मुख्य मजकुरावर जा

Treaty बद्दल बायबलमधील वचने: Cession of territory by

6 वचने · 4 पैलू

Cession of territory by बद्दल वचने

  1. शेवटच्या वीस वर्षात शलोमोनने याहवेहचे मंदिर आणि राजमहाल या दोन इमारतींचे बांधकाम केले.

  2. शलोमोन राजाने सोरचा राजा हीराम याला गालील प्रांतातील वीस नगरे दिली, कारण त्याने हवे असलेले सर्व गंधसरू, देवदारू, आणि सोने शलोमोनला पुरविले होते.

  3. परंतु जेव्हा शलोमोनने त्याला दिलेली नगरे पाहण्यासाठी हीराम सोरवरून गेला, ते पाहून त्याला समाधान झाले नाही.

  4. तेव्हा तो म्हणाला, “माझ्या भावा, ही कशी नगरे तू मला दिलीस?” आणि त्याने त्यास काबूल प्रांत असे नाव दिले, ते नाव आजही प्रचलित आहे.

  5. हीरामाने राजाकडे एकशेवीस तालांत सोने पाठवले होते.

  6. बेन-हदाद म्हणाला, “माझ्या पित्याने जी शहरे आपल्या पित्याकडून घेतली ती सर्व मी आपणास परत करेन. माझ्या पित्याने जशा शोमरोनात वसविल्या तशाच बाजारपेठा आपण दिमिष्कात वसवा.” अहाब म्हणाला, “या करारावर मी तुला मोकळे करतो.” म्हणून त्याने त्याच्याशी करार केला व त्याला सोडून दिले.