मुख्य मजकुरावर जा

The Excellency and Glory of the Church बद्दल बायबलमधील वचने

14 वचने · 19 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. “आपली दृष्टी वर कर आणि सभोवती पाहा: सर्व सभा एकत्र येऊन तुझ्याकडे येत आहे; तुझे पुत्र दूरवरून येत आहेत, तुझ्या कन्या कमरेवर उचलून आणण्यात येत आहेत.

  2. मग तू ते बघशील व उल्हासित होशील, तुझे अंतःकरण स्पंदेल व आनंदाने फुगून जाईल; सागराची संपत्ती तुझ्याकडे आणण्यात येईल, अनेक देशांची समृद्धी तुझ्याकडे येईल.

  3. उंटांचे काफिले तुझी भूमी व्यापतील, तरुण उंट मिद्यान व एफाह येथून येतील. आणि सर्व शबातून सोने व ऊद घेऊन तुझ्याकडे येतील. आणि याहवेहच्या स्तुतीची घोषणा केली जाईल.

  4. केदारचे सर्व कळप तुला दिले जातील व नबायोथचे मेंढे तुला सेवेसाठी देण्यात येतील; ते माझ्या वेद्यांवर अर्पण म्हणून मान्य केले जातील, आणि मी माझे गौरवशाली मंदिर सुशोभित करेन.

  5. “मेघाप्रमाणे उडणारे हे कोण आहे, जणू घरट्यांकडे परतणारी कबुतरे?

  6. निश्चितच द्वीप माझ्याकडे बघतात; सर्वात पुढे तार्शीशची गलबते आहेत, तुझी लेकरे दूरवरून तुझ्याकडे आणत आहेत, त्यांनी आपले चांदी व सोनेही बरोबर आणले आहे, इस्राएलचे पवित्र परमेश्वर याहवेह, आमच्या परमेश्वराला गौरविण्यासाठी त्यांनी तुला ईश्वरदत्त तेजस्विता बहाल केली आहे.

  7. “परदेशी तुझ्या तटबंदीची पुनर्बांधणी करतील, राजे तुझी सेवा करतील. जरी मी माझ्या क्रोधाने तुला फटकारले, तरी आता कृपावंत होऊन मी तुझ्यावर दया करेन.

  8. तुझ्या वेशी सतत उघड्या राहतील, त्या रात्री वा दिवसा, बंद केल्या जाणार नाहीत, जेणेकरून अनेक देशातून लोक तुझ्याकडे संपत्ती आणू शकतील— त्यांचे राजे विजयोत्सवाने मिरवणूक चालवितील.

  9. जी राष्ट्रे वा देश तुझ्या अधीन होण्याचे नाकारतील, ती पूर्णपणे उद्ध्वस्त होतील.

  10. “लबानोनांचे वैभव तुझ्याकडे येईल, सुरू, देवदारू व भद्रदारू माझे पवित्रस्थान शोभिवंत करतील; आणि माझ्या पावलांचे स्थान गौरवशाली करतील.

  11. तुमच्यावर अत्याचार करणार्‍यांचे पुत्र येऊन तुला नमन करतील; जे सर्व तुझा तिरस्कार करीत, ते तुझ्या पायावर लोटांगण घालतील. ते तुला याहवेहचे शहर, आणि इस्राएलाच्या पवित्र परमेश्वराचे सीयोन असे म्हणतील.

  12. तू याहवेहच्या हातातील गौरवशाली मुकुट, आणि तुझ्या परमेश्वराच्या हातातील राजेशाही किरीट होशील.

  13. यापुढे तुला ते त्याग केलेली असे म्हणणार नाहीत, अथवा तुझ्या भूमीला ओसाड असे म्हणणार नाही. पण हेफसीबा हे तुझे नवे नाव असेल आणि तुझ्या भूमीला बिऊला म्हणतील; कारण याहवेहला तुझ्यामुळे आनंद होईल, आणि तुझी भूमी विवाहित होईल.

  14. जसा एक तरुण एका तरुणीशी विवाह करतो, तसाच तुझा निर्माणकर्ता तुझ्याशी विवाह करेल; जसा एखाद्या वराला आपल्या वधूविषयी आनंद होतो, तसाच तुझ्या परमेश्वराला तुझ्यामुळे आनंद होईल.