The Afflictions of the Wicked बद्दल बायबलमधील वचने: Produce slavish fear
Produce slavish fear बद्दल वचने
संकट व चिंता त्याला घाबरे करतात; हल्ला करण्यास सज्ज झालेल्या राजासारखे ती त्याला जेरीस आणतात,
क्षणार्धात त्यांच्या नाश होईल, भयानकता त्यांच्या वाट्याला येईल.
“हेशबोना, आकांत कर, कारण आय शहर नष्ट झाले आहे! राब्बाहच्या रहिवाशांनो, तुम्ही आक्रोश करा! गोणपाटाची वस्त्रे धारण करून विलाप करा; भिंतीच्या आत इकडे तिकडे धावाधाव करा, कारण त्याच्या सरदारांसह व पुजार्यांसह दैवत मोलेख बंदिवासात जाईल.
तुझ्या सर्व बाजूने मी तुझ्यावर भयंकर अनर्थ आणेन, असे प्रभू, सर्वसमर्थ याहवेह म्हणतात. तुझ्यातील प्रत्येकजण देशोघडीला लागेल, त्या फरारी लोकांना एकत्र करण्यास तिथे कोणीही नसेल.