Dinah
Dinah चा उल्लेख असलेली वचने
काही वेळेनंतर तिने एका कन्येला जन्म दिला आणि तिचे नाव दीना असे ठेवले.
एके दिवशी याकोबापासून झालेली लेआची कन्या दीना त्या देशातील मुलींना भेटावयास गेली.
याकोबाची मुलगी दीना हिच्यावर त्याचे हृदय आकर्षित झाले; त्याने त्या तरुण स्त्रीवर प्रेम केले आणि तो कोमलतेने तिच्याशी बोलला.
आपली कन्या दीना हिला शेखेमने भ्रष्ट केले आहे हे याकोबाने ऐकले त्यावेळी त्याचे पुत्र रानात गुरांबरोबर होते; म्हणून ते घरी परत येईपर्यंत त्याने त्याबाबत काहीही केले नाही.
आपली बहीण दीना हिला शेखेमने भ्रष्ट केले म्हणून याकोबाच्या पुत्रांनी शेखेम आणि त्याचा पिता हमोर यांच्याशी मनात कपट धरून बोलणी केली.
परंतु तीन दिवसानंतर, त्यांच्या जखमांमुळे ते वेदनेत असताना, याकोबाच्या पुत्रांपैकी दीनाचे दोन भाऊ शिमओन व लेवी, यांनी आपल्या हाती तलवारी घेतल्या, ते बेसावध असलेल्या शहरात शिरले आणि त्यांनी तेथील प्रत्येक पुरुषाची कत्तल केली.
हमोर आणि शेखेम यांचीही त्यांनी तलवारीने कत्तल केली. त्यांनी दीनाची शेखेमाच्या घरातून सुटका केली आणि तिला घेऊन ते परत आले.
म्हणजे याकोब आणि लेआ यांची सर्व संतती मिळून तेहतीस होती. यातच त्यांना पद्दन-अराम येथे झालेली कन्या दीना हिचाही समावेश आहे.