मुख्य मजकुरावर जा

Lebanon

56 verses

33.7500, 35.5900 गूगल नकाशावर पाहा

Lebanon चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. त्याच्या फांद्या पसरतील. त्याचे वैभव एका जैतून वृक्षासारखे होईल. त्याचा सुगंध लबानोनातील गंधसरू सारखा होईल.

  2. लोक परत त्यांच्या छायेत विश्रांती घेतील; ते धान्यासारखे पुनरुज्जीवित होतील, द्राक्षवेलीप्रमाणे ते फळे देतील— इस्राएलची प्रसिद्धी लबानोनच्या द्राक्षारसाप्रमाणे होईल.

  3. ते समुद्रास फटकारतात आणि तो शुष्क होतो; ते सर्व नद्यांना कोरडे करतात. बाशान व कर्मेल मलूल होतात; लबानोनचा मोहोर कोमेजतो.

  4. लबानोनमध्ये तुम्ही केलेला हिंसाचार तुम्हाला व्याकूळ करेल, आणि तुम्ही केलेला प्राण्यांचा नाश तुम्हाला भयभीत करेल, कारण तुम्ही मनुष्याचे रक्त वाहिले आहे; तुम्ही देश व नगरांचा आणि त्यात राहणाऱ्या प्रत्येकाचा नाश केला आहे.

  5. मी त्यांना इजिप्तमधून परत आणेन, आणि अश्शूरातून एकत्र गोळा करेन. गिलआद व लबानोनमध्ये त्यांचे पुनर्वसन करेन, आणि तिथे त्यांना जागा पुरेशी होणार नाही.

  6. हे लबानोना, आपल्या वेशी उघड, म्हणजे अग्नी तुझ्या गंधसरूच्या वृक्षांना भस्म करेल!