Skip to content

Amaziah

34 वचने · 4 कुटुंब सदस्य

Amaziah चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. ज्या अधिकार्‍यांनी त्याचा वध केला ते शिमाथाचा पुत्र योजाखार व शोमेराचा पुत्र यहोजाबाद हे होते. तो मरण पावला आणि त्याला दावीदनगरीत पूर्वजांच्या सोबत मूठमाती देण्यात आली. त्याचा पुत्र अमस्याह हा त्याच्या जागी राजा झाला.

  2. योआशाच्या कारकिर्दीचा बाकीचा इतिहास आणि यहूदीयाचा राजा अमस्याहबरोबर झालेले त्याचे युद्ध व त्याचे पराक्रम यांची नोंद इस्राएली राजांचा इतिहास या ग्रंथात केला नाही काय?

  3. यहोआहाजचा पुत्र इस्राएलाचा राजा यहोआशच्या कारकिर्दीच्या दुसर्‍या वर्षी यहूदीयाचा राजा योआशचा पुत्र अमस्याह राज्य करू लागला.

  4. मग अमस्याहने इस्राएलचा राजा, येहूचा पुत्र यहोआहाजचा पुत्र यहोआशला दूतांच्या द्वारे संदेश पाठवून असे आव्हान केले, “चल ये, युद्धात एकमेकांचा सामना करू.”

  5. परंतु इस्राएलचा राजा यहोआशने यहूदीयाचा राजा अमस्याहला उत्तर दिले: “लबानोनमधील एका काटेरी झुडूपाने लबानोनमधील एका गंधसरूला निरोप पाठवला की, ‘तुझ्या मुलीचा विवाह माझ्या मुलाशी करून दे.’ तेव्हा लबानोनमधून एका जंगली श्वापदाने येऊन त्या काटेरी झुडूपाला पायाखाली तुडविले.

  6. परंतु अमस्याहने ऐकले नाही, तेव्हा इस्राएलाचा राजा यहोआशने हल्ला केला. त्याने आणि यहूदीयाच्या राजा अमस्याहने यहूदीयातील बेथ-शेमेश येथे एकमेकांचा सामना केला.

  7. इस्राएलाचा राजा यहोआशने यहूदीयाचा राजा अहज्याहचा पुत्र, योआशाचा पुत्र अमस्याहला बेथ-शेमेश येथे कैद केले. नंतर योआश यरुशलेमास गेला आणि यरुशलेमची एफ्राईमच्या दरवाजापासून कोपर्‍याच्या दरवाजापर्यंत भिंत त्याने पाडून टाकली; जी चारशे हात लांब होती.

  8. यहोआशाचा बाकीचा इतिहास, त्याने काय केले आणि त्याचे पराक्रम, तसेच यहूदीयाच्या अमस्याह राजाबरोबर झालेले त्याचे युद्ध यांची नोंद इस्राएली राजांचा इतिहासग्रंथात नमूद केलेली नाही काय?

  9. इस्राएलचा राजा यहोआहाजचा पुत्र यहोआशच्या मृत्यूनंतर यहूदीयाचा राजा योआशचा पुत्र अमस्याह पंधरा वर्षे जगला.

  10. अमस्याहाच्या राज्यकाळातील इतर घटना, यहूदीयाच्या राजांच्या इतिहासग्रंथात लिहिलेल्या नाहीत काय?

  11. मग यहूदीयाच्या सर्व लोकांनी अजर्‍याह ला घेतले, जो सोळा वर्षाचा होता आणि त्याला त्याचा पिता अमस्याहच्या जागी राजा केले.

  12. यहूदीयाचा राजा योआशाचा पुत्र अमस्याहच्या कारकिर्दीच्या पंधराव्या वर्षी इस्राएलाचा राजा योआशचा पुत्र यरोबोअम शोमरोनात राज्य करू लागला आणि त्याने एकेचाळीस वर्षे राज्य केले.

  13. इस्राएलाचा राजा यरोबोअमच्या कारकिर्दीच्या सत्ताविसाव्या वर्षी यहूदीयाचा राजा अमस्याहाचा पुत्र अजर्‍याह राज्य करू लागला.

  14. त्याने त्याचा पिता अमस्याहप्रमाणे याहवेहच्या दृष्टीने जे योग्य ते केले.

  15. त्याचा पुत्र अमस्याह, त्याचा पुत्र अजर्‍याह, त्याचा पुत्र योथाम,

  16. त्याच्या पुत्राचा वृत्तांत, त्याच्याविषयीच्या पुष्कळ भविष्यवाण्या आणि परमेश्वराच्या मंदिराच्या पुनर्स्थापनेची नोंद राजांच्या पुस्तकावरील टिप्पणीत लिहिली आहे. त्याच्यानंतर त्याचा पुत्र अमस्याह हा राजा झाला.

  17. वयाच्या पंचवीसाव्या वर्षी अमस्याह राजा झाला, त्याने यरुशलेमात एकोणतीस वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव यहोअदान होते; ती यरुशलेमची होती.

  18. अमस्याहने यहूदीयाच्या लोकांना एकत्र बोलाविले आणि सर्व यहूदाह आणि बिन्यामीनसाठी त्यांच्या कुटुंबांप्रमाणे हजारोंचे सेनापती आणि शंभराचे सेनापती नियुक्त केले. त्यानंतर त्याने वीस वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे लोक एकत्र केले आणि त्याला असे दिसून आले की लष्कराच्या सेवेसाठी योग्य असे तीन लाख पुरुष आहेत, भाला आणि ढाल हाताळण्यास ते सक्षम आहेत.

  19. अमस्याहने परमेश्वराच्या मनुष्याला विचारले, “परंतु मी या इस्राएली सैन्यासाठी शंभर तालांत चांदी दिली आहेत त्याचे काय?” परमेश्वराच्या मनुष्याने उत्तर दिले, “याहवेह, तुम्हाला त्याच्यापेक्षाही अधिक देऊ शकतात.”

  20. तेव्हा अमस्याहने एफ्राईमहून त्याच्याकडे जे सैन्य आले होते त्यांना काढून त्यांच्या घरी परत पाठविले. ते यहूदीयावर खूप रागावले आणि संतापाने घरी निघून गेले.

  21. अमस्याहने नंतर त्याचे सामर्थ्य वाढविले आणि त्याचे सैन्य क्षार खोर्‍यात नेले आणि तिथे त्याने सेईरच्या दहा हजार लोकांना ठार केले.

  22. दरम्यान, अमस्याहने ज्या सैन्याला परत पाठवले होते आणि युद्धात भाग घेऊ दिला नव्हता, त्यांनी शोमरोनपासून बेथ-होरोनपर्यंत तेथील यहूदीयाच्या नगरांवर हल्ला केला. त्यांनी तीन हजार लोकांना ठार केले आणि मोठ्या प्रमाणात लूट घेऊन गेले.

  23. अमस्याह जेव्हा एदोमी लोकांचा वध करून परत आला, तेव्हा त्याने सेईरच्या लोकांची दैवते सोबत आणली, त्यांच्यापुढे लवून नमन केले आणि त्यांच्यासाठी होमार्पणे केली.

  24. याहवेहचा राग अमस्याहवर भडकला आणि त्यांनी त्याच्याकडे एका संदेष्ट्याला पाठविले, तो म्हणाला, “या लोकांच्या दैवतांचा तू सल्ला का घेतोस, जे स्वतःच्या लोकांना तुझ्या हातातून वाचवू शकले नाहीत?”

  25. यहूदीयाचा राजा अमस्याहने त्याच्या सल्लागारांशी सल्लामसलत केली, त्याने हे आव्हान इस्राएलचा राजा, येहूचा पुत्र यहोआहाज याचा पुत्र यहोआश याच्याकडे पाठविले: “चल ये, युद्धात एकमेकांचा सामना करू.”