Ignorance बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
आता अब्राहाम तिथून दक्षिणेस नेगेव प्रांताकडे गेला आणि त्याने कादेश आणि शूर यांच्या दरम्यान वस्ती केली. काही काळासाठी तो गरार नगरात राहिला,
साराह आपली बहीण असल्याचे अब्राहामाने सांगितले, तेव्हा गरारचा राजा अबीमेलेख याने माणसे पाठवून सारेला आपल्याकडे आणले.
पण एका रात्री परमेश्वर स्वप्नात अबीमेलेखकडे आले आणि त्याला म्हणाले, “आता तुझा अंत झाल्यासारखाच आहे, कारण जी स्त्री तू आणली आहेस, ती विवाहित आहे.”
पण अबीमेलेखाने तिला अद्याप स्पर्श केला नव्हता, म्हणून तो म्हणाला, “प्रभू, तुम्ही एक निरपराधी राष्ट्राचा अंत कराल काय?
खुद्द अब्राहामानेच मला सांगितले नव्हते का की ती माझी बहीण आहे? आणि तिनेही सांगितले नव्हते का तो माझा भाऊ आहे? मी हे शुद्ध हृदयाने आणि शुद्ध हातांनी केले आहे.”
परमेश्वराने त्याला स्वप्नात म्हणाले, “होय, ते मला माहीत आहे; ते तू शुद्ध हृदयाने केले आहे आणि म्हणूनच मी तुला पाप करण्यापासून रोखून धरले आणि तिला स्पर्शही करू दिला नाही.
आता तू तिला आपल्या पतीकडे परत पाठवून दे. तिचा पती माझा संदेष्टा आहे. तो तुझ्यासाठी प्रार्थना करेल, म्हणजे तू जिवंत राहशील; पण जर तू तिला परत पाठविले नाहीस, तर तू आणि तुझे सर्व लोक खात्रीने मरतील.”
याहवेह मोशेला म्हणाले:
“इस्राएली लोकांस सांग की जो कोणी अजाणतेने पाप करून याहवेहच्या नियमानुसार निषिद्ध कृत्ये करत असेल, तर त्याच्यासाठी हे नियम आहेत.”
एखाद्या अभिषिक्त याजकाकडून अजाणतेने घडलेल्या पापामुळे लोकांवर दोष आला, तर पापार्पण म्हणून याहवेहला त्याने एक निर्दोष गोर्हा अर्पण करावा.
त्याने तो गोर्हा सभामंडपाच्या दाराशी आणून त्याच्या मस्तकावर आपला हात ठेवावा व याहवेहसमोर त्याचा वध करावा.
मग अभिषिक्त याजकाने त्या गोर्ह्याचे थोडे रक्त सभामंडपामध्ये नेऊन त्यात आपली बोटे बुडवून
याजकाने पवित्रस्थान वेगळे करणार्या पडद्यासमोर याहवेहपुढे सात वेळा शिंपडावे.
नंतर याजकाने त्यातील काही रक्त घेऊन याहवेहसमोर सभामंडपातील धूपवेदीच्या शिंगांना लावावे व गोर्ह्याचे उरलेले सर्व रक्त त्याने सभामंडपातील दाराशी असलेल्या होमार्पणाच्या वेदीच्या पायथ्याजवळ ओतावे.
नंतर पापार्पणाच्या गोर्ह्याची सर्व चरबी, म्हणजे आतड्यांवरील चरबी, त्यास लागून असलेली सर्व चरबी,
दोन गुरदे व त्यावरील कंबरेजवळची चरबी व काळीज काढून त्यांचे वेदीवर होमार्पण करावे.
शांत्यर्पणाच्या यज्ञात जसे गोर्ह्याचे भाग काढून घेतात तसे ते वेगळे काढून याजकाने त्यांचे होमवेदीवर होम करावे.
परंतु त्या गोर्ह्याची कातडी आणि त्याचे सर्व मांस तसेच डोके आणि पाय, आतील अवयव आणि आतडी,
त्या गोर्ह्याचे राहिलेले सर्व भाग, छावणीबाहेरील विधिपूर्वक स्वच्छ केलेल्या ठिकाणी, राख टाकण्याच्या जागेवर नेऊन लाकडांच्या विस्तवावर जाळून टाकावेत.
जर संपूर्ण इस्राएली लोकांकडून अजाणतेने पाप घडले, आणि याहवेहनी निषिद्ध केलेल्यापैकी एखादी गोष्ट केली, ते केलेले जरी समुदायाला माहीत नसेल, पण जेव्हा त्यांना त्यांची चूक समजून येईल,
आणि त्यांनी केलेले पाप सर्वांना माहीत होईल, तेव्हा त्या समुदायाने पापार्पण म्हणून एक गोर्हा आणावा आणि सभामंडपासमोर अर्पण करावा.
तिथे इस्राएली समुदायातील पुढार्यांनी याहवेहसमोर त्यांचे हात त्या गोर्ह्याच्या मस्तकावर ठेवावेत, व याहवेहसमोर त्या गोर्ह्याचा वध करावा.
नंतर अभिषिक्त याजकाने त्या गोर्ह्याचे काही रक्त सभामंडपात घेऊन जावे.
याजकाने त्याची बोटे त्यात बुडवून याहवेहसमोर पडद्यापुढे ते सात वेळा शिंपडावे.
त्यातील काही रक्त घेऊन ते याहवेहपुढे सभामंडपातील वेदीच्या शिंगांना लावावे व राहिलेले सर्व रक्त सभामंडपाच्या प्रवेशद्वाराकडे असलेल्या होमार्पणाच्या वेदीच्या पायथ्याशी ओतावे.