Arabians बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
याहवेहनी यहोरामच्या विरुद्ध पलिष्टी लोकांचे आणि कूशी लोकांच्या जवळ राहणार्या अरब लोकांचे शत्रुत्व जागृत केले.
त्यांनी यहूदीयावर हल्ला केला, त्यावर आक्रमण केले आणि राजाच्या राजवाड्यात सापडलेली सर्व मालमत्ता, त्याची मुले आणि स्त्रियांना घेऊन गेले. सर्वात धाकटा यहोआहाज याच्याशिवाय एकही पुत्र त्याच्याकडे राहिला नव्हता.
अरेबियाविरुद्ध भविष्यवाणी: ददानी काफिल्यांनो, तुम्ही जे अरेबियाच्या अरण्यात वसती करता,
तुम्ही, तेमा येथे राहणाऱ्यांनो, तहानलेल्यांसाठी पाणी घेऊन या; पलायन केलेल्यांसाठी अन्न घेऊन या.
ते तलवारीपासून पळतात म्यानातून उपसलेल्या तलवारीपासून ते पळतात, वाकवून नेम धरलेल्या धनुष्यापासून आणि युद्धाच्या कठोरतेपासून पळतात.
प्रभू मला असे म्हणतात: “एका वर्षाच्या आत, कराराने बांधलेला सेवक जसे एकएक दिवस मोजत असतो, तसे केदारचे सर्व वैभव नाहीसे होईल.
केदारचे वाचलेले धनुर्धारी, योद्धे थोडेच असतील.” इस्राएलचे परमेश्वर, याहवेह असे बोलले आहेत.