मुख्य मजकुरावर जा

Jehoram

16 वचने · 10 कुटुंब सदस्य

हे नावानेही ओळखले जाते: Joram

Jehoram चा उल्लेख असलेली वचने

  1. त्यानंतर यहोशाफाट आपल्या पूर्वजांबरोबर विसावा पावला आणि त्याला त्यांच्याबरोबर त्याचा पिता दावीदाच्या शहरात पुरले. आणि त्याचा पुत्र यहोराम त्याचा वारस म्हणून राजा झाला.

  2. मग यहोराम आपले रथ घेऊन साईर येथे गेला. ज्या एदोमी लोकांनी त्याला आणि त्याच्या रथाच्या नायकांना घेरले होते, रात्रीच्या वेळी उठून त्याने वेढा मोडून टाकला. आणि लोक आपल्या डेर्‍यांत पळून गेले.

  3. यहोरामाच्या बाकीच्या कामगिरीचा तपशील आणि त्याची सर्व कामे यहूदीयाच्या राजांच्या इतिहास या ग्रंथात केलेली नाही काय?

  4. यहोराम त्याच्या पूर्वजांबरोबर विसावा पावला आणि तो त्यांच्याबरोबर दावीदाच्या नगरात पुरला गेला आणि वारस म्हणून त्याचा पुत्र अहज्याह राजा झाला.

  5. परंतु यहोराम राजाची कन्या आणि अहज्याहची बहीण यहोशेबाने अहज्याहचा पुत्र योआशला घेतले आणि ज्या राजपुत्रांची कत्तल करण्यात येणार होती त्यामधून त्याला चोरले. त्याला आणि त्याच्या दाईला विश्रांतिगृहात अथल्याहपासून लपवून ठेवले; म्हणून त्याचा वध झाला नाही.

  6. तेव्हा यहूदीयाचा राजा यहोआशने आपले पूर्वज म्हणजे—यहोशाफाट, यहोराम, अहज्याह या यहूदीयाच्या राजांनी—आणि त्याने स्वतः समर्पित केलेल्या भेटवस्तू आणि याहवेहच्या मंदिरातील राजवाड्याच्या खजिन्यातील सर्व सोने त्याने अरामचा राजा हजाएलकडे पाठवून दिले. मग तो यरुशलेममधून निघून गेला.

  7. त्याचा पुत्र यहोराम, त्याचा पुत्र अहज्याह, त्याचा पुत्र योआश,

  8. त्यानंतर यहोशाफाट आपल्या पूर्वजांबरोबर विसावा पावला आणि त्याला त्यांच्याबरोबर दावीदाच्या शहरात पुरले. आणि त्याचा पुत्र यहोराम त्याचा वारस म्हणून राजा झाला.

  9. त्यांच्या वडिलांनी त्यांना सोन्या-चांदीच्या अनेक भेटवस्तू आणि सोने, मौल्यवान वस्तू, तसेच यहूदीयामधील तटबंदीची शहरे दिली होती, परंतु त्याने यहोरामला राज्य दिले कारण तो त्याचा प्रथमपुत्र होता.

  10. जेव्हा यहोरामने त्याच्या वडिलांच्या राज्यावर स्वतःला ठामपणे प्रस्थापित केले, तेव्हा त्याने इस्राएलच्या काही अधिकाऱ्यांसह त्याच्या सर्व भावांना तलवारीने मारले.

  11. जेव्हा यहोराम राजा झाला, तेव्हा त्याचे वय बत्तीस वर्ष होते, त्याने यरुशलेमवर आठ वर्षे राज्य केले.

  12. मग यहोराम आपले अधिकारी व सर्व रथ घेऊन साईर येथे गेला. रात्रीच्या वेळी त्याने उठून ज्या एदोमी लोकांनी त्याला आणि त्याच्या रथाच्या नायकांना घेरले होते, परंतु रात्रीच्या वेळी उठून त्याने वेढा मोडून टाकला.

  13. याहवेहनी यहोरामच्या विरुद्ध पलिष्टी लोकांचे आणि कूशी लोकांच्या जवळ राहणार्‍या अरब लोकांचे शत्रुत्व जागृत केले.

  14. यरुशलेमच्या लोकांनी यहोरामचा धाकटा मुलगा अहज्याहला त्याच्या जागी राजा केले, कारण हल्ला करणारे जे लोक अरब लोकांबरोबर छावणीमध्ये आले होते त्यांनी सर्व थोरल्या मुलांचा वध केला होता, म्हणून यहूदीयाचा राजा यहोरामचा पुत्र अहज्याहने राज्य करण्यास सुरुवात केली.

  15. परंतु यहोशेबा, यहोराम राजाची कन्या हिने अहज्याहचा पुत्र योआश याला घेतले आणि ज्या राजपुत्रांची कत्तल करण्यात येणार होती त्यामधून त्याला चोरले. आणि त्याला आणि त्याच्या दाईला एका विश्रांतिगृहात ठेवले. कारण यहोराम राजाची कन्या आणि याजक यहोयादाची पत्नी, यहोशेबा ही अहज्याहची बहीण होती, म्हणून तिने मुलाला अथल्याहपासून लपवून ठेवले. त्यामुळे ती त्याचा वध करू शकली नाही.

  16. आसा यहोशाफाटाचा पिता, यहोशाफाट योरामाचा पिता, योराम उज्जीयाहचा पिता,