Lebanon
33.7500, 35.5900 गूगल नकाशावर पाहा
Lebanon चा उल्लेख असलेली वचने
आता तुम्ही येथून जा व अमोर्यांचा डोंगराळ प्रदेश, अराबाची दरी, नेगेव, कनान व लबानोन आणि भूमध्य समुद्रकिनार्यापासून ते फरात नदीच्या काठापर्यंत पसरलेल्या संपूर्ण प्रदेशात जाऊन वस्ती करा.
हे प्रभो, मला जाऊ द्या आणि यार्देनच्या पलीकडील उत्तम जमीन पाहू द्या—तो उत्तम डोंगराळ प्रदेश आणि लबानोन.”
तुम्ही जिथे पाऊल ठेवाल, ती प्रत्येक भूमी तुमची होईल: तुमच्या देशाची सीमा दक्षिणेकडील नेगेव प्रांतापासून लबानोन देशापर्यंत व फरात नदीपासून भूमध्य समुद्रापर्यंत पसरेल.
तुमची सीमा वाळवंटापासून लबानोन पर्यंत आणि महान नदी फरातपासून, सर्व हिथी देश, ते पश्चिमेकडे भूमध्य समुद्रापर्यंत असेल.
यार्देनेच्या पश्चिमेकडील सर्व राजांनी—डोंगराळ प्रदेशाच्या राजांनी, पश्चिमी पर्वत पायथ्यावरील राजांनी आणि लबानोन पर्यंत असलेल्या भूमध्य समुद्रकिनार्यांवरील सर्व राजांनी (हिथी, अमोरी, कनानी, परिज्जी, हिव्वी आणि यबूसी राजांनी) या गोष्टींबद्दल ऐकले
गिबली लोकांचा प्रदेश; बआल-गादपासून खाली हर्मोन पर्वत ते लेबो हमाथपर्यंत पूर्वेकडील सर्व लबानोन.
“लबानोनपासून मिसरेफोत-मयिम डोंगराळ प्रदेशात राहणारे सर्व रहिवासी, म्हणजे सर्व सीदोन्यांना मी स्वतः इस्राएली लोकांपुढून घालवून देईन. मी तुला सूचना दिल्याप्रमाणे इस्राएली लोकांना हा देश त्यांचे वतन म्हणून विभागून देण्यात येईल याची खात्री कर.
“ते काटेरी झुडूप त्या वृक्षांना म्हणाला, ‘तुमचा राजा म्हणून माझा अभिषेक व्हावा अशी तुमची इच्छा आहे, हे जर सत्य असेल तर या आणि माझ्या सावलीचा आश्रय घ्या; पण जर तसे नसेल तर काटेरी झुडूपातून अग्नी निघो व तो लबानोनाचे गंधसरू भस्म करून टाको!’
लबानोनातील गंधसरूपासून भिंतीतून उगविणार्या एजोबापर्यंत वनस्पती जीवनाविषयी तो बोलला. पशू व पक्षी, सरपटणारे जंतू व मासे याबद्दलही त्याने वर्णन केले.
“तर आता लबानोनचे गंधसरू माझ्यासाठी कापले जावे अशी आज्ञा करा. माझी माणसे तुमच्या माणसांबरोबर काम करतील आणि तुमच्या माणसांसाठी तुम्ही जी मजुरी ठरवाल ती मी तुम्हाला देईन. तुम्हाला माहीतच आहे की लाकडाचे काम करण्यात जी निपुणता सीदोनी लोकांमध्ये आहे ती आमच्यात कोणामध्ये नाही.”
माझी माणसे ती लबानोनपासून भूमध्य समुद्रापर्यंत ओढून नेतील, मी त्यांचे ताफे बनवून जे ठिकाण आपण मला सांगाल तिथपर्यंत पोचते करेन. तिथे मी ते वेगळे करेन आणि मग आपण ते घेऊन जाऊ शकता. आणि माझ्या राजकीय घराण्याला आपण अन्न पुरवावे ही माझी इच्छा आपण पूर्ण करावी.”
शलोमोन लबानोनला प्रत्येक महिन्याला दहा हजार पुरुष आळीपाळीने पाठवित असे, म्हणजे ते लबानोनमध्ये एक महिना व दोन महिने आपल्या घरी राहत असत. अदोनिराम बिगारी कामकर्यांवर अधिकारी होता.
त्याचप्रमाणे शलोमोनचे रथ व त्याचे घोडे यांच्यासाठी सर्व शहरे व नगरे; यरुशलेमात, लबानोनात आणि ज्या सर्व प्रदेशात त्याचे राज्य होते त्या हद्दींमध्ये त्याच्या मनास येईल ते त्याने बांधले.
परंतु इस्राएलचा राजा यहोआशने यहूदीयाचा राजा अमस्याहला उत्तर दिले: “लबानोनमधील एका काटेरी झुडूपाने लबानोनमधील एका गंधसरूला निरोप पाठवला की, ‘तुझ्या मुलीचा विवाह माझ्या मुलाशी करून दे.’ तेव्हा लबानोनमधून एका जंगली श्वापदाने येऊन त्या काटेरी झुडूपाला पायाखाली तुडविले.
तुझे दूत पाठवून तू प्रभूची चेष्टा केली. आणि तू म्हणतोस, ‘मी माझ्या अनेक रथांनी उंचच उंच पर्वतावर चढून गेलो, लबानोनच्या सर्वात उंच पर्वतावर गेलो. मी तिचे सर्वात उंच देवदारू तोडले, निवडक गंधसरू तोडले. मी तिच्या दुर्गम भागात पोहोचलो तिच्या अत्यंत उत्तम जंगलात गेलो.
“याशिवाय लबानोनच्या जंगलातून गंधसरू, देवदारू व रक्तचंदन यांची लाकडे माझ्याकडे पाठवा. लाकडे कापून पाठविण्याच्या कामी तुमचे लोक निष्णात आहेत हे मी जाणतो. माझे कारागीर तुमच्या कारागिरांसह काम करतील.
आम्ही लबानोन डोंगरावरील सर्व लाकडे कापून ते ओंडके जलमार्गाने याफोला पाठवू, तिथून ते तुम्ही यरुशलेममध्ये घेऊ शकाल.”
त्याचप्रमाणे बालाथ आणि शलोमोनच्या भांडारांची सर्व शहरे त्याचप्रमाणे त्याचे रथ व त्याचे घोडे यांच्यासाठी सर्व शहरे बांधली; यरुशलेमात, लबानोनात आणि ज्या सर्व राज्यांत त्याचे राज्य होते त्या हद्दींमध्ये त्याच्या मनास येईल ते त्याने बांधले.
परंतु इस्राएलचा राजा योआश याने यहूदीयाचा राजा अमस्याह याला उत्तर दिले: “लबानोनमधील एका काटेरी झुडूपाने लबानोनमधील एका गंधसरूला निरोप पाठवला की, ‘तुझ्या मुलीचा विवाह माझ्या मुलाशी करून दे.’ तेव्हा लबानोनमधून एका जंगली श्वापदाने येऊन त्या काटेरी झुडूपाला पायाखाली तुडविले.
नंतर त्यांनी गवंडी व सुतार मोलमजुरीने लावले व सोर आणि सीदोन येथील लोकांकडून गंधसरूचे ओंडके विकत घेतले आणि त्याबद्दल त्यांनी त्यांना धान्य, द्राक्षारस व जैतुनाचे तेल दिले. हे ओंडके लबानोन पर्वतावरून आणण्यात आले व भूमध्य समुद्राच्या किनार्याने जलमार्गाने त्यांना याफो येथे पोचते करण्यात आले. हे सर्व पर्शियाचा राजा कोरेशच्या परवानगीने करण्यात आले.
याहवेहच्या गर्जनेने देवदारू वृक्ष मोडून पडतात; लबानोनमधील देवदारू वृक्ष दुभंगतात.
लबानोनचा डोंगर वासराप्रमाणे आणि सिर्योन तरुण रानबैलाप्रमाणे बागडतो;
देशभर विपुल धान्य उगवो; लबानोनच्या शिखरावर ते डोलू द्या, देशातील डोंगरही धान्याने आच्छादून जावोत; शेतातील भरगच्च गवताप्रमाणे शहरे लोकांनी भरून गजबजून जावोत.
नीतिमान लोक खजुरीच्या झाडासारखे समृद्ध होतील, ते लबानोनातील गंधसरूसारखे अभिवृद्ध होतील;
याहवेहने लावलेल्या लबानोनाच्या गंधसरू वृक्षास भरपूर पाणी पुरवठा असतो.