Chastity बद्दल बायबलमधील वचने: Preserved by wisdom
Preserved by wisdom बद्दल वचने
माझ्या मुला, माझी वचने जपून ठेव, आणि माझ्या आज्ञांचा तुझ्या अंतःकरणात संग्रह करून ठेव.
माझ्या आज्ञा पाळ म्हणजे तू जगशील; तुझ्या डोळ्यातील बाहुलीप्रमाणे माझ्या शिक्षणाचे रक्षण कर.
तुझ्या बोटांवर त्या बांधून ठेव; तुझ्या हृदयाच्या पटलावर त्या लिहून ठेव.
“तू माझी बहीण आहेस,” असे सुज्ञानाला, आणि “तू माझा नातेवाईक आहेस.” असे अंतर्ज्ञानाला म्हण.
म्हणजे व्यभिचारी स्त्रीपासून ते तुला दूर ठेवतील, वाईट स्त्रीच्या मोहक शब्दांपासून ते तुझे रक्षण करतील.