- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
Chastity बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
काही वेळेनंतर योसेफ पोटीफराच्या पत्नीच्या डोळ्यात भरला व ती त्याला म्हणाली, “माझ्याशी समागम कर!”
योसेफाने तिला नाकारले. तो तिला म्हणाला. “हे पाहा, मी कारभारी असताना माझे धनी या घरातील कोणत्याही गोष्टीची काळजी करीत नाही, त्यांच्या मालकीचे सर्वकाही त्यांनी माझ्या हाती सोपविले आहे.
या घरामधे मला सर्वांपेक्षा अधिक अधिकार आहेत. तुम्ही त्यांची पत्नी आहात, तुम्हाला वगळून इतर प्रत्येक गोष्ट त्यांनी माझ्या हाती दिली आहे. तेव्हा असे दुष्कर्म मला कसे करता येईल? ते परमेश्वराविरुद्ध एक घोर पातक ठरेल.”
ती दिवसेंदिवस योसेफाला आग्रह करीत असली तरी त्याने तिच्यासोबत निजण्यास किंवा तिच्या सहवासात असण्याचे नाकारले.
एके संध्याकाळी दावीद त्याच्या बिछान्यावरून उठला आणि आपल्या राजवाड्याच्या गच्चीवर फिरू लागला. गच्चीवरून त्याने एका स्त्रीला स्नान करताना पाहिले. ती स्त्री फार सुंदर होती,
दावीदाने तिच्याबद्दल चौकशी करण्यासाठी कोणा एकाला पाठवले. तो मनुष्य म्हणाला, “ती एलीयामची कन्या, हिथी उरीयाहची पत्नी, बथशेबा आहे.”
तेव्हा दावीदाने दूत पाठवून तिला बोलावून घेतले. ती त्याच्याकडे आली आणि त्याने तिच्याशी शरीरसंबंध केला. (यावेळी ती तिच्या मासिक अशुद्धतेपासून शुद्ध होत होती.) नंतर ती परत तिच्या घरी गेली.
सुज्ञान तुझ्या अंतःकरणात प्रवेश करेल, आणि ज्ञान तुझ्या जीवाला सुखदायक वाटेल,
तेव्हा विवेक तुझे रक्षण करेल, आणि सुज्ञता तुझे राखण करेल.
सुज्ञान तुला व्यभिचारी स्त्रीपासूनसुद्धा वाचवेल, तिच्या लाडिक बोलण्याने तुला मोहात पाडणार्या स्त्रीपासून,
जिने आपला तारुण्यातील सहचारी सोडला आहे, आणि परमेश्वरासमोर केलेल्या कराराकडे दुर्लक्ष केले आहे.
निश्चितच तिच्या घराची वाट मृत्यूकडे नेते आणि तिचे मार्ग मृतांच्या आत्म्यांकडे घेऊन जातात.
तिच्याकडे जाणारा परत येत नाही किंवा जीवनाच्या मार्गावर येत नाही.
यासाठी तू चांगल्या लोकांच्या मार्गाने चालशील, आणि नीतिमानांच्या मार्गांचे अवलंबन करशील.
कारण सरळ मनाचे लोकच देशात वस्ती करतील, आणि निर्दोष लोक त्यात टिकून राहतील;
परंतु दुष्ट लोकांचा देशातून समूळ नायनाट होईल आणि तेथील अविश्वासू लोकांचे उच्चाटन केले जाईल.
तुझ्या स्वतःच्याच टाकीतील पाणी पी. तुझ्या स्वतःच्या विहिरीतील वाहते पाणी पी.
तुझे पाण्याचे झरे भरून रस्त्यांवर वाहून जावेत काय, तुझे पाण्याचे प्रवाह भर चौकात वाहावेत काय?
ते फक्त तुझ्यासाठीच असावेत, अनोळख्यांबरोबर ते कधीच वाटली जाऊ नयेत.
तुझे पौरुषत्व आशीर्वादित होवो; आपल्या तारुण्यातील पत्नीबरोबर आनंदाचा उपभोग घे.
प्रेमळ हरिणी सारखी, एक आकर्षक हरिणी अशी ती— तिचे स्तन तुला नेहमीच तृप्त करोत, तिच्या प्रेमाने तू नेहमी धुंद व्हावेस.
माझ्या मुला, तू दुसर्या मनुष्याच्या पत्नीबरोबर धुंद का व्हावेस? आणि स्वैर स्त्रीला आलिंगन का द्यावेस?
कारण तुझे मार्ग याहवेहच्या दृष्टीसमोर आहेत, आणि ते तुझ्या सर्व मार्गांचे परीक्षण करतात.
ते तुला तुझ्या शेजार्याच्या पत्नीपासून दूर ठेवतात, वाईट स्त्रीच्या लाडिक शब्दांपासून सांभाळतात.
तू मनात तिच्या सौंदर्याबद्दल वासना बाळगू नकोस, किंवा तिच्या नेत्रकटाक्षांमुळे तिला वश होऊ नकोस.