मुख्य मजकुरावर जा

Ahaziah

7 वचने · 5 कुटुंब सदस्य

Ahaziah चा उल्लेख असलेली वचने

  1. अहाब आपल्या पूर्वजांबरोबर विसावा पावला आणि त्याचा पुत्र अहज्याह त्याचा वारस म्हणून राजा झाला.

  2. तेव्हा अहाबाचा पुत्र अहज्याह यहोशाफाटला म्हणाला, “माझ्या माणसांना आपल्या माणसांबरोबर जाऊ द्या.” पण यहोशाफाटने त्यास नकार दिला.

  3. यहूदीयाचा राजा यहोशाफाटच्या राज्याच्या सतराव्या वर्षी अहाबाचा पुत्र अहज्याह हा शोमरोनात इस्राएलचा राजा झाला आणि त्याने इस्राएलवर दोन वर्षे राज्य केले.

  4. अहज्याह, शोमरोन येथील आपल्या राजवाड्याच्या गच्चीवरून खाली पडून जखमी झाला होता. तेव्हा त्याने आपल्या दूतांना हे सांगून पाठविले, “जा आणि एक्रोनचे दैवत बाल-जबूबला विचारा की मी या दुखण्यातून बरा होईन की नाही.”

  5. अहज्याहच्या कारकिर्दीतील इतर घटना आणि जे काही त्याने केले ते इस्राएलांच्या राजांच्या इतिहासग्रंथात लिहून ठेवलेले नाही का?

  6. नंतर, यहूदीयाचा राजा यहोशाफाटने इस्राएलचा राजा अहज्याह याच्याशी मैत्री केली, ज्याचे मार्ग दुष्ट होते.

  7. मारेशाहवासी दोदावाहूचा पुत्र एलिएजर याने यहोशाफाटविरुद्ध भविष्यवाणी केली, “तुम्ही अहज्याहशी युती केल्यामुळे, तुम्ही जे काय केले आहे त्याचा याहवेह नाश करतील.” ही जहाजे उद्ध्वस्त झाली आणि व्यापाराच्या प्रवासाला तार्शीशला घेऊन जाण्यासाठी ती सक्षम नव्हती.