- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
Prayer Under Affliction बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
हे याहवेह, आपले कान लावा आणि ऐका; याहवेह, आपले डोळे उघडा आणि पाहा; आणि जिवंत परमेश्वराचा उपहास करण्यास पाठविलेले सन्हेरीबचे शब्द ऐका.
आता हे याहवेह, आमच्या परमेश्वरा, त्याच्या तावडीतून आम्हाला सोडवा, म्हणजे याहवेह केवळ तुम्हीच परमेश्वर आहात, हे पृथ्वीवरील सर्व राज्यांना कळेल.”
आमच्या परमेश्वरा, तुम्ही त्यांचा न्याय करणार नाही का? कारण आमच्यावर हल्ला करणाऱ्या या विशाल सैन्याचा सामना करण्यासाठी आमच्याकडे शक्ती नाही. काय करावे हे आम्हाला कळत नाही, परंतु आमची दृष्टी तुमच्याकडे लागली आहे.”
“म्हणून आता, हे आमच्या महान, पराक्रमी व भयावह परमेश्वरा, तुम्ही तुमच्या प्रीतीचे वचन पाळता, म्हणून ज्या हालअपेष्टा आम्ही सहन केल्या, त्यांना तुमच्या नजरेत क्षुल्लक मानू नका—जी आमच्यावर, आमच्या राजांवर व अधिकार्यांवर, आमच्या याजक व संदेष्ट्यांवर, आमच्या पूर्वजांवर व तुमच्या सर्व लोकांवर, अश्शूरी राजाच्या राजवटीपासून आतापर्यंत संकटे आली.
“मला शिकवा आणि मी शांत बसेन; मी कुठे चुकलो ते मला सांगा.
मी परमेश्वराला म्हणेन: मला दोषी ठरवू नका, पण माझ्याविरुद्ध काय आरोप आहेत ते मला सांगा.
मी किती चुका आणि पाप केलेत? माझे पाप आणि माझे अपराध मला दाखवा.
तुम्ही आपले मुख का लपविता आणि मला आपला शत्रू का मानता?
मी पाहू शकत नाही ते मला शिकवा; मी जर अपराध केला आहे, तर मी तो पुन्हा करणार नाही.’
“आमचे कल्याण कोण करणार,” असे अनेकजण म्हणतात, हे याहवेह, तुमच्या चेहर्याचा प्रकाश आम्हावर पाडा.
मजवर दया करा, कारण हे याहवेह, मी दुर्बल आहे; मला रोगमुक्त करा, कारण माझ्या हाडात तीव्र वेदना होत आहेत.
हे याहवेह, माझे शत्रू माझा कसा छळ करतात ते पाहा! मजवर दया करा आणि मृत्यूच्या दारातून मला ओढून काढा,
याहवेह, तुम्ही दूर का उभे आहात? संकटसमयी तुम्ही स्वतःला का लपविता?
तुमच्या पंखांच्या छायेखाली तुमच्या डोळ्याच्या बुबुळाप्रमाणे माझे रक्षण करा;
मला ज्यांनी सर्व बाजूने घेरले आहे त्या माझ्या प्राणघातक शत्रूंपासून, जे दुष्ट लोक माझा नायनाट करण्यास तयार आहेत त्यांच्यापासून मला लपवा.
माझ्या अंतःकरणातील यातना दूर करा आणि माझ्या तीव्र मनोवेदनेतून मला मुक्त करा.
परमेश्वरा, इस्राएली राष्ट्राची, त्यांच्या सर्व त्रासातून मुक्तता करा!
याहवेह, मला तुमचे मार्ग शिकवा; माझी छळणूक करणाऱ्यांमुळे मला सरळ मार्गावर घेऊन चला.
याहवेह, माझ्या जीवनाचा अंत मला दाखवा आणि माझे किती दिवस बाकी आहेत हे मला दाखवून द्या; माझे आयुष्य किती क्षणभंगुर आहे ते मला कळू द्या.
माझ्या पातकांपासून माझे रक्षण करा; मला मूर्खांच्या थट्टेचा विषय होऊ देऊ नका.
तुमचा चाबूक माझ्यापासून दूर करा; तुमच्या हाताच्या प्रहाराने मी म्लान झालो आहे.
“याहवेह, माझी प्रार्थना ऐका; माझी मदतीची आरोळी ऐका; माझ्या अश्रूंकडे दुर्लक्ष करू नका. माझ्या सर्व पूर्वजांप्रमाणे या पृथ्वीवर प्रवास करणारा मी एक परदेशीय आणि वाटसरू आहे.
मी जाण्यापूर्वी, माझ्यावरची तुमची कडक नजर मजपासून फिरवा. जेणेकरून मी थोड्या काळासाठीच जीवनाचे सुख पुन्हा प्राप्त करू शकेन.”
संगीत दिग्दर्शकासाठी. दावीदाचे एक स्तोत्र. दावीद बथशेबाशी व्यभिचार केल्यावर नाथान संदेष्टा त्याच्याकडे आला तेव्हा. परमेश्वरा, तुमच्या प्रेमदयेमुळे माझ्यावर दया करा, तुमच्या महान करुणेनुसार माझे अपराध पुसून टाका.
आनंदाची व हर्षाची वाणी मला ऐकू द्या; म्हणजे तुम्ही चिरडलेली माझी हाडे प्रफुल्लित होतील.