Skip to content

Treaty बद्दल बायबलमधील वचने

40 वचने · 4 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. ज्या देशात तुम्ही जात आहात त्यात राहत असलेल्या लोकांशी करार करू नये याविषयी सावध असा, नाहीतर ते तुमच्यासाठी पाश असे होतील.

  2. “त्या देशात राहत असलेल्या लोकांशी करार करू नये याविषयी सावध असा; कारण ते जेव्हा त्यांच्या दैवतांशी व्यभिचार करतात आणि त्यांना यज्ञ करतात, ते तुम्हाला आमंत्रित करतील आणि तुम्ही त्यांच्या यज्ञार्पणातील अन्न खाल.

  3. रात्री ते हेर झोपी जाण्यापूर्वी ती घराच्या धाब्यावर गेली

  4. आणि त्यांना म्हणाली, “मला माहीत आहे की, हा देश याहवेहने तुम्हाला दिलेला आहे आणि तुमच्या भीतीमुळे आम्ही धास्तावून गेलो आहोत, म्हणून या देशात राहणारे सर्व लोक तुमच्या भीतीने थरथरत आहेत.

  5. कारण जेव्हा तुम्ही इजिप्त देशातून बाहेर पडला त्यावेळेस तुमच्यासाठी तांबड्या समुद्रातून याहवेहने मार्ग कसा तयार केला, याबद्दल आम्ही ऐकले आहे आणि यार्देनेच्या पूर्वेस असणार्‍या सीहोन व ओग या दोन अमोर्‍यांच्या राजांचा तुम्ही कसा संपूर्ण नाश केला, याबद्दल आम्ही ऐकले आहे.

  6. जेव्हा आम्ही या गोष्टी ऐकल्या, तेव्हा आमची अंतःकरणे भीतीने थरारून गेली आणि प्रत्येकाचे धैर्य थंड पडले, कारण याहवेह जे तुमचे परमेश्वर वर स्वर्गात आहेत ते परमेश्वर पृथ्वीवर सुद्धा आहेत.

  7. “तर आता मला याहवेहकडून वचन द्या की तुम्ही माझ्या कुटुंबावर दया दाखवाल, कारण मी तुमच्यावर दया दाखविली आहे. मला खात्रीने एक चिन्ह द्या,

  8. की माझे आई आणि वडील, माझे भाऊ आणि बहिणी आणि त्यांच्या कुटुंबातील सर्वांचे प्राण वाचवाल आणि आम्हाला मृत्यूपासून सोडवाल.”

  9. “आम्ही तुमच्या जिवास जीव देऊ!” त्या पुरुषांनी तिला खात्री दिली. “आम्ही जे काही करीत आहोत ते जर तू सांगणार नाहीस, तर जेव्हा याहवेह हा प्रदेश आमच्या हाती देतील, आम्ही तुला दयेने वागवू आणि तुझ्याबरोबर विश्वासू राहू.”

  10. तेव्हा तिने खिडकीतून दोरी टाकून त्यांना खाली उतरविले कारण तिचे घर गावकुसावर होते.

  11. ती त्यांना म्हणाली, “तुम्ही डोंगराकडे पळून जा म्हणजे तुमचा शोध घेणार्‍यांना तुम्ही सापडणार नाही. जोपर्यंत ते परत येत नाहीत, तोपर्यंत तीन दिवस तिथेच लपून राहा आणि नंतर तुम्ही तुमच्या मार्गाने परत जा.”

  12. आता ते पुरुष तिला म्हणाले, “जेव्हा आम्ही या प्रदेशात प्रवेश करू त्यावेळेस किरमिजी रंगाचा हा दोर, ज्याने तू आम्हाला खाली सोडलेस तो तुझ्या खिडकीतून लोंबताना आम्हाला दिसला नाही आणि तुझे वडील आणि आई, तुझे भाऊ आणि तुझ्या सर्व कुटुंबाला तुझ्या घरात आणले नाहीस तर, तू जे वचन आमच्याकडून शपथ घालून घेतले आहेस, ते आमच्यावर बंधनकारक राहणार नाही.

  13. Behold, when we come into the land, thou shalt bind this line of scarlet thread in the window which thou didst let us down by: and thou shalt bring thy father, and thy mother, and thy brethren, and all thy father's household, home unto thee.

  14. जर त्यांच्यापैकी कोणीही घराबाहेर रस्त्यावर जातील तर त्यांचे रक्त त्यांच्याच माथ्यावर राहेल, आम्ही त्याला जबाबदार नसणार. जे तुझ्या घरात तुझ्याबरोबर आहेत जर त्यांना काही झाले तर त्यांचे रक्त आमच्या माथ्यावर असेल.

  15. परंतु जर तू आम्ही काय करीत आहोत हे कोणाला सांगितलेस तर, ही शपथ जी तू आमच्याकडून वाहून घेतली आहेस त्यातून आम्ही मुक्त होऊ.”

  16. “मला मान्य आहे,” ती म्हणाली. “तुमच्या म्हणण्याप्रमाणे होवो.” तेव्हा तिने त्यांना पाठवून दिले आणि ते निघून गेले आणि तिने किरमिजी रंगाचा दोर तिच्या खिडकीला बांधला.

  17. त्यांनी गिबोनी लोकांबरोबर करार केल्याच्या तीन दिवसानंतर, इस्राएली लोकांनी जेव्हा ऐकले की ते त्यांचे शेजारी होते, त्यांच्या जवळच राहत होते.

  18. तेव्हा इस्राएली लोक बाहेर पडले आणि तिसर्‍या दिवशी ते त्यांच्या शहरांकडे आले: गिबोन, कफीराह, बैरोथ आणि किर्याथ-यआरीम ही त्या शहरांची नावे.

  19. परंतु इस्राएली लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला नाही, कारण मंडळीच्या पुढार्‍यांनी याहवेह इस्राएलच्या परमेश्वराच्या नावाने त्यांना तशी शपथ दिली होती. संपूर्ण सभेने पुढार्‍यांविरुद्ध कुरकुर केली,

  20. परंतु सर्व पुढार्‍यांनी उत्तर दिले, “आपण याहवेह इस्राएलच्या परमेश्वराद्वारे त्यांना शपथ दिली आहे आणि आता आपण त्यांना स्पर्श करू शकत नाही.

  21. आपण त्यांच्यासाठी असे करू या: आपण त्यांना जिवंत राहू देऊ, म्हणजे आपण त्यांना दिलेली शपथ मोडल्याबद्दल परमेश्वराचा क्रोध आपल्यावर येणार नाही.”

  22. ते पुढे म्हणाले, “त्यांना जगू द्या, परंतु त्यांनी संपूर्ण मंडळीच्या सेवेसाठी लाकूड तोडणारे आणि पाणी वाहणारे म्हणून राहावे.” अशाप्रकारे पुढार्‍यांनी त्यांना दिलेल्या वचनाचे पालन केले.

  23. त्याचे पिता दावीदाचा अभिषिक्त वारस म्हणून शलोमोनचा राज्याभिषेक झाला आहे असे जेव्हा सोरचा राजा हीरामाने ऐकले, तेव्हा त्याने शलोमोनकडे आपले राजदूत पाठवले, कारण दावीदाशी त्याचे नेहमीच मैत्रीचे संबंध होते.

  24. शलोमोनने हीरामास परत निरोप पाठवला:

  25. “आपणास तर माहीतच आहे की माझे पिता दावीदाला सर्व बाजूंनी युद्धाने घेरले होते आणि त्याच्या शत्रूंना याहवेहने त्याच्या पायाखाली देईपर्यंत याहवेह त्यांच्या परमेश्वराच्या नावासाठी त्यांना मंदिर बांधता आले नाही.