मुख्य मजकुरावर जा

Solomon

275 वचने · 27 कुटुंब सदस्य

हे नावानेही ओळखले जाते: Jedidiah

Solomon चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. दावीद आणि त्याचा पुत्र शलोमोनाने घालून दिलेल्या नियमांप्रमाणे परमेश्वराच्या उपासनेत आणि शुद्धीकरणविधीमध्ये गायक व द्वारपाल हे सहकार्य करीत होते.

  2. शलोमोन राजा अशाच प्रकारच्या गोष्टींनी पापमग्न झाला नव्हता काय? त्याच्याशी तुलना करता येईल असा दुसरा राजा अनेक राष्ट्रांमध्ये नव्हता आणि परमेश्वराने त्याच्यावर प्रीती केली व त्याला संपूर्ण इस्राएलचा राजा केले. असे असूनही त्याला यहूदीतर स्त्रियांनी पापाकडे वळविले.

  3. शलोमोनाची गीत रचना हे परमेश्वरा, राजाला न्यायदातृत्व आणि राजपुत्रास नीतिमत्व प्रदान करा.

  4. प्रवाशांचे एक आराधना गीत. शलोमोनाची रचना. याहवेहने घर बांधले नाही, तर बांधकाम करणार्‍यांचे श्रम व्यर्थ आहेत; याहवेहने शहराचे रक्षण केले नाही, तर पहारेकर्‍यांचे जागणे व्यर्थ आहे.

  5. इस्राएलचा राजा दावीदाचा पुत्र शलोमोनाची नीतिसूत्रे:

  6. शलोमोनाची नीतिसूत्रे: शहाणा मुलगा त्याच्या पित्याला सुखी करतो, परंतु मूर्ख मुलगा त्याच्या आईला दुःख देतो.

  7. यहूदीयाचा राजा हिज्कीयाहच्या सहकार्‍यांनी संग्रहित केलेली, शलोमोन राजाची ही आणखी काही नीतिवचने आहेत:

  8. हे गीतरत्न, शलोमोनाची रचना.

  9. अहो यरुशलेमच्या कन्यांनो, मी सावळी असूनही सुंदर आहे, केदारच्या काळ्या तंबूसारखी, शलोमोनच्या डेर्‍याच्या पडद्यासारखी.

  10. पाहा! ही तर शलोमोनाची पालखी आहे! इस्राएलातील निवडलेल्या साठ योद्ध्याच्या दलाच्या पहाऱ्यात आलेली आहे.

  11. शलोमोन राजाने लबानोनाच्या लाकडाची ही पालखी; स्वतःसाठी बनविली आहे.

  12. अहो सीयोनच्या कन्यांनो, बाहेर या आणि पाहा, शलोमोन राजा कसा मुकुटमंडित आहे ते पाहा, त्याच्या विवाहाच्या दिवशी त्याच्या आईने त्याला तो घातला आहे, त्याचे हृदय आनंदित झाले तो हा दिवस.

  13. बआल-हामोन येथे शलोमोनचा एक द्राक्षमळा होता; तो त्याने तेथील कुळांना खंडाने दिला. त्याचे फळ म्हणून प्रत्येकाने हजार चांदीची शेकेल द्यायची होती.

  14. परंतु माझ्याकडे स्वतःचा द्राक्षमळा आहे; शलोमोन, हजार शेकेल तुझीच आहेत, आणि मळ्याची देखरेख करणार्‍यांना मी दोनशे नाणी देईन.

  15. याहवेहच्या मंदिरासाठी शलोमोन राजाने तयार केलेले दोन खांब, मोठी टाकी व त्याखालील बारा बैल आणि बैठकी यांचे वजन करणे कठीण होते.

  16. इशाय दावीद राजाचा पिता, दावीद शलोमोनाचा पिता, शलोमोनाची आई पूर्वी उरीयाहची पत्नी होती,

  17. शलोमोन रहबामाचा पिता, रहबाम अबीयाचा पिता, अबीया आसाचा पिता,

  18. तरी मी तुम्हाला सांगतो की शलोमोनदेखील आपल्या सर्व वैभवात त्यांच्याइतका नटला नव्हता.

  19. दक्षिणेची राणी न्यायकाळी या पिढीबरोबर उठेल आणि त्यांना दंडपात्र ठरवेल, कारण ती शलोमोनाचे ज्ञान ऐकण्यास पृथ्वीच्या टोकाकडून आली; आणि पाहा, आता तर शलोमोनापेक्षा थोर असा कोणी येथे आहे.

  20. दक्षिणेची राणी न्यायकाळी या पिढीच्या लोकांबरोबर उठेल आणि त्यांना दंडपात्र ठरवेल, कारण ती शलोमोनाचे ज्ञान ऐकण्यास पृथ्वीच्या टोकाकडून आली; आणि आता तर शलोमोनापेक्षा थोर असा कोणी येथे आहे.

  21. “रानातील फुले कशी वाढतात याचा विचार करा. ती कष्ट करीत नाहीत किंवा कातीत नाहीत. तरी मी तुम्हाला सांगतो की शलोमोनदेखील आपल्या सर्व वैभवात त्यांच्याइतका नटला नव्हता.

  22. आणि येशू मंदिराच्या परिसरामध्ये असलेल्या शलोमोनच्या अंगणामध्ये फिरत होते.

  23. मग तो पेत्र व योहान यांना बिलगून राहिला असता, सर्व लोक फार आश्चर्यचकित होऊन शलोमोनाच्या देवडीकडे धावत आले.

  24. प्रेषित लोकांमध्ये अनेक चिन्हे व अद्भुत कृत्ये करीत होते आणि सर्व विश्वासणारे एकत्रितपणे शलोमोनाच्या देवडीत जमत असत,

  25. परंतु तो शलोमोन होता ज्याने परमेश्वरासाठी भवन बांधले.