मुख्य मजकुरावर जा

Chastity बद्दल बायबलमधील वचने

60 वचने · 21 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. जर मागणी झालेल्या कुमारिकेशी एखादा मनुष्य आदरपूर्वक वागत नाही असे त्याला वाटले, आणि त्याच्या भावना अतितीव्र आहेत तर त्याने जे योग्य आहे ते करावे. त्यांनी लग्न करावे, केल्यास तो पाप करत नाही.

  2. परंतु एखाद्या माणसाचे मन स्थिर आहे व जो दडपणाखाली नाही व ज्याचा आपल्या शरीरावर ताबा आहे, त्याने कुमारिकेशी विवाह न करण्याचे ठरविले असेल, तर तो मनुष्य योग्य करतो.

  3. देहस्वभावाची कृत्ये उघड आहेत: लैंगिक अनैतिकता, अशुद्धता आणि दुर्व्यसनीपणा,

  4. मूर्तिपूजा आणि जादूटोणा, द्वेष, मतभेद, मत्सर, क्रोध, स्वार्थी इच्छा, कलह, तट,

  5. हेवा, दारुबाजी, गोंधळ आणि अशा प्रकारच्या गोष्टी ज्याबद्दल मी तुम्हाला पूर्वी सावध केले होते की जे कोणी असे जीवन जगतात त्यांना परमेश्वराच्या राज्याचे वतन मिळणार नाही.

  6. नंतर सीयोन पर्वतावर एक कोकरा उभा असलेला मी पाहिला. ज्यांच्या कपाळावर त्यांचे व त्यांच्या पित्याचे नाव लिहिले होते, असे 1,44,000 लोक त्याच्याबरोबर होते.

  7. मग मी स्वर्गातून तो मोठ्या धबधब्याच्या गर्जनेसारखा आणि मेघांच्या मोठ्या गडगडाटासारखा एक ध्वनी ऐकला. तो अनेक वीणावादक आपआपल्या वीणा वाजवित असल्यासारखा होता.

  8. लोकांचा हा अतिभव्य गायकवृंद परमेश्वराचे राजासन, चार सजीव प्राणी व चोवीस वडीलजन यांच्यासमोर एक नवे गीत गात होता. पृथ्वीवरून खंडणी भरून सोडविलेल्या या 1,44,000 लोकांशिवाय दुसर्‍या कोणालाही हे गाणे शिकता येत नव्हते.

  9. कारण त्यांनी स्वतःला शुद्ध राखलेले आहे आणि स्त्रीसंगाने ते मलीन झालेले नाहीत. जिथे कुठे कोकरा जातो, तिथे ते त्याच्यामागे जातात. त्यांना माणसातून विकत घेण्यात आले होते आणि परमेश्वराला व कोकर्‍याला प्रथमफळ म्हणून अर्पण केले होते.

  10. असत्य भाषण कधीही त्यांच्या मुखातून निघाले नाही; ते निष्कलंक आहेत.