Skip to content

Kedar

9 verses

27.4000, 37.7000 गूगल नकाशावर पाहा

Kedar चा उल्लेख असलेली वचने

  1. धिक्कार असो माझा, जर मी मेशेख हे माझे निवासस्थान केले, वा केदार येथे माझा डेरा घातला!

  2. अहो यरुशलेमच्या कन्यांनो, मी सावळी असूनही सुंदर आहे, केदारच्या काळ्या तंबूसारखी, शलोमोनच्या डेर्‍याच्या पडद्यासारखी.

  3. प्रभू मला असे म्हणतात: “एका वर्षाच्या आत, कराराने बांधलेला सेवक जसे एकएक दिवस मोजत असतो, तसे केदारचे सर्व वैभव नाहीसे होईल.

  4. केदारचे वाचलेले धनुर्धारी, योद्धे थोडेच असतील.” इस्राएलचे परमेश्वर, याहवेह असे बोलले आहेत.

  5. अरण्यात व त्याभोवती असणाऱ्या नगरांचे आवाज उंचावू दे; जिथे केदारचा रहिवास आहे, त्या वस्त्या आनंद करोत. सेलाच्या लोकांनो हर्षगीते गा; त्यांना पर्वतशिखरावरून गर्जना करू दे.

  6. केदारचे सर्व कळप तुला दिले जातील व नबायोथचे मेंढे तुला सेवेसाठी देण्यात येतील; ते माझ्या वेद्यांवर अर्पण म्हणून मान्य केले जातील, आणि मी माझे गौरवशाली मंदिर सुशोभित करेन.

  7. समुद्राचा किनारा ओलांडून कित्तीम बेटाच्या तटावर जा आणि पाहा, केदारच्या वाळवंटात पाठवा व जवळून चौकशी करा; अशा प्रकारे कधी काही घडले का ते पहा:

  8. केदार व हासोरची राज्ये ज्यांच्यावर बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरने हल्ला केला त्याविषयी: याहवेह असे म्हणतात: “सज्ज व्हा, व केदारवर हल्ला करा आणि पूर्वेच्या लोकांना नष्ट करा.

  9. “ ‘अरबी लोक व केदारचे सर्व राजपुत्र तुझे ग्राहक होते; त्यांनी तुला कोकरे, एडके व बोकडे देऊन तुझ्याबरोबर व्यापार केला.