Gideon बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
तेव्हा याहवेहच्या दूताने आपल्या हातातील काठीने त्या मांसास व बेखमीर भाकरीस स्पर्श केला, त्याबरोबर खडकातून अग्नी निघाला व त्या अग्नीने ते मांस व त्या भाकरी भस्म करून टाकल्या. आणि याहवेहचा तो दूत एकाएकी अंतर्धान पावला.
जेव्हा गिदोनाच्या लक्षात आले की तो खरोखर याहवेहचा दूत होता, तेव्हा तो मोठ्याने म्हणाला, “अरेरे, अहो सार्वभौम याहवेह! मी तर मरणार, कारण मी याहवेहच्या दूताला समोरासमोर पाहिले आहे!”
परंतु याहवेहने त्याला उत्तर दिले, “शांती असो! भिऊ नकोस. तू मरणार नाहीस.”
म्हणून गिदोनाने तिथे याहवेहसाठी एक वेदी बांधली आणि तिला याहवेह शालोम, याहवेह शांती देतात असे नाव दिले. ही वेदी अद्यापही अबियेजरीकरांच्या मुलुखातील ओफराह या गावी आहे.
त्याच रात्री याहवेहने त्याला म्हटले, “वडिलांच्या कळपातील उत्तम सात वर्षांचा दुसरा गोर्हा घे. तुझ्या पित्याची बआल दैवताची वेदी पाडून टाक आणि तिच्याजवळ असणार्या अशेरा देवीचा खांब तोडून टाक.
नंतर या उंचवट्यावर याहवेह तुमच्या परमेश्वरासाठी योग्य प्रकारची वेदी बांधा. तू तोडलेल्या अशेरा खांबाच्या लाकडाचा वापर करून, होमार्पण म्हणून दुसरा गोर्हा अर्पण कर.”
यास्तव गिदोनाने आपल्या नोकरांपैकी दहा नोकर बरोबर घेतले आणि याहवेहने आज्ञा केल्याप्रमाणे सर्वकाही केले. परंतु आपल्या पित्याच्या परिवारातील माणसांच्या व गावातील लोकांच्या भीतीने त्याने ते हवन दिवसाच्या ऐवजी रात्री केले.
त्यानंतर लवकरच मिद्यानी, अमालेकी आणि इतर पूर्वेकडील शेजारी राष्ट्रांची सैन्ये एकत्रित झाली. त्यांनी यार्देन पार केली व येज्रीलच्या खोर्यात तळ दिला.
तेव्हा याहवेहचा आत्मा गिदोनावर आला आणि त्याने रणशिंग फुंकले; अबिएजेरी लोक त्याच्याकडे आले.
त्याने मनश्शेह, आशेर, जबुलून आणि नफतालीकडे दूत पाठवून त्यांच्या सैन्यांना येण्याचे आव्हान केले व त्या सर्वांनी त्याला साथ दिली.
गिदोन परमेश्वराला म्हणाला, “जर तुम्ही इस्राएलला दिलेल्या अभिवचनाप्रमाणे माझ्या हातांनी वाचवाल—
पाहा, तर आज रात्री खळ्यात मी लोकर ठेवेन आणि सकाळी लोकर तेवढी दवाने ओली असावी, परंतु सभोवतालची जमीन कोरडी असे आढळून आले, तर मी समजेन की तुम्ही इस्राएलला वाचविण्यासाठी मला मदत कराल.”
आणि अगदी तसेच घडून आले. दुसर्या दिवशी सकाळी गिदोन उठला; त्याने ती लोकर दाबली आणि तिच्यातील दहिवर पिळले—एक वाटीभर पाणी काढले.
नंतर गिदोन परमेश्वराला म्हणाला, “कृपा करून माझ्यावर रागावू नका. मला पुन्हा आणखी एक वेळ विनंती करू द्या. मला पुन्हा एकदा परीक्षा घेऊ द्या, परंतु यावेळी ती लोकर कोरडी असू द्या आणि पूर्ण भूमी दवबिंदूने झाकून टाका.”
त्या रात्री परमेश्वराने तसेच केले. त्या रात्री लोकर कोरडी राहिली, परंतु जमीन दहिवराने आच्छादून गेली.
आता एफ्राईमचे लोक गिदोनाला म्हणाले, “तू आमच्याशी असा का वागला? जेव्हा तू मिद्यानी लोकांशी युद्ध करावयास गेला तर आम्हाला का बोलाविले नाही?” आणि त्यांनी रागात गिदोनासह वाद घातला.
परंतु त्याने त्यांना उत्तर दिले, “तुमच्या तुलनेत मी काय साध्य केले आहे? एफ्राईमच्या द्राक्षांचा सरवा हा अबिएजेराच्या द्राक्षाच्या पूर्ण कापणीपेक्षा चांगला नाही काय?
परमेश्वराने ओरेब व जेब मिद्यानी पुढारी तुमच्या हातात दिले. तुमच्या तुलनेने मी काय केले आहे?” असे बोलल्यानंतर त्यांचा त्याच्यावरचा राग शांत झाला.
मग गिदोन आणि त्याचे तीनशे लोक थकून गेलेले होते तरीही ते त्यांचा पाठलाग करीत यार्देन किनारी आले आणि पलीकडे गेले.
तो सुक्कोथ येथील लोकांना म्हणाला, “मी तुम्हाला विनंती करतो की, माझ्याबरोबरच्या लोकांना काही भाकरी द्या; कारण ते फार थकले आहेत आणि मी मिद्यानी लोकांचे राजे जेबह व सलमुन्नाचा आताही पाठलाग करीत आहे.”
परंतु सुक्कोथाचे अधिकारी म्हणाले, “आता तुझ्या हातात जेबह व सलमुन्नाचे हात आहेत का? मग आम्ही तुझ्या सैन्याला भाकरी का द्यावी?”
त्यावर गिदोन म्हणाला, “याहवेह जेव्हा जेबह व सलमुन्नाला माझ्या हाती देतील, तेव्हा मी रानातील काटे व काटेरी झुडपांनी तुमच्या शरीराचे मांस फाडेन.”
मग तो तिथून पेनुएल येथे गेला आणि तिथेही त्याने तीच विनंती केली, पण त्यांनी देखील सुक्कोथ येथील लोकांप्रमाणे उत्तर दिले.
म्हणून तो पेनुएलच्या लोकांना म्हणाला, “मी सुरक्षित परत येईन, तेव्हा हा बुरूज पाडून टाकेन.”
आता जेबह राजा व सलमुन्ना राजा आपल्या उरलेल्या पंधरा हजार सैनिकांसह कर्कोर येथे पोहोचले होते, पूर्वेकडील देशांच्या मित्र सेनांपैकी तेवढेच सैनिक उरले होते; कारण त्यांचे एक लाख वीस हजार सैनिक आधीच ठार झालेले होते.