मुख्य मजकुरावर जा

Prayer Under Affliction बद्दल बायबलमधील वचने: For deliverance

8 वचने · 17 पैलू

"Prayer Under Affliction" साठी शोधा

For deliverance बद्दल वचने

  1. माझ्या अंतःकरणातील यातना दूर करा आणि माझ्या तीव्र मनोवेदनेतून मला मुक्त करा.

  2. परमेश्वरा, इस्राएली राष्ट्राची, त्यांच्या सर्व त्रासातून मुक्तता करा!

  3. तुमचा चाबूक माझ्यापासून दूर करा; तुमच्या हाताच्या प्रहाराने मी म्लान झालो आहे.

  4. हे याहवेह, आमच्यावर प्रमाणाबाहेर रागावू नका; आमची पापे सदासर्वकाळ आठवू नका. हे याहवेह, आम्ही प्रार्थना करतो, आमच्यावर कृपादृष्टी करा, कारण आम्ही सर्व तुमचेच लोक आहोत.

  5. तुमची पवित्र शहरे ओसाड झाली आहेत; सीयोनही ओसाड झाले आहे, यरुशलेम तर उजाड रान झाले आहे.

  6. जिथे आमच्या पूर्वजांनी तुमची स्तुतिप्रशंसा केली, ते आमचे पवित्र व वैभवी मंदिर बेचिराख झाले आहे, आणि आम्ही जोपासलेल्या सर्व वस्तूंची राखरांगोळी झाली आहे.

  7. हे सर्व होऊनही याहवेह, आम्हाला साहाय्य करण्यास तुम्ही स्वतःस रोखणार? तुम्ही स्तब्ध राहून आम्हाला प्रमाणाबाहेर शिक्षा करणार काय?

  8. हे याहवेह, मला आरोग्य द्या, म्हणजे मी बरा होईन; माझे रक्षण करा, म्हणजे मी सुरक्षित राहीन, कारण मी केवळ तुमचेच स्तवन करतो.