Gideon बद्दल बायबलमधील वचने: Makes an ephod which becomes a snare to the Israelites
Makes an ephod which becomes a snare to the Israelites बद्दल वचने
आणि गिदोन म्हणाला, “माझी एक विनंती आहे, तुमच्यापैकी प्रत्येकाने आपल्या लुटीतील एक कुंडले मला द्यावे.” (सोन्याची कुंडले घालण्याची इश्माएली लोकांची प्रथा होती.)
त्यांनी उत्तर दिले, “आम्हाला ते देण्यास आनंद होईल.” म्हणून त्यांनी एक वस्त्रे पसरले आणि त्यांच्यातील प्रत्येकाने आपल्या लुटीतील एकेक कुंडले तिथे टाकली.
त्याने मागितलेल्या कुंडलांचे वजन एक हजार सातशे शेकेल, याखेरीज त्याला चंद्रकोरी, लोलक, मिद्यानी राजांची जांभळी वस्त्रे व उंटांच्या गळ्यातील साखळ्याही मिळाल्या.
गिदोनाने त्या सोन्याचे एक एफोद करून आपले नगर ओफराह येथे ठेवले. सर्व इस्राएली लोकांनी त्याची उपासना करून व्यभिचार केला आणि ते गिदोन आणि त्याच्या कुटुंबासाठी पाश असे झाले.