मुख्य मजकुरावर जा

Treaty बद्दल बायबलमधील वचने

40 वचने · 4 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. परंतु आता माझ्या याहवेह परमेश्वराने सर्व बाजूंनी मला स्वस्थता दिली आहे. कोणी शत्रू किंवा अरिष्ट नाही.

  2. जसे याहवेहने माझे पिता दावीदाला सांगितले होते, ‘तुझा पुत्र, ज्याला मी तुझ्या जागी तुझ्या राजासनावर बसवेन तो माझ्या नावासाठी मंदिर बांधेल.’ म्हणून याहवेह माझ्या परमेश्वराच्या नावासाठी मी मंदिर बांधावे अशी मी इच्छा बाळगतो.

  3. “तर आता लबानोनचे गंधसरू माझ्यासाठी कापले जावे अशी आज्ञा करा. माझी माणसे तुमच्या माणसांबरोबर काम करतील आणि तुमच्या माणसांसाठी तुम्ही जी मजुरी ठरवाल ती मी तुम्हाला देईन. तुम्हाला माहीतच आहे की लाकडाचे काम करण्यात जी निपुणता सीदोनी लोकांमध्ये आहे ती आमच्यात कोणामध्ये नाही.”

  4. शलोमोनचा निरोप ऐकून हीरामाला अतिशय आनंद झाला व म्हणाला, “आज याहवेहची स्तुती असो, कारण या महान देशावर राज्य करण्यासाठी याहवेहने दावीदाला ज्ञानी पुत्र दिला आहे.”

  5. तेव्हा हीरामाने शलोमोनला निरोप पाठवला: “आपण पाठविलेला निरोप मला मिळाला. देवदारू व गंधसरूच्या लाकडाचा पुरवठा आपल्या मागणीनुसार पुरविला जाईल.

  6. माझी माणसे ती लबानोनपासून भूमध्य समुद्रापर्यंत ओढून नेतील, मी त्यांचे ताफे बनवून जे ठिकाण आपण मला सांगाल तिथपर्यंत पोचते करेन. तिथे मी ते वेगळे करेन आणि मग आपण ते घेऊन जाऊ शकता. आणि माझ्या राजकीय घराण्याला आपण अन्न पुरवावे ही माझी इच्छा आपण पूर्ण करावी.”

  7. याप्रकारे हीरामाने शलोमोनला हवे तेवढ्या गंधसरू आणि देवदारू लाकडांचा पुरवठा केला.

  8. आणि शलोमोनने हीरामाला त्याच्या घराण्यासाठी अन्न म्हणून वीस हजार कोर गहू, त्याचबरोबर वीस हजार कोर दाबून काढलेले जैतुनाचे तेल दिले. याप्रकारे शलोमोन वर्षानुवर्षे ते पाठवित राहिला.

  9. अभिवचन दिल्याप्रमाणे याहवेहने शलोमोनला ज्ञान दिले. हीराम आणि शलोमोन यांच्यात शांतीचे संबंध होते आणि त्या दोघांनी शांतीचा करार केला.

  10. शेवटच्या वीस वर्षात शलोमोनने याहवेहचे मंदिर आणि राजमहाल या दोन इमारतींचे बांधकाम केले.

  11. शलोमोन राजाने सोरचा राजा हीराम याला गालील प्रांतातील वीस नगरे दिली, कारण त्याने हवे असलेले सर्व गंधसरू, देवदारू, आणि सोने शलोमोनला पुरविले होते.

  12. परंतु जेव्हा शलोमोनने त्याला दिलेली नगरे पाहण्यासाठी हीराम सोरवरून गेला, ते पाहून त्याला समाधान झाले नाही.

  13. तेव्हा तो म्हणाला, “माझ्या भावा, ही कशी नगरे तू मला दिलीस?” आणि त्याने त्यास काबूल प्रांत असे नाव दिले, ते नाव आजही प्रचलित आहे.

  14. हीरामाने राजाकडे एकशेवीस तालांत सोने पाठवले होते.

  15. बेन-हदाद म्हणाला, “माझ्या पित्याने जी शहरे आपल्या पित्याकडून घेतली ती सर्व मी आपणास परत करेन. माझ्या पित्याने जशा शोमरोनात वसविल्या तशाच बाजारपेठा आपण दिमिष्कात वसवा.” अहाब म्हणाला, “या करारावर मी तुला मोकळे करतो.” म्हणून त्याने त्याच्याशी करार केला व त्याला सोडून दिले.