मुख्य मजकुरावर जा

Lebanon

56 verses

33.7500, 35.5900 गूगल नकाशावर पाहा

Lebanon चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. शलोमोन राजाने लबानोनाच्या लाकडाची ही पालखी; स्वतःसाठी बनविली आहे.

  2. माझ्या वधू, लबानोनाहून तू माझ्यासोबत ये, लबानोनाहून माझ्यासोबत ये, अमानाह डोंगराच्या माथ्यावरून, सनीर व हर्मोनच्या शिखरावरून, सिंहाच्या गुहांपासून आणि चित्ते वावरतात त्या डोंगरावरून खाली उतरून ये.

  3. माझ्या वधू, तुझे ओठ मधाच्या पोळ्याप्रमाणे मध गाळतात; दूध आणि मध तुझ्या जिभेखाली आहेत. तुझ्या वस्त्रांचा सुगंध लबानोनाच्या सुगंधासारखा आहे.

  4. या बागेतील पाण्याचा झरा, लबानोन पर्वतावरून खाली वाहणार्‍या वाहत्या पाण्याची विहीर अशी तू आहेस.

  5. त्याचे पाय शुद्ध सोन्याच्या कोंदणात बसविलेले संगमरवरी स्तंभच आहेत. त्याचे रूप लबानोनासारखे आहे, उत्तम देवदारूसारखे आहे.

  6. हस्तिदंती मनोर्‍यासारखी तुझी मान आहे. तुझे नयन बाथ-रब्बीमच्या वेशीकडे असलेल्या हेशबोनाच्या तळ्यासारखे आहे. तुझे नाक जणू काही लबानोन येथील, जे दिमिष्कच्या दिशेला असलेल्या बुरुजासारखे रेखीव आहे.

  7. लबानोनाचे सर्व उंच व भव्य गंधसरू आणि बाशान येथील एलावृक्ष,

  8. ते कुऱ्हाडीने जंगलातील झाडेझुडपांचे रान कापून टाकतील; लबानोन प्रतापी परमेश्वरासमोर पडेल.

  9. लबानोनची सनोवरची झाडे आणि गंधसरूसुद्धा आनंद व्यक्त करतात आणि म्हणतात, “आता तुम्हाला खाली पाडले आहे, तेव्हापासून आम्हाला तोडण्यासाठी कोणी आलेले नाही.”

  10. लबानोनचा थोड्याच वेळात सुपीक भूमीत बदल होणार नाही का, आणि सुपीक भूमी जंगलासारखी होणार नाही का?

  11. भूमी शुष्क होत आहे आणि ओसाड झाली आहे, लबानोन शरमिंदा झाला आहे आणि कोमेजला आहे; शारोनची कुरणे अरबी वाळवंटसारखी झाली आहेत, आणि बाशान व कर्मेल त्यांची पाने गळून पडत आहेत.

  12. त्याच्या फुलोऱ्याचा स्फोट होईल; तो मोठा आनंद करेल आणि उल्हासाने ओरडेल. लबानोनचे गौरव, कर्मेल आणि शारोन यांचे वैभव त्याला दिले जाईल; ते याहवेहचे गौरव, आमच्या परमेश्वराची भव्यता पाहतील.

  13. तुझे दूत पाठवून तू प्रभूची चेष्टा केली. आणि तू म्हणतोस, ‘मी माझ्या अनेक रथांनी उंचच उंच पर्वतावर चढून गेलो, लबानोनच्या सर्वात उंच पर्वतावर गेलो. मी तिचे सर्वात उंच देवदारू तोडले, निवडक गंधसरू तोडले. मी तिच्या दुर्गम उंचीवर पोहोचलो तिच्या अत्यंत उत्तम जंगलात गेलो.

  14. लबानोनांच्या विशाल वनाची लाकडे वेदीच्या अग्नीसाठी पुरेशी नाहीत, तसेच होमार्पणासाठी तेथील असंख्य जनावरे सुद्धा पुरेशी नाहीत.

  15. “लबानोनांचे वैभव तुझ्याकडे येईल, सुरू, देवदारू व भद्रदारू माझे पवित्रस्थान शोभिवंत करतील; आणि माझ्या पावलांचे स्थान गौरवशाली करतील.

  16. लबानोनच्या खडकाळ घसरणीचा बर्फ कधी वितळतो का? दूरच्या स्त्रोतातून वाहत येणारे थंड पाणी कधी वाहण्याचे थांबते काय?

  17. कारण या यहूदीयांच्या राजवाड्यासंबंधी, याहवेह असे म्हणाले: “जरी तू मला गिलआद प्रांतासारखा आहे, व लबानोनच्या शिखरासारखा आहेस, मी निश्चितच तुझा विध्वंस करून तुला ओसाड आणि निर्जन नगरीसारखे करेन.

  18. “लबानोनात जा व विलाप करा, बाशानात तुमचा आवाज ऐकू आला पाहिजे, अबारीमाहून आरोळी मारा, कारण तुमचे सर्व मित्र चिरडले गेले आहेत.

  19. तुम्ही जे लबानोनच्या गंधसरूच्या राजवाड्यात रहिवास करीत होते, जेव्हा तुम्हाला वेदना सहन कराव्या लागतील तेव्हा तुम्ही तळमळाल; एखादी स्त्री प्रसूती वेदनांनी व्याकूळ होऊन तळमळते तसे तुमचे होईल!

  20. त्यांना म्हण, ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: ज्याचे पंख शक्तिशाली आहेत, लांब पिसांचा व निरनिराळ्या रंगाचा पिसारा असलेला एक गरुड लबानोनमध्ये आला व त्याने गंधसरूच्या टोकावरील फांदी पकडली,

  21. त्यांनी तुझ्या फळ्या सनीरच्या देवदारूच्या बनविल्या; त्यांनी लबानोनचे गंधसरू घेतले आणि डोलकाठी बनविली.

  22. अश्शूरला पाहा, लबानोनमधील एक गंधसरू असलेला, ज्याच्या सुंदर फांद्या जंगलास झाकून देत असत; तो सर्वात उंच वाढून, त्याचा शेंडा दाट झाडींच्या वर जातो.

  23. “ ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: त्या दिवशी तो मृतलोकात आणला गेला, त्याच्यासाठी शोक करावा म्हणून खोल समुद्र मी झाकून टाकला; मी त्याचे प्रवाह थांबविले, आणि त्याचे विपुल पाणी मी रोखून ठेवले. त्याच्यामुळे मी लबानोनला दुःखित केले आणि रानातील प्रत्येक झाड वाळून गेले.

  24. गर्तेत जाणार्‍यांबरोबर त्याला मी अधोलोकात आणले, त्यात तो पडला तेव्हा त्याच्या आवाजाने राष्ट्रे थरथर कापले. तेव्हा एदेनातील सर्व झाडे, लबानोनातील सर्वोत्तम, पाण्याचा पुष्कळ पुरवठा असलेली झाडे, पृथ्वीच्या खाली सांत्वन पावले.

  25. मी इस्राएलला दहिवराप्रमाणे होईन. तो कुमुदिनीप्रमाणे फुलेल आणि त्याची मुळे लबानोनातील गंधसरूंच्या मुळांप्रमाणे जातील;