Skip to content

Joash

19 वचने · 4 कुटुंब सदस्य

हे नावानेही ओळखले जाते: Jehoash

Joash चा उल्लेख असलेली वचने

  1. परंतु यहोराम राजाची कन्या आणि अहज्याहची बहीण यहोशेबाने अहज्याहचा पुत्र योआशला घेतले आणि ज्या राजपुत्रांची कत्तल करण्यात येणार होती त्यामधून त्याला चोरले. त्याला आणि त्याच्या दाईला विश्रांतिगृहात अथल्याहपासून लपवून ठेवले; म्हणून त्याचा वध झाला नाही.

  2. वयाच्या सातव्या वर्षी यहोआश राज्य करू लागला.

  3. येहूच्या सातव्या वर्षी यहोआश राज्य करू लागला आणि त्याने यरुशलेमात चाळीस वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव सिब्या होते; ती बेअर-शेबा येथील होती.

  4. याजक यहोयादाने जितकी वर्षे जे मार्गदर्शन केले होते तितकी वर्षे याहवेहच्या दृष्टीने योग्य ते यहोआशाने केले.

  5. यहोआश याजकांना म्हणाला, “याहवेहच्या मंदिरात पवित्र अर्पण म्हणून आणलेले सर्व पैसे, शिरगणतीत जमा केलेले पैसे, वैयक्तिक नवसातून मिळालेले पैसे आणि मंदिरात स्वेच्छेने आणलेले सर्व पैसे जमा करा.

  6. परंतु यहोआश राजाच्या कारकिर्दीतील तेवीस वर्षापर्यंत याजकांनी मंदिराची डागडुजी केली नव्हती.

  7. तेव्हा यहोआश राजाने यहोयादा याजक व इतर याजकांना बोलाविले आणि विचारले, “तुम्ही मंदिराची डागडुजी अजूनही का केली नाही? तुमच्या खजिनदारांकडून आणखी पैसे घेऊ नका, तर तो पैसा आता मंदिराच्या डागडुजीसाठी देण्यात यावा.”

  8. तेव्हा यहूदीयाचा राजा यहोआशने आपले पूर्वज म्हणजे—यहोशाफाट, यहोराम, अहज्याह या यहूदीयाच्या राजांनी—आणि त्याने स्वतः समर्पित केलेल्या भेटवस्तू आणि याहवेहच्या मंदिरातील राजवाड्याच्या खजिन्यातील सर्व सोने त्याने अरामचा राजा हजाएलकडे पाठवून दिले. मग तो यरुशलेममधून निघून गेला.

  9. योआशाचा बाकीचा इतिहास, यहूदीयाच्या राजांचा इतिहास या ग्रंथात नमूद केला नाही काय?

  10. योआशाच्या अधिकार्‍यांनीच त्याच्याविरुद्ध कट रचला आणि सिल्लाकडे खाली जाणार्‍या रस्त्यावर बेथ मिल्लो येथे त्याचा वध केला.

  11. यहूदीयाचा राजा अहज्याहचा पुत्र योआशच्या कारकिर्दीच्या तेविसाव्या वर्षी येहूचा पुत्र यहोआहाज शोमरोनमध्ये इस्राएलावर राज्य करू लागला आणि त्याने सतरा वर्षे राज्य केले.

  12. त्याने याहवेहच्या दृष्टीने योग्य ते केले, परंतु त्याचा पिता दावीदासारखे नव्हे. त्याने प्रत्येक गोष्टीत त्याचा पिता योआशचे अनुकरण केले.

  13. त्याचा पुत्र यहोराम, त्याचा पुत्र अहज्याह, त्याचा पुत्र योआश,

  14. परंतु यहोशेबा, यहोराम राजाची कन्या हिने अहज्याहचा पुत्र योआश याला घेतले आणि ज्या राजपुत्रांची कत्तल करण्यात येणार होती त्यामधून त्याला चोरले. आणि त्याला आणि त्याच्या दाईला एका विश्रांतिगृहात ठेवले. कारण यहोराम राजाची कन्या आणि याजक यहोयादाची पत्नी, यहोशेबा ही अहज्याहची बहीण होती, म्हणून तिने मुलाला अथल्याहपासून लपवून ठेवले. त्यामुळे ती त्याचा वध करू शकली नाही.

  15. जेव्हा योआश राजा झाला तेव्हा तो सात वर्षांचा होता. आणि त्याने चाळीस वर्षे यरुशलेममध्ये राज्य केले. त्याच्या आईचे नाव सिबियाह होते; ती बेअर-शेबा येथील होती.

  16. यहोयादा याजकाच्या सर्व वर्षांमध्ये योआशाने याहवेहच्या दृष्टीने जे योग्य होते तेच केले.

  17. काही काळानंतर योआशाने याहवेहच्या मंदिराची दुरुस्ती करण्याचे ठरविले.

  18. जखर्‍याहचे वडील यहोयादा याने त्याच्यावर जो दयाळूपणा केला होता त्याची राजा योआशाने आठवण केली नाही, परंतु त्याने त्याच्या पुत्राला ठार मारले, जो त्याच्या मरणाच्या अवस्थेत म्हणाला, “याहवेह हे पाहतील आणि तुला त्याचा हिशोब मागतील.”

  19. जरी अरामी सैन्य थोडीच माणसे बरोबर घेऊन आले होते, तरी याहवेहनी त्यांच्या हाती पुष्कळ मोठे सैन्य दिले. कारण यहूदाहने त्यांच्या पूर्वजांचा परमेश्वर याहवेह यांना सोडले होते, योआशवर न्यायदंडाची कारवाई करण्यात आली.