मुख्य मजकुरावर जा

The Afflictions of the Wicked बद्दल बायबलमधील वचने

95 वचने · 20 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. नाहीतर यावेळी मी तुम्हा सर्वांवर म्हणजेच तू व तुझे अधिकारी व तुझे लोक या सर्वांवर भयानक पीडा पाठवेन, ज्यामुळे तुझी खात्री होईल की, सर्व पृथ्वीवर माझ्यासारखा इतर कोणी नाही.

  2. वास्तविक मी आतापर्यंत माझा हात लांब करून तुला व तुझ्या लोकांना अशा पीडेने मारून या पृथ्वीतून तुम्हाला नष्ट केले असते.

  3. पण मला माहीत आहे की, तू व तुझे सेवक अजूनही याहवेह परमेश्वराचे भय बाळगत नाहीत.”

  4. मी फारोहचे मन कठीण करेन, म्हणजे तो त्यांचा पाठलाग करेल. पण फारोह व त्याच्या सैन्याकडून मी माझे गौरव करून घेईन आणि इजिप्तच्या प्रजेला समजेल की, मी याहवेह आहे.” मग इस्राएली लोकांनी तसे केले.

  5. पण पहाटेच्या वेळी अग्निस्तंभामधून व मेघस्तंभामधून याहवेहने इजिप्तच्या सेनेकडे पाहिले आणि त्यांचा गोंधळ उडविला.

  6. त्यांच्या रथांची चाके गच्च केली की त्यांना पुढे जाणे कठीण होऊ लागले. तेव्हा इजिप्तची लोक म्हणू लागले, “इस्राएलच्या लोकांपासून आपण दूर जाऊ या! कारण याहवेह त्यांच्यावतीने इजिप्तविरुद्ध लढत आहेत.”

  7. याहवेह तुमचे परमेश्वर हे सर्व शाप तुमच्या शत्रूंवर, म्हणजे जे तुमचा द्वेष करतात व तुमचा छळ करतात, त्यांच्यावर आणतील.

  8. आणि म्हणून त्या दिवशी माझा क्रोध त्यांच्याविरुद्ध भडकेल आणि मी त्यांचा त्याग करेन; माझे मुख त्यांच्यापासून लपवेन आणि त्यांचा नाश होईल. त्यांच्यावर भयंकर संकटे व अरिष्ट येतील आणि त्या दिवशी ते म्हणतील, ‘आमचे परमेश्वर आता आम्हामध्ये नाहीत म्हणून ही संकटे आम्हावर आली आहेत का?’

  9. अहाबाने जेव्हा हे शब्द ऐकले, त्याने आपली वस्त्रे फाडली व गोणपाट नेसून उपास केला. तो गोणपाटात राहून दीनपणे जगू लागला.

  10. अहाब राजा मरण पावल्यानंतर मोआबाने इस्राएलविरुद्ध बंड केले.

  11. अहज्याह, शोमरोन येथील आपल्या राजवाड्याच्या गच्चीवरून खाली पडून जखमी झाला होता. तेव्हा त्याने आपल्या दूतांना हे सांगून पाठविले, “जा आणि एक्रोनचे दैवत बाल-जबूबला विचारा की मी या दुखण्यातून बरा होईन की नाही.”

  12. परंतु याहवेहच्या दूताने तिश्बी एलीयाहला निरोप देऊन म्हटले, “वर जा आणि शोमरोनाच्या राजाच्या दूतांना भेट आणि त्यांना विचार, ‘इस्राएलमध्ये परमेश्वर नाही की काय, म्हणून तुम्ही एक्रोनचे दैवत बाल-जबूब याला विचारावयास निघाले आहात?’

  13. म्हणून याहवेह हे म्हणतात की: ‘ज्या अंथरुणावर तू पडला आहेस, त्यावरून तू उठणार नाही. तू खात्रीने मरशील!’ ” मग एलीयाह निघून गेला.

  14. तुला व तुझ्या संतानाला नामानाचा कुष्ठरोग निरंतर लागून राहील.” तेव्हा गेहजी अलीशाच्या सान्निध्यातून निघून गेला आणि त्याच्या त्वचेवर कोड फुटले होते—आणि त्याची त्वचा हिमासारखी पांढरी झाली होती.

  15. यहोरामला एलीयाह संदेष्ट्याकडून एक पत्र मिळाले, त्यामध्ये लिहिले होते: “तुमचे पिता दावीदाचे परमेश्वर याहवेह असे म्हणतात: तुम्ही तुमचे पिता यहोशाफाट किंवा यहूदीयाचा राजा आसा यांच्या मार्गांचे अनुसरण केले नाही.

  16. परंतु तुम्ही इस्राएलच्या राजांच्या मार्गांचे अनुसरण केले आणि अहाबाच्या घराण्याने जसे केले त्याप्रमाणे तुम्ही यहूदीया आणि यरुशलेमच्या लोकांना व्यभिचार करावयाला लावले आहे. तुम्ही स्वतःच्या भावांची, स्वतःच्या कुटुंबातील लोकांची, तुमच्यापेक्षा चांगले असलेल्या पुरुषांचीही हत्या केली आहे.

  17. तर आता याहवेह तुमच्या लोकांवर, तुमच्या मुलांवर, तुमच्या स्त्रियांवर आणि तुमच्या सर्व गोष्टींवर जोरदार प्रहार करणार आहेत.

  18. तुमची आतडी बाहेर पडेपर्यंत तुम्ही आतड्यांसंबंधीच्या दीर्घकाळच्या आजाराने खूप त्रस्त व्हाल.”

  19. याहवेहनी यहोरामच्या विरुद्ध पलिष्टी लोकांचे आणि कूशी लोकांच्या जवळ राहणार्‍या अरब लोकांचे शत्रुत्व जागृत केले.

  20. त्यांनी यहूदीयावर हल्ला केला, त्यावर आक्रमण केले आणि राजाच्या राजवाड्यात सापडलेली सर्व मालमत्ता, त्याची मुले आणि स्त्रियांना घेऊन गेले. सर्वात धाकटा यहोआहाज याच्याशिवाय एकही पुत्र त्याच्याकडे राहिला नव्हता.

  21. हे सर्व झाल्यानंतर याहवेहनी यहोरामला आतड्यांच्या असाध्य आजाराने त्रस्त केले.

  22. याकाळाच्या दरम्यान, दुसऱ्या वर्षाच्या शेवटी या रोगामुळे त्याची आतडी बाहेर आली आणि तो अत्यंत वेदनांनी मरण पावला. त्याच्या लोकांनी त्याच्या सन्मानार्थ अंत्यसंस्कार केले नाहीत, जसे त्याच्या पूर्वजांसाठी केले होते.

  23. उज्जीयाह धूप जाळण्यासाठी त्याच्या हातात धूपदान घेऊन तयार होता, तो याजकांवर रागावला. याहवेहच्या मंदिरातील धूपवेदीसमोर पुजाऱ्यांवर तो रागावत असताना त्याच्या कपाळावर कुष्ठरोग आला.

  24. जेव्हा अजर्‍याह मुख्य याजक आणि इतर सर्व याजक यांनी त्याच्याकडे पाहिले, तेव्हा त्यांना त्याच्या कपाळावर कुष्ठरोग झाल्याचे दिसले, म्हणून त्यांनी त्याला त्वरित बाहेर काढले. निश्चितच, तो स्वतःहून तिथून निघून जाण्यास तयार झाला होता, कारण याहवेहनी त्याला पीडले होते.

  25. उज्जीयाह राजाला त्याच्या मृत्यूच्या दिवसापर्यंत कुष्ठरोग होता. एका वेगळ्या घरात तो राहत होता—कुष्ठरोगी असल्याने याहवेहच्या मंदिरात येण्यास त्याला बंदी होती. त्याचा पुत्र योथामकडे राजवाड्याचा कारभार होता आणि देशातील लोकांवर त्याने राज्य केले.