मुख्य मजकुरावर जा

Manasseh

109 वचने · 6 कुटुंब सदस्य

हे नावानेही ओळखले जाते: Manasses

Manasseh चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. दक्षिणेकडील प्रदेश एफ्राईमच्या मालकीचा होता व उत्तरेकडे असलेली शहरे मनश्शेहची होती. मनश्शेहची सीमा भूमध्य समुद्रापर्यंत होती आणि त्याच्या उत्तरेकडे आशेर व पूर्वेकडे इस्साखार आहेत.

  2. इस्साखार आणि आशेरच्या प्रदेशात बेथ-शान, इब्लाम आणि दोर येथील लोक, एनदोर, तानख, आणि मगिद्दो त्यांच्या जवळच्या वसाहतीसह मनश्शेहचे होते (यादीतील तिसरे नगर नाफोथ होते).

  3. तरीही मनश्शेहचे वंशज त्या नगरांमध्ये राहू शकत नव्हते, कारण कनानी लोकांनी त्यात राहण्याचा अट्टाहास केला होता.

  4. परंतु यहोशुआ योसेफाच्या गोत्राचे एफ्राईम आणि मनश्शेहला म्हणाला; “तुम्ही संख्येने पुष्कळ आणि बलवान आहात. तुम्हाला केवळ एकच भाग नसावा

  5. तथापि लेवी वंशास तुमच्यामध्ये भाग मिळणार नाही, कारण याहवेहची याजकीय सेवा हेच त्यांचे वतन आहे. गाद, रऊबेन आणि मनश्शेहच्या अर्ध्या गोत्राला आधी त्यांचे वतन यार्देनेच्या पूर्वेकडे मिळाले आहे. याहवेहचे सेवक मोशेने ते त्यांना दिले आहे.”

  6. यार्देनेच्या पूर्वेकडे (यरीहोच्या पलीकडे) त्यांनी रऊबेन गोत्राच्या पठारावरील रानात असलेले बेसेर, गाद गोत्राच्या प्रदेशातील गिलआदातील रामोथ; आणि मनश्शेहच्या गोत्राच्या प्रदेशातील बाशानातील गोलान ही आश्रयस्थाने म्हणून वेगळी केली.

  7. बाकीच्या कोहाथी वंशजांना एफ्राईम, दान व मनश्शेहचा अर्धा वंश या गोत्रांच्या प्रदेशातील दहा नगरे चिठ्ठ्या टाकून देण्यात आली.

  8. गेर्षोनाच्या वंशजांना इस्साखार, आशेर, नफताली व बाशानातील मनश्शेहच्या अर्धा वंशाच्या गोत्रातील कुळांच्या वतनातून तेरा नगरे देण्यात आली.

  9. मनश्शेहच्या अर्ध्या गोत्राकडून: तानख व गथ-रिम्मोन त्यांच्या कुरणासह ही दोन नगरे.

  10. लेवी कुळातील गेर्षोनाच्या गोत्राला: मनश्शेहच्या अर्ध्या गोत्राकडून: बाशानातील गोलान (हत्येचा आरोप असलेल्या व्यक्तीसाठी आश्रय शहर) व बीशतेराह त्यांच्या कुरणासह ही दोन नगरे देण्यात आली.

  11. नंतर यहोशुआने रऊबेन, गाद व मनश्शेहचे अर्धे गोत्र यांना बोलाविले

  12. (मनश्शेहच्या अर्ध्या गोत्राला मोशेने बाशान प्रदेशात वतन दिले होते, तर यहोशुआने त्यांच्या दुसर्‍या अर्ध्या गोत्राला त्यांच्या सहइस्राएली लोकांबरोबर यार्देनेच्या पश्चिमेस वतन दिले होते.) जेव्हा यहोशुआने त्यांना घरी पाठवले, तेव्हा त्याने त्यांना आशीर्वाद दिला आणि तो म्हणाला,

  13. तेव्हा रऊबेनचे गोत्र, गादचे गोत्र आणि मनश्शेहच्या अर्ध्या गोत्रांनी गिलआद, जो प्रदेश त्यांना याहवेहच्या आज्ञेनुसार मोशेकडून मिळाला होता, त्याकडे परत जाताना कनानातील शिलोह येथे इस्राएली लोकांचा निरोप घेतला.

  14. जेव्हा ते कनान देशातील यार्देन जवळील गलीलोथ येथे आले तेव्हा रऊबेन, गाद आणि मनश्शेहच्या अर्ध्या गोत्रांनी यार्देनजवळ एक खूप मोठी वेदी बांधली.

  15. आणि त्यांनी कनान देशाच्या सीमेवर यार्देन नदीजवळ जी इस्राएली लोकांची बाजू होती त्या गलीलोथ येथे रऊबेन, गाद आणि मनश्शेहच्या अर्ध्या गोत्रांनी मोठी वेदी बांधली आहे असे जेव्हा इस्राएली लोकांनी ऐकले,

  16. म्हणून इस्राएली लोकांनी एलअज़ार याजकाचा पुत्र फिनहासला गिलआदाच्या प्रदेशाकडे रऊबेन, गाद व मनश्शेहच्या अर्ध्या गोत्राकडे पाठविले.

  17. जेव्हा ते गिलआद येथे रऊबेन, गाद, आणि मनश्शेहच्या अर्ध्या गोत्राकडे गेले; आणि त्यांना म्हणाले:

  18. तेव्हा रऊबेन, गाद व मनश्शेहच्या अर्ध्या गोत्रांनी इस्राएलच्या कुटुंबप्रमुखांना उत्तर दिले:

  19. जेव्हा फिनहास याजक आणि समाजाचे पुढारी; इस्राएलच्या कुळांच्या कुटुंबप्रमुखांनी रऊबेन, गाद व मनश्शेहच्या अर्ध्या गोत्रांना जे म्हणायचे होते ते ऐकले, तेव्हा त्यांचे समाधान झाले.

  20. मग एलअज़ार याजकाचा पुत्र फिनहासने रऊबेन, गाद आणि मनश्शेहला उत्तर दिले, “आज आमची खात्री झाली आहे की, याहवेह आमच्याबरोबर आहेत, कारण तुम्ही वेदी बांधण्याबाबतीत याहवेहशी अविश्वासू राहिला नाहीत. तुम्ही इस्राएली लोकांना याहवेहच्या हातातून वाचविले आहे.”

  21. परंतु मनश्शेहने बेथ-शान, तानख, दोर, इब्लाम किंवा मगिद्दो आणि त्यांच्या आसपासच्या लोकांना घालविले नाही, कारण कनानी लोकांनी त्या देशात राहण्याचा निश्चय केला होता.

  22. गिदोनाने उत्तर दिले, “महाराज, मला माफ करा, मी इस्राएली लोकांना कसा काय सोडविणार? माझे कुटुंब संपूर्ण मनश्शेह गोत्रातील अत्यंत दुर्बल असे कुटुंब आहे आणि माझ्या पूर्ण कुटुंबात मला अत्यंत कनिष्ठ समजले जाते.”

  23. त्याने मनश्शेह, आशेर, जबुलून आणि नफतालीकडे दूत पाठवून त्यांच्या सैन्यांना येण्याचे आव्हान केले व त्या सर्वांनी त्याला साथ दिली.

  24. तेव्हा नफताली, आशेर व मनश्शेहमधील इस्राएली लोकांना बोलाविले गेले आणि त्यांनी मिद्यान्यांचा पाठलाग केला.

  25. मग याहवेहचा आत्मा इफ्ताहावर आला. तो गिलआद व मनश्शेह पार करून गिलआदाच्या मिस्पेह येथे गेला आणि तिथून त्याने अम्मोनी लोकांवर आक्रमण केले.