Skip to content

Ner

14 वचने · 12 कुटुंब सदस्य

Ner चा उल्लेख असलेली वचने

  1. त्याच्या पत्नीचे नाव अहीनोअम होते, ती अहीमाजची कन्या होती. शौलाचा सेनापती, नेरचा पुत्र अबनेर होता आणि नेर शौलाचा काका होता.

  2. शौलाचा पिता कीश व अबनेरचा पिता नेर अबीएलचे पुत्र होते.

  3. नंतर दावीद बाहेर पडला आणि ज्या ठिकाणी शौलाने छावणी टाकली होती तिथे गेला. त्याने पाहिले शौल, नेराचा पुत्र अबनेर, सैन्याचा सेनापती झोपले होते. शौल छावणीच्या आतील बाजूस झोपला होता, त्याच्याभोवती सैन्याचा पहारा होता.

  4. दावीदाने सैन्याला आणि नेरचा पुत्र अबनेर यांना मोठ्याने विचारले, “अबनेर, तू मला उत्तर देणार नाहीस काय?” अबनेरने उत्तर दिले, “तू कोण आहेस, राजाला कोण हाक मारत आहे?”

  5. त्या दरम्यान, शौलाचा सेनापती नेरचा पुत्र अबनेरने शौलाचा पुत्र इश-बोशेथला महनाईम येथे आणले.

  6. नेरचा पुत्र अबनेर शौलाचा पुत्र इश-बोशेथच्या माणसांबरोबर एकत्र येऊन महनाईम सोडून गिबोनकडे गेले.

  7. जेव्हा योआब आणि त्याच्या बरोबरचे सर्व सैनिक आले तेव्हा त्याला सांगितले गेले की, नेराचा पुत्र अबनेर राजाकडे आला होता आणि राजाने त्याला परत पाठवून दिले आणि तो शांतीने गेला होता.

  8. आपणास नेराचा पुत्र अबनेर कसा आहे हे माहीत आहे; तो आपणास फसवायला आणि आपल्या हालचाली पाहण्यासाठी आणि आपण जे करता त्याचा अंदाज घेण्यासाठी आला होता.”

  9. नंतर जेव्हा दावीदाने याबद्दल ऐकले, तो म्हणाला, “मी आणि माझे राज्य नेराचा पुत्र अबनेर याच्या रक्ताबाबतीत याहवेहसमोर निर्दोष आहोत.

  10. त्या दिवशी तिथे असलेल्या सर्व लोकांना आणि सर्व इस्राएलला लक्षात आले की, नेराचा पुत्र अबनेर याला ठार मारण्यात राजाचा काही भाग नव्हता.

  11. “तर तू स्वतः समजून घे की जेरुइयाहचा पुत्र योआब माझ्याशी कसा वागला; इस्राएलच्या सैन्याचे दोन सेनापती, नेरचा पुत्र अबनेर आणि येथेरचा पुत्र अमासा यांना त्याने काय केले. त्याने त्यांना जसे युद्धकाळात मारावे तसे शांतीच्या काळात जिवे मारले आणि त्या रक्ताने त्याचा कंबरपट्टा आणि पायतणे डागाळली आहेत.

  12. त्याने केलेल्या रक्तपाताबद्दल याहवेह त्याची परतफेड करतील, कारण माझे पिता दावीदच्या नकळत त्याने दोन माणसांवर हल्ला केला आणि त्यांना तलवारीने ठार केले. ते दोघेजण; इस्राएलच्या सैन्याचा सेनापती नेरचा पुत्र अबनेर आणि यहूदीयाच्या सैन्याचा सेनापती येथेरचा पुत्र अमासा; हे योआबापेक्षा अधिक चांगले आणि सरळ होते.

  13. त्याच्या पुत्रांची नावे अशी: ज्येष्ठ अब्दोन, मग सूर, कीश, बाल, नेर, नादाब,

  14. शमुवेल संदेष्टा, कीशाचा पुत्र शौल, नेराचा पुत्र अबनेर आणि जेरुइयाहचा पुत्र योआब यांनी अर्पण केलेले सर्वकाही आणि इतर अर्पणे सांभाळण्याची जबाबदारी शेलोमीथ आणि त्याच्या नातेवाईकांवर टाकण्यात आली.)