Skip to content

Fatherless बद्दल बायबलमधील वचने

26 वचने · 31 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. योसेफाचा पुत्र मनश्शेहच्या कुळातील माखीरचा पुत्र गिलआदचा पुत्र हेफेरचा पुत्र सलाफहादच्या कन्या, ज्यांची नावे महलाह, नोआह, होगलाह, मिल्काह व तिरजाह होती, त्या पुढे आल्या

  2. आणि त्या मोशे, एलअज़ार याजक, पुढारी व सर्व मंडळीसमोर सभामंडपाच्या प्रवेशद्वाराशी उभ्या राहिल्या व म्हणाल्या,

  3. “आमचे पिता रानात मरण पावले. ते कोरहाच्या अनुयायांपैकी नव्हते, ज्यांनी एकत्र येऊन याहवेहविरुद्ध बंड केले, परंतु ते आपल्याच पापामुळे मरण पावले आणि त्यांना पुत्र नव्हते.

  4. त्यांना पुत्र नव्हते म्हणून आमच्या पित्याचे नाव त्यांच्या कुळातून का नाहीसे व्हावे? आमच्या पित्याच्या नातेवाईकांबरोबर आम्हालाही वतन द्यावे.”

  5. तेव्हा मोशेने त्यांचा वाद याहवेहपुढे आणला,

  6. “तुम्ही अबीमेलेखाचा तुमचा राजा करून सन्मानाने आणि चांगल्या विश्वासाने वागलात काय? यरूब्बआल आणि त्याचा कुटुंबासाठी योग्य ते केले आहे का? ज्या योग्यतेचा तो आहे, त्याप्रमाणे त्याच्याशी वागलात का?

  7. आठवण ठेवा की माझा पिता तुमच्यासाठी लढला व तुम्हाला मिद्यानी लोकांच्या तावडीतून सोडविण्यासाठी त्याने आपला जीव धोक्यात घातला.

  8. परंतु आज तुम्ही माझ्या पित्याच्या कुटुंबाविरुद्ध बंड केले व तुम्ही त्याच्या सत्तर पुत्रांचा एका दगडावर वध केला आणि आता अबीमेलेख जो एक दासीचा पुत्र आहे, त्याला शेखेमातील नागरिकांवर राजा केले आहे, कारण तो तुमचा नातेवाईक आहे.

  9. आज तुम्ही यरूब्बआल आणि त्याच्या कुटुंबासोबत सन्मानाने आणि सदिच्छेने वागलात काय? तर मग अबीमेलेख तुमचा आनंद होवो आणि तुम्ही त्याचा आनंद होवो!

  10. परंतु जर तसे नाही, तर अबीमेलेखातून अग्नी निघून तुम्हाला, शेखेमाच्या आणि बेथमिल्लोच्या नागरिकांना भस्म करो आणि शेखेमाच्या आणि बेथमिल्लोच्या नागरिकातून अग्नी निघून अबीमेलेखाला भस्म करो!”

  11. मग योथाम निसटून गेला व आपला भाऊ अबीमेलेखाच्या भीतीमुळे बैर येथे जाऊन राहिला.

  12. जेव्हा अहज्याहची आई अथल्याहने पाहिले की तिचा पुत्र मरण पावला आहे, तेव्हा ती राजघराण्याचा नाश करण्यास निघाली.

  13. परंतु यहोराम राजाची कन्या आणि अहज्याहची बहीण यहोशेबाने अहज्याहचा पुत्र योआशला घेतले आणि ज्या राजपुत्रांची कत्तल करण्यात येणार होती त्यामधून त्याला चोरले. त्याला आणि त्याच्या दाईला विश्रांतिगृहात अथल्याहपासून लपवून ठेवले; म्हणून त्याचा वध झाला नाही.

  14. अथल्याहने देशावर राज्य केले त्या सहा वर्षापर्यंत तो व त्याच्या दाईस याहवेहच्या मंदिरात लपवून ठेवण्यात आले होते.

  15. सातव्या वर्षी यहोयादाने शंभर तुकड्यांचे सरदार, गारदी आणि पहारेकरी यांना बोलावून घेतले आणि त्यांना आपल्यासोबत याहवेहच्या मंदिरात नेले. याहवहेच्या मंदिरात त्यांच्याशी करार आणि शपथ घेऊन त्यांना राजाचा पुत्र दाखविला.

  16. त्यांना आदेश देत तो म्हणाला, “तुम्ही असे करावे: शब्बाथ दिवशी तुमच्यापैकी जे पहार्‍यावर असतील त्यातील—एकतृतीयांश राजमहालावर पहारा देतील.

  17. आणि एकतृतीयांश सूर वेशीवर आणि एकतृतीयांश पहारेकर्‍यांच्या मागच्या वेशीवर, जे वेळोवेळी मंदिराची रक्षा करीत होते—

  18. आणि तुमच्या दोन तुकड्या ज्या शब्बाथ दिवसात कार्यासाठी नियुक्त करण्यात आल्या आहेत, त्यांनी राजाकरिता याहवेहच्या मंदिराचे रक्षक म्हणून उभे राहावे.

  19. तुम्ही सर्व आपआपली शस्त्रे हातात घेऊन राजाभोवती उभे राहावे. जो कोणी तुमच्या रांगेच्याजवळ येण्याचा प्रयत्न करेल त्याला जिवे मारावे. राजा जिथे जाईल तिथे तुम्ही त्याच्याजवळ राहावे.”

  20. यहोयादा याजकाच्या आज्ञेप्रमाणे शताधिपतींनी केले. प्रत्येकाने आपआपली माणसे घेतली—जे शब्बाथाच्या दिवशी सेवेला येणार होते आणि जे सेवा संपवून जात होते—ते सर्व यहोयादा याजकाजवळ आले.

  21. याहवेहच्या मंदिरामधील दावीद राजाचे जे भाले व ढाली होत्या, त्या अधिकाऱ्यांच्या हाती दिल्या.

  22. प्रत्येकाच्या हातात शस्त्र घेऊन पहारेकरी राजाभोवती; मंदिराच्या दक्षिणेकडून उत्तरेच्या बाजूपर्यंत; वेदीजवळ व मंदिराजवळ उभे राहिले.

  23. मग यहोयादाने राजाच्या पुत्राला बाहेर आणले, त्याच्या शिरावर राजमुकुट ठेवला; त्याच्या हातामध्ये कराराची प्रत दिली आणि त्याला राजा म्हणून घोषित केले. मग त्यांनी त्याला अभिषेक केला आणि लोकांनी टाळ्या वाजविल्या व मोठ्याने जयघोष करून ते म्हणाले, “राजा चिरायू होवो!”

  24. त्यांचा धिक्कार असो, जे अन्यायी कायदे बनवितात— जुलूम करणारा हुकूमनामा जे काढतात,

  25. गरिबांचे हक्क हिरावून घेण्यासाठी आणि माझ्या लोकांपैकी पीडितांना न्यायापासून वंचित करण्यासाठी, विधवांना त्यांचे सावज बनविण्यासाठी आणि अनाथांना लुटण्यासाठी.