मुख्य मजकुरावर जा

The Afflictions of the Wicked बद्दल बायबलमधील वचने: Are for examples to others

13 वचने · 20 पैलू

Are for examples to others बद्दल वचने

  1. परंतु स्वतः परमेश्वरच त्यांचा बाण मारतील; अचानक ते घायाळ होतील.

  2. परमेश्वर त्यांची जीभ त्यांच्याच विरुद्ध करतील आणि त्यांचा नाश करतील. जे सर्व त्यांना पाहतील, ते उपहासाने आपले डोके हालवतील.

  3. मग सर्व मानव घाबरतील; ते परमेश्वराच्या कृत्यांची थोरवी गातील; आणि त्यांनी केलेल्या चमत्काराविषयी मनन करतील.

  4. “मी अनेक राष्ट्रांचा नाश केला; त्यांच्या गडांना उद्ध्वस्त केले आहे. मी त्यांचे रस्ते ओसाड केले आहेत तिथून कोणीही प्रवास करीत नाही. आणि त्यांची शहरे निर्जन केली आहेत; ते त्यागलेले व रिकामे झाले आहेत.

  5. यरुशलेमबद्दल मी विचार केला, ‘निश्चितच तू माझे भय धरशील; आणि माझ्या सुधारणांचा स्वीकार करशील!’ तेव्हा तिचे आश्रयस्थान उद्ध्वस्त होणार नाही. माझ्या सर्व शिक्षा तिच्यावर येणार नाहीत, पण तरीही पूर्वीसारखीच भ्रष्टाचारी दुष्कर्मे करण्यास ती उत्सुक आहे.”

  6. हे सर्व असूनही, परमेश्वर त्या बहुतेकांविषयी संतुष्ट नव्हते; त्यामुळे त्यांची शरीरे अरण्यात विखुरली गेली.

  7. आता ज्यागोष्टी घडल्या, त्या आपल्याला उदाहरणादाखल आणि आपण त्यांच्याप्रकारे आपली हृदये वाईट गोष्टींवर केंद्रित करू नयेत म्हणून घडल्या.

  8. त्यांच्यातील काही मूर्तिपूजक होते, तसे तुम्ही होऊ नका. असे लिहिले आहे: “लोकांनी बसून खाणेपिणे केले व उठून चैनबाजीची मजा घेऊ लागले.”

  9. त्याचप्रमाणे त्यांच्यातील काही लोकांनी लैंगिक अनीतीला वाव दिला, तसे आपण करू नये आणि एका दिवसात तेवीस हजार लोक मरण पावले.

  10. आपण ख्रिस्ताची परीक्षा पाहू नये, जशी त्यांच्यातील काहीजणांनी पाहिली आणि ते सर्पदंशाद्वारे मरण पावले.

  11. आणि कुरकुर करू नका, जशी त्यांच्यापैकी काहींनी केली आणि ते नाश करणार्‍या दूताच्या हातून मरण पावले.

  12. आता या गोष्टी त्यांच्यासाठी उदाहरणादाखल झाल्या आणि ज्या आपणावर युगाचा शेवट येऊन ठेपला आहे, त्या आपल्याला इशारा म्हणून लिहून ठेवण्यात आल्या आहेत.

  13. पुढे येणार्‍या अनीतिमानास उदाहरण देण्यासाठी सदोम व गमोरा ही नगरे भस्म करून त्यांची राख केली व त्यांनी त्यांना विध्वंसाची शिक्षा केली.