Skip to content

Vengeance बद्दल बायबलमधील वचने

14 वचने · 2 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. म्हणून हमोर आणि शेखेम यांनी त्या शहरातील वेशीकडे जाऊन लोकांपुढे सुंतेची ही सूचना मांडली.

  2. ते म्हणाले, “हे लोक आपले मित्र आहेत. त्यांना आपण आपल्यात राहण्याचे आमंत्रण देऊ आणि व्यापार करण्यास परवानगी देऊ; कारण आपला देश त्यांनाही पुरेल इतका मोठा असून त्यांना येथे सहज राहता येईल आणि त्यांच्या मुली आपण स्त्रिया करून घेऊ आणि आपण आपल्या मुली त्यांना देऊ.

  3. परंतु ते लोक आपल्यात राहून राष्ट्राशी एकरूप होण्यास एकाच अटीवर तयार आहेत. ती अट म्हणजे आपल्यातील प्रत्येक पुरुषाने त्यांच्याप्रमाणेच स्वतःची सुंता करून घेतली पाहिजे.

  4. तेव्हा त्यांची ही अट आपण मान्य करू या, म्हणजे ते आपल्यामध्ये वस्ती करतील. आपण हे केले तर त्यांची शेरडेमेंढरे, गुरे व मालमत्ता ते सर्व आपले होणार नाही का?”

  5. हमोर आणि शेखेम यांच्या या गोष्टीला सर्व पुरुषांनी मान्यता दिली. ते त्या नगराच्या वेशीबाहेर आले आणि त्या सर्वांची सुंता करण्यात आली.

  6. परंतु तीन दिवसानंतर, त्यांच्या जखमांमुळे ते वेदनेत असताना, याकोबाच्या पुत्रांपैकी दीनाचे दोन भाऊ शिमओन व लेवी, यांनी आपल्या हाती तलवारी घेतल्या, ते बेसावध असलेल्या शहरात शिरले आणि त्यांनी तेथील प्रत्येक पुरुषाची कत्तल केली.

  7. हमोर आणि शेखेम यांचीही त्यांनी तलवारीने कत्तल केली. त्यांनी दीनाची शेखेमाच्या घरातून सुटका केली आणि तिला घेऊन ते परत आले.

  8. यानंतर याकोबाचे सर्व पुत्र शहरात गेले आणि त्यांनी ते संपूर्ण शहर लुटले, जिथे त्यांच्या बहिणीला भ्रष्ट केले होते.

  9. त्यांनी त्यांचे कळप, गुरे, गाढवे आणि त्यांच्या नगरात व शेतात असलेले सर्वकाही त्यांनी नेले.

  10. तसेच त्यांच्या घरातील सर्व संपत्ती आणि त्यांच्या सर्व स्त्रिया व लेकरे, त्यांना जे काही घरात सापडले ते सर्व त्यांनी लुटले.

  11. तेव्हा याकोब, शिमओन व लेवी यांना म्हणाला, “या भूमीतील सर्व कनानी व परिज्जी लोकांना माझी किळस येईल असे वर्तन तुम्ही केले आहे. आपण अगदी थोडके आहोत; ते आपल्यावर चालून येतील आणि आपल्याला चिरडून टाकतील व आपण सर्वजण मारले जाऊ.”

  12. यावर त्यांनी प्रत्युत्तर केले, “त्याने आमच्या बहिणीशी एखाद्या वेश्येप्रमाणे व्यवहार करावा काय?”

  13. याहवेह, सूड घेणारे परमेश्वर आहेत, हे सूड घेणारे याहवेह, प्रज्वलित व्हा.

  14. माझ्या प्रिय मित्रांनो, सूड उगवू नका. तर परमेश्वराच्या क्रोधाला वाट द्या, असे लिहिले आहे: “सूड घेणे मजकडे आहे; मी परतफेड करेन,” असे प्रभू म्हणतात.