Skip to content

Seir

24 verses

30.7300, 35.6000 गूगल नकाशावर पाहा

Seir चा उल्लेख असलेली वचने

  1. आणि होरी लोकांच्या टोळीला सेईर डोंगरात मार देऊन रानाच्या हद्दीवर असलेल्या एल-पारान येथपर्यंत पिटाळून लावले.

  2. याकोबाने आता एदोम प्रांतातील सेईर प्रदेशात राहणारा आपला भाऊ एसाव, याच्याकडे आपले दूत पाठविले;

  3. म्हणून मी माझ्या स्वामींना विनंती करतो की, आपण आपल्या सेवकापुढे जावे. आम्ही त्यांच्यामागे त्यांना चालवेल तसे हळूहळू चालत येऊन सेईर येथे तुम्हाला भेटू.”

  4. तेव्हा एसाव त्याच दिवशी सेईरला परत जाण्यास निघाला.

  5. म्हणून एसावाने सेईरच्या (जे एदोम आहे) डोंगराळ प्रदेशात वस्ती केली.

  6. सेईरच्या डोंगराळ प्रदेशातील एदोमी लोकांचा मूळ पुरुष एसावच्या वंशजांची नावे अशी.

  7. दिशोन, एसर व दीशान.

  8. एदोम जिंकला जाईल; इस्राएलचा शत्रू सेईर सुद्धा जिंकला जाईल, पण इस्राएल बलवान होईल.

  9. तिथे डोंगराळ देशात राहणार्‍या अमोर्‍यांनी तुमच्यावर चाल करून मधमाश्यांप्रमाणे सेईरपासून होरमाहपर्यंत तुमचा पाठलाग केला व तुम्हाला मार दिला.

  10. लोकांना आदेश दे: ‘सेईर येथे राहणार्‍या एसावाच्या वंशजाच्या, म्हणजे त्यांच्या एदोमी भाऊबंदांच्या देशातून ते पुढे जाणार आहेत. तुमची त्यांना भीती वाटेल, म्हणून तुम्ही खबरदारी घ्या.

  11. म्हणून आम्ही सेईर येथे राहणाऱ्या एसावाच्या वंशातील भाऊबंदांच्या देशाला वळसा घालून दक्षिणेकडे एलाथ व एजिओन-गेबेरकडे जाणारा अराबाचा रस्ता पार करून उत्तरेकडे प्रवास करीत मोआब वाळवंटाकडे निघालो.

  12. पूर्वीच्या काळी होरी लोक सेईरमध्ये राहत असत, परंतु एसावाचे वंशज एदोमींनी त्यांना तिथून घालवून दिले व तिथे वस्ती केली. याहवेहने वतन दिलेल्या प्रदेशातून ज्याप्रमाणे इस्राएली लोकांनी तेथील लोकांना घालवून दिले होते त्याचप्रमाणे.)

  13. जेव्हा तिथे राहणार्‍या होरी लोकांना त्यांनी घालवून लावले व त्यांचा नाश केला. त्यांनी त्यांना हुसकावून लावले आणि आजपर्यंत त्यांच्या जागी ते वस्ती करून राहत आहेत, त्याचप्रमाणे सेईर येथे राहाणाऱ्या एसावाच्या वंशजांसाठीही याहवेहने असेच केले.

  14. सेईरमध्ये राहणारे एसावाचे वंशज आणि आरवासी मोआबी यांनी आमच्यासाठी केले—आम्ही यार्देन ओलांडून याहवेह आमचे परमेश्वर आम्हाला देत असलेल्या देशात जाईपर्यंत तुम्ही आमच्यासोबत करा.”

  15. तो म्हणाला: “याहवेह सीनाय पर्वतावरून आले आणि सेईरावर ते सूर्याप्रमाणे उदय पावले; पारान पर्वतावरून ते प्रकाशले. असंख्य पवित्र जनांचा समुदाय त्यांच्याबरोबर होता. दक्षिण दिशेने, त्यांच्या पर्वत उतरणीवरून ते खाली आले.

  16. सेईरच्या वाटेवरील हालाक डोंगरापासून हर्मोन पर्वताच्या पायथ्याशी लबानोनाच्या खोर्‍यात असलेल्या बआल-गादपर्यंतचा सर्व प्रदेश. त्यांच्या सर्व राजांना त्याने हस्तगत केले व त्यांना जिवे मारले.

  17. यार्देनेच्या पश्चिमेस असलेल्या लबानोन खोर्‍यातील बआल-गादपासून व सेईरास जाणार्‍या हालाक डोंगरापर्यंतच्या ज्या देशांच्या राजांवर यहोशुआ व इस्राएली लोकांनी विजय मिळविला ते हे आहेत. यहोशुआने त्यांचे प्रदेश इस्राएलांच्या गोत्रांना त्या गोत्रांच्या वाट्याप्रमाणे वतन म्हणून दिला.

  18. आणि इसहाकाला याकोब आणि एसाव हे दिले. एसावाला मी सेईरचा डोंगराळ प्रदेश वतन करून दिला, परंतु याकोब आणि त्याचे कुटुंब इजिप्त देशास गेले.

  19. “जेव्हा याहवेह तुम्ही सेईरातून बाहेर निघाले, जेव्हा तुम्ही एदोमाच्या भूमीतून चालत गेले, पृथ्वी थरारली, आकाशाने जल ओतले, ढगांनी जलबिंदू खाली ओतले.

  20. अम्मोनी आणि मोआबी लोक सेईर पर्वतावरील लोकांवर त्यांचा नाश करण्यासाठी आणि त्यांचा समूळ उच्छेद करण्यासाठी उठले. सेईर येथील माणसांची कत्तल करून झाल्यावर त्यांनी एकमेकांचा नाश करण्यास सुरुवात केली.

  21. अमस्याहने नंतर त्याचे सामर्थ्य वाढविले आणि त्याचे सैन्य क्षार खोर्‍यात नेले आणि तिथे त्याने सेईरच्या दहा हजार लोकांना ठार केले.

  22. अमस्याह जेव्हा एदोमी लोकांचा वध करून परत आला, तेव्हा त्याने सेईरच्या लोकांची दैवते सोबत आणली, त्यांच्यापुढे लवून नमन केले आणि त्यांच्यासाठी होमार्पणे केली.

  23. दूमाह विरुद्ध एक भविष्यवाणी: सेईरमधून कोणीतरी मला हाक मारत आहे, “रखवालदार, रात्र संपण्यास किती वेळ उरला आहे? रखवालदार, रात्र संपण्यास किती वेळ उरला आहे?”

  24. “सार्वभौम याहवेह असे म्हणतात: ‘मोआब आणि सेईर म्हणाले, “पाहा, यहूदाह तर इतर राष्ट्रांसारखाच झाला आहे,”