मुख्य मजकुरावर जा

The Afflictions of the Wicked बद्दल बायबलमधील वचने

95 वचने · 20 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. त्यामुळेच त्याचे परमेश्वर याहवेहनी त्याला अरामच्या राजाच्या हाती सोपविले. अरामी लोकांनी त्याचा पराभव केला आणि त्याच्या अनेक लोकांना कैद करून दिमिष्क येथे आणले. त्याला इस्राएलच्या राजाच्या हातीही सोपविले, ज्याने त्याला भारी हानी पोहोचविली.

  2. रमाल्याह याचा पुत्र पेकहने एका दिवसात यहूदीयामधील एक लाख वीस हजार सैनिकांना ठार केले—कारण यहूदीयाच्या लोकांनी त्यांच्या पूर्वजांचे परमेश्वर याहवेहचा त्याग केला होता.

  3. एफ्राईम येथील योद्धा जिक्रीने राजाचा पुत्र मासेयाह, राजवाड्याचा प्रभारी अधिकारी अज्रीकाम आणि राजाच्या नंतरचा सर्वात उच्चाधिकारी एलकानाह यांना ठार मारले.

  4. इस्राएली लोकांनी यहूदीया येथून आलेल्या त्यांच्या बंधूइस्राएली लोकांमधून दोन लाख स्त्रिया, पुत्र आणि कन्यांना कैद केले. त्यांनी पुष्कळ लूट घेतली व ती शोमरोनला नेली.

  5. त्याच्या संकटकाळात राजा आहाज याहवेहबरोबर आणखीच अविश्वासू झाला.

  6. “पण सर्व सुरळीत झाले की, ते परत तुमच्या नजरेत पाप करू लागले. मग तुम्ही त्यांना नाकारून, त्यांच्या शत्रूच्या हाती दिले, जे त्यांच्यावर शासन करीत. आणि जेव्हा ते परत तुमचा धावा करीत, तेव्हा तुम्ही तो स्वर्गातून ऐकून तुमच्या करुणेने त्यांना वेळोवेळी सोडवित असत!

  7. “त्यांनी तुमच्या आज्ञांकडे परत वळावे म्हणून तुम्ही त्यांना ताकीद दिली, पण ते गर्विष्ठ झाले व त्यांनी तुमच्या आज्ञा मोडल्या. त्यांनी तुमच्या आदेशाविरुद्ध पाप केले, ज्यात तुम्ही म्हटले होते, ‘जो या आदेशानुसार वागेल तो मनुष्य जगेल.’ दुराग्रहाने त्यांनी तुमच्याकडे पाठ फिरविली, गर्विष्ठ बनले व तुमचे ऐकण्याचे नाकारले.

  8. दुष्ट मनुष्य त्याच्या सर्व आयुष्यभर, तर निर्दयी मनुष्य त्याच्यासाठी राखलेली सर्व वर्षे यातना सहन करतो.

  9. संकट व चिंता त्याला घाबरे करतात; हल्ला करण्यास सज्ज झालेल्या राजासारखे ती त्याला जेरीस आणतात,

  10. “जरी दुष्टपणा त्याच्या जिभेला गोडवा देते आणि तो आपल्या जिभेखाली ते दाबून ठेवतो,

  11. ती चव नाहीशी होऊ नये असे त्याला वाटते म्हणून हळूहळू चघळत राहतो,

  12. तरीही त्याने खाल्लेले अन्न त्याच्या पोटात आंबट होऊन त्याला पचत नाही; त्याच्या पोटात ते सापाच्‍या विषासारखे होईल.

  13. गिळून घेतलेली सर्व संपत्ती त्याला थुंकावी लागणार; परमेश्वरच त्याच्या पोटातून त्याला ते ओकायला लावेल.

  14. तो सापाचे विष चोखून घेईल; विषारी सापाचा दंश त्याला जिवे मारेल.

  15. मधाने भरलेल्या नद्या आणि झरे जे लोण्याच्‍या प्रवाहाने वाहतात, त्यांचा उपभोग त्याला घेता येणार नाही.

  16. ज्यासाठी त्याने परिश्रम केले, त्याची चव त्याला मिळणार नाही; त्याच्या व्यापाराचा नफा त्याला मिळणार नाही.

  17. “तरी दुष्टांचा दिवा कितीदा विझला जातो? आणि कितीदा त्यांच्यावर विपत्ती येते, परमेश्वर त्यांच्यावर आपला क्रोध कितीदा आणतात?

  18. दुर्जनांवर अनेक दुःखे येतात. परंतु जे याहवेहवर विश्वास ठेवतात, त्यांच्याभोवती त्यांच्या अक्षयप्रीतीचे वेष्टण असते.

  19. प्रभू दुष्टांवर हसत आहे, कारण त्यांना माहीत आहे की त्यांचा दिवस येत आहे.

  20. परमेश्वर प्राचीन काळापासून राजासनारूढ आहेत, जे बदलत नाहीत— ते त्यांचे ऐकतील व त्यांना नम्र करतील, कारण त्यांना परमेश्वराचे भय नाही. सेला

  21. परंतु स्वतः परमेश्वरच त्यांचा बाण मारतील; अचानक ते घायाळ होतील.

  22. परमेश्वर त्यांची जीभ त्यांच्याच विरुद्ध करतील आणि त्यांचा नाश करतील. जे सर्व त्यांना पाहतील, ते उपहासाने आपले डोके हालवतील.

  23. मग सर्व मानव घाबरतील; ते परमेश्वराच्या कृत्यांची थोरवी गातील; आणि त्यांनी केलेल्या चमत्काराविषयी मनन करतील.

  24. म्हणून त्यांचे लोक त्यांच्याकडे वळतात, आणि ते विपुल प्रमाणात पाणी पितात.

  25. क्षणार्धात त्यांच्या नाश होईल, भयानकता त्यांच्या वाट्याला येईल.