मुख्य मजकुरावर जा

Bathshua

12 वचने · 7 कुटुंब सदस्य

हे नावानेही ओळखले जाते: Bathsheba, Bath, Bath-shua

"Bathshua" साठी शोधा

Bathshua चा उल्लेख असलेली वचने

  1. दावीदाने तिच्याबद्दल चौकशी करण्यासाठी कोणा एकाला पाठवले. तो मनुष्य म्हणाला, “ती एलीयामची कन्या, हिथी उरीयाहची पत्नी, बथशेबा आहे.”

  2. नंतर दावीदाने आपली पत्नी बथशेबा हिचे सांत्वन केले आणि तो तिच्याकडे गेला आणि त्याने तिच्याशी प्रीतिसंबंध केला. तिने एका पुत्राला जन्म दिला आणि त्यांनी त्याचे नाव शलोमोन असे ठेवले. याहवेहने त्याच्यावर प्रीती केली;

  3. तेव्हा शलोमोनची आई बथशेबा हिला नाथानाने विचारले, “हग्गीथेचा पुत्र अदोनियाह हा आता राजा झाला आहे, हे तू ऐकले नाही काय? आणि दावीद आमचे धनी यांना याविषयी काहीच माहिती नाही?

  4. तेव्हा बथशेबा वृद्ध राजाला भेटण्यास त्यांच्या खोलीत गेली, तिथे शूनेमकरीण अबीशग त्यांची सेवा करीत होती.

  5. बथशेबाने राजासमोर लवून दंडवत घातले. राजाने विचारले, “तुला काय पाहिजे?”

  6. मग दावीद राजा म्हणाला, “बथशेबाला आत बोलवा,” तेव्हा ती राजाच्या उपस्थितीत येऊन उभी राहिली.

  7. तेव्हा बथशेबाने भूमीकडे आपले मुख लवून राजासमोर दंडवत घातले आणि म्हटले, “दावीद, माझे स्वामी सदा चिरायू होवोत!”

  8. हग्गीथेचा पुत्र अदोनियाह हा शलोमोनची आई बथशेबाकडे आला. बथशेबाने त्याला विचारले, “तू शांतीने आला आहेस काय?” त्याने उत्तर दिले “होय, मी शांतीने आलो आहे.”

  9. बथशेबा म्हणाली, “ठीक आहे, मी तुझ्या वतीने राजाशी बोलेन.”

  10. जेव्हा बथशेबा शलोमोन राजाकडे त्याच्याशी अदोनियाहसाठी बोलण्यास गेली, तिला पाहताच राजा तिला भेटण्यास उभा राहिला, त्याने तिच्यापुढे डोके लवविले. राजाच्या आईसाठी आसन मागविले आणि ती त्याच्या उजवीकडे बसली.

  11. यरुशलेममध्ये त्याला जे पुत्र झाले ते हे: शम्मुआ, शोबाब, नाथान, शलोमोन हे चार अम्मीएलाची कन्या बथशेबा हिच्यापासून झाले.

  12. संगीत दिग्दर्शकासाठी. दावीदाचे एक स्तोत्र. दावीद बथशेबाशी व्यभिचार केल्यावर नाथान संदेष्टा त्याच्याकडे आला तेव्हा. परमेश्वरा, तुमच्या प्रेमदयेमुळे माझ्यावर दया करा, तुमच्या महान करुणेनुसार माझे अपराध पुसून टाका.