Skip to content

Athaliah

15 वचने · 8 कुटुंब सदस्य

Athaliah चा उल्लेख असलेली वचने

  1. वयाच्या बावीसाव्या वर्षी अहज्याह राजा झाला आणि त्याने यरुशलेमात एक वर्ष राज्य केले. त्याच्या आईचे नाव अथल्याह होते, ती इस्राएलाचा राजा ओमरीची नात होती.

  2. जेव्हा अहज्याहची आई अथल्याहने पाहिले की तिचा पुत्र मरण पावला आहे, तेव्हा ती राजघराण्याचा नाश करण्यास निघाली.

  3. परंतु यहोराम राजाची कन्या आणि अहज्याहची बहीण यहोशेबाने अहज्याहचा पुत्र योआशला घेतले आणि ज्या राजपुत्रांची कत्तल करण्यात येणार होती त्यामधून त्याला चोरले. त्याला आणि त्याच्या दाईला विश्रांतिगृहात अथल्याहपासून लपवून ठेवले; म्हणून त्याचा वध झाला नाही.

  4. अथल्याहने देशावर राज्य केले त्या सहा वर्षापर्यंत तो व त्याच्या दाईस याहवेहच्या मंदिरात लपवून ठेवण्यात आले होते.

  5. जेव्हा अथल्याहने पहारेकर्‍यांचा आणि लोकांचा आवाज ऐकला, तेव्हा ती त्यांच्याकडे याहवेहच्या मंदिरात आली.

  6. तिने बघितले की रीतीनुसार राजा खांबाजवळ उभा आहे. अधिकारी आणि कर्णेवादक हे राजाजवळ उभे होते आणि राष्ट्रातील सर्व लोक आनंद करीत कर्णे वाजवित होते. तेव्हा अथल्याहने आपली वस्त्रे फाडली आणि ओरडून म्हणाली, “फितुरी रे, फितुरी!”

  7. राष्ट्रातील प्रत्येकजण आनंद करीत होता आणि शहर शांत झाले, कारण राजवाड्यात अथल्याहचा तलवारीने वध करण्यात आला होता.

  8. वयाच्या बावीसाव्या वर्षी अहज्याह राजा झाला आणि त्याने यरुशलेमात एक वर्ष राज्य केले. त्याच्या आईचे नाव अथल्याह होते, जी ओमरीची नात होती.

  9. जेव्हा अहज्याहची आई अथल्याहने पाहिले की तिचा पुत्र मरण पावला आहे, तेव्हा ती यहूदीयाच्या सर्व राजघराण्याचा नाश करण्यास निघाली.

  10. परंतु यहोशेबा, यहोराम राजाची कन्या हिने अहज्याहचा पुत्र योआश याला घेतले आणि ज्या राजपुत्रांची कत्तल करण्यात येणार होती त्यामधून त्याला चोरले. आणि त्याला आणि त्याच्या दाईला एका विश्रांतिगृहात ठेवले. कारण यहोराम राजाची कन्या आणि याजक यहोयादाची पत्नी, यहोशेबा ही अहज्याहची बहीण होती, म्हणून तिने मुलाला अथल्याहपासून लपवून ठेवले. त्यामुळे ती त्याचा वध करू शकली नाही.

  11. अथल्याहने देशावर राज्य केले त्या सहा वर्षापर्यंत त्याला परमेश्वराच्या मंदिरात लपवून ठेवण्यात आले होते.

  12. जेव्हा अथल्याहने लोकांच्या धावपळीचा आणि राजाचा जयघोष करण्याचा आवाज ऐकला, तेव्हा ती त्यांच्याकडे याहवेहच्या मंदिरात आली.

  13. तिने बघितले राजा प्रवेशद्वाराच्या खांबाजवळ उभा आहे. अधिकारी आणि कर्णेवादक हे राजाजवळ उभे होते आणि राष्ट्रातील सर्व लोक हर्षोल्हास करीत कर्णे वाजवित आणि वादक त्यांच्या वाद्यांसह स्तुती करीत होते. तेव्हा अथल्याहने आपली वस्त्रे फाडली आणि ओरडून म्हणाली, “फितुरी, फितुरी!”

  14. राष्ट्रातील प्रत्येकजण आनंद करीत होता आणि शहर शांत झाले, कारण अथल्याहचा तलवारीने वध करण्यात आला होता.

  15. आता अथल्याह या दुष्ट स्त्रीच्या मुलांनी परमेश्वराचे मंदिर तोडून त्यात प्रवेश केला होता आणि याहवेहच्या घराच्या सर्व पवित्र वस्तूंचा सुद्धा बआल दैवतांसाठी वापर केला होता.