षमळ्यात आणि उपज देणाऱ्या जमिनीवर काम करणारे लोक त्याच्याकडे होते, कारण त्याला जमिनीची आवड होती.

  15. त्याने यहूदीयाच्या डोंगराळ प्रदेशात नगरे बांधली आणि जंगली भागात किल्ले आणि बुरूज बांधले.

  16. यानंतर हारीमाचा पुत्र मल्कीयाह आणि पहथ-मोआबाचा पुत्र हश्शूब यांनी एका विभागाची आणि भट्टी मनोऱ्याची डागडुजी केली.

  17. नंतर एफ्राईम वेशीपासून येशनाह वेस, मत्स्य वेस आणि हनानेल मनोरा पार करून शंभराचा बुरूजावरून आम्ही मेंढेवेशीपर्यंत गेलो आणि तिथून पुढे द्वारपालाच्या वेशीजवळ जाऊन थांबलो.

  18. याहवेह माझे खडक, माझे दुर्ग आणि मला सोडविणारे; माझे परमेश्वर माझे खडक आहेत, ज्यांच्या ठायी मी आश्रय घेतो, माझी ढाल आणि माझ्या तारणाचे शिंग ते माझे शरणस्थान आहेत.

  19. सीयोनेभोवती फिरा, तिची फेरी मारा, तिचे बुरूज मोजा.

  20. कारण तुम्हीच माझे आश्रयस्थान, शत्रूविरुद्ध उंच बुरूज आहात.

  21. याहवेहचे नाव बळकट दुर्ग आहे; नीतिमान तिकडे धाव घेतात आणि सुरक्षित राहतात.

  22. तुझी मान दावीदाने बांधलेल्या बुरुजाप्रमाणे आहे, जो शिलाकृतीने बांधला आहे; ज्यावर योद्धांच्या एक हजार ढाली लटकलेल्या आहेत.

  23. हस्तिदंती मनोर्‍यासारखी तुझी मान आहे. तुझे नयन बाथ-रब्बीमच्या वेशीकडे असलेल्या हेशबोनाच्या तळ्यासारखे आहे. तुझे नाक जणू काही लबानोन येथील, जे दिमिष्कच्या दिशेला असलेल्या बुरुजासारखे रेखीव आहे.

  24. मी एक भिंत आहे, आणि माझे स्तन बुरुजासारखे आहेत. अशाप्रकारे मी माझ्या प्रियकराच्या नजरेत त्याला समाधान आणणारी झाले आहे.

  25. प्रत्येक भव्य बुरूज, प्रत्येक तटबंदीची भिंत,