Beth-shemesh
हे नावानेही ओळखले जाते: Beth-shemite
31.7500, 34.9700 गूगल नकाशावर पाहा
Beth-shemesh चा उल्लेख असलेली वचने
तिथून ती बालाहाच्या पश्चिमेस वळसा घेऊन सेईर पर्वताकडे गेली आणि यआरीम म्हणजेच कसालोन डोंगराच्या उत्तरेस जाऊन बेथ-शेमेश इथे उतरून तिम्नाहास जाऊन पोहोचते.
एईन, युत्ताह आणि बेथ-शेमेश व त्यांची कुरणे, ही एकूण नऊ नगरे या दोन गोत्रांकडून दिली.
परंतु त्याच्यावर लक्ष ठेवा. जर ते आपली सीमा बेथ-शेमेशपर्यंत गेले तर याहवेहने हे मोठे संकट आपल्यावर आणले आहे. परंतु जर ते तसे गेले नाहीत, तर याहवेहच्या हाताने आम्हाला मारले नाही परंतु ते योगायोगाने घडून आले आहे.”
तेव्हा त्या गाई सरळ बेथ-शेमेशच्या रस्त्याने निघाल्या आणि जाताना संपूर्ण रस्त्यावर त्या हंबरत गेल्या; त्या उजवीकडे किंवा डावीकडे वळल्या नाहीत. पलिष्टी लोकांचे पुढारी त्यांच्यामागे बेथ-शेमेशच्या सीमेपर्यंत गेले.
यावेळेस बेथ-शेमेशचे लोक खोर्यात त्यांच्या गव्हाची कापणी करीत होते आणि जेव्हा त्यांनी आपली नजर वर केली आणि कोश पाहिला, तेव्हा तो पाहताच त्यांना आनंद झाला.
ती गाडी बेथ-शेमेश येथील यहोशुआच्या शेतात आली आणि तिथे ती एका मोठ्या खडकाजवळ जाऊन थांबली. लोकांनी त्या गाडीच्या लाकडाचे तुकडे केले आणि याहवेहसाठी होमार्पण म्हणून त्या गाईंचा यज्ञ केला.
लेवी लोकांनी याहवेहचा कोश व त्याबरोबरच्या त्या सोन्याच्या वस्तू ठेवलेली पेटी खाली उतरवून घेतल्या व त्यांनी त्या मोठ्या खडकावर ठेवल्या. त्या दिवशी बेथ-शेमेशच्या लोकांनी याहवेहसाठी होमार्पणे आणि यज्ञ केले.
आणि सोन्याच्या उंदरांच्या प्रतिमांची संख्या त्या पाच पुढार्यांच्या मालकीचे असलेले पलिष्टी नगरे; तटबंदीची नगरे व त्यांच्या गावांच्या संख्येनुसार होती. बेथ-शेमेशमधील यहोशुआच्या शेतात ज्या मोठ्या खडकावर लेवी लोकांनी याहवेहचा कोश ठेवला तो आजपर्यंत साक्ष म्हणून आहे.
परंतु परमेश्वराने बेथ-शेमेशमधील काही रहिवाशांवर प्रहार केला व सत्तर लोकांना मारून टाकले, कारण त्यांनी याहवेहच्या कोशात डोकावून पाहिले. आणि याहवेहने त्यांना मोठ्या दंडाने मारले म्हणून लोकांनी शोक केला.
आणि बेथ-शेमेश येथील लोकांनी विचारले, “याहवेहच्या उपस्थितीत, या पवित्र परमेश्वरासमोर कोणी उभे राहावे? येथून हा कोश पुढे कोणाकडे जाईल?”
बेन-देकेर हा माकाज, शालब्बीम, बेथ-शेमेश आणि एलोन-बेथ-हानान या प्रदेशांवर होता.
परंतु अमस्याहने ऐकले नाही, तेव्हा इस्राएलाचा राजा यहोआशने हल्ला केला. त्याने आणि यहूदीयाच्या राजा अमस्याहने यहूदीयातील बेथ-शेमेश येथे एकमेकांचा सामना केला.
इस्राएलाचा राजा यहोआशने यहूदीयाचा राजा अहज्याहचा पुत्र, योआशाचा पुत्र अमस्याहला बेथ-शेमेश येथे कैद केले. नंतर योआश यरुशलेमास गेला आणि यरुशलेमची एफ्राईमच्या दरवाजापासून कोपर्याच्या दरवाजापर्यंत भिंत त्याने पाडून टाकली; जी चारशे हात लांब होती.
आशान, युताह, बेथ-शेमेश सर्व त्यांच्या शिवारासह.
तेव्हा इस्राएलाचा राजा यहोआशने हल्ला केला. तो आणि यहूदीयाचा राजा अमस्याहने यहूदीयातील बेथ-शेमेश येथे एकमेकांचा सामना केला.
इस्राएलाचा राजा यहोआशने यहोआहाजचा पुत्र, योआशाचा पुत्र यहूदीयाचा राजा अमस्याहला बेथ-शेमेश येथे कैद केले. नंतर योआशाने त्याला यरुशलेमास आणले आणि यरुशलेमची एफ्राईमच्या दरवाजापासून कोपर्याच्या दरवाजापर्यंत भिंत त्याने पाडून टाकली; जी चारशे हात लांब होती.
त्यावेळेस पलिष्ट्यांनी डोंगर पायथ्याशी असलेल्या नगरांवर आणि यहूदीयाच्या नेगेवमधील गावांवर हल्ला केला. त्यांनी बेथ-शेमेश, अय्यालोन आणि गदेरोथ, तसेच सोकोह, तिम्नाह आणि गिम्झो आणि त्यांच्या आजूबाजूची गावे काबीज केली.