मुख्य मजकुरावर जा

Solomon

275 वचने · 27 कुटुंब सदस्य

हे नावानेही ओळखले जाते: Jedidiah

Solomon चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. मग शलोमोन आपला पिता दावीद याच्या राजासनावर बसला आणि त्याचे राज्य बळकट असे स्थापित झाले.

  2. हग्गीथेचा पुत्र अदोनियाह हा शलोमोनची आई बथशेबाकडे आला. बथशेबाने त्याला विचारले, “तू शांतीने आला आहेस काय?” त्याने उत्तर दिले “होय, मी शांतीने आलो आहे.”

  3. तो पुढे म्हणाला, “शलोमोन राजा तुम्हाला मना करणार नाही; कृपया त्यांना विचार की त्यांनी शूनेमकरीण अबीशग ही मला पत्नी म्हणून द्यावी.”

  4. जेव्हा बथशेबा शलोमोन राजाकडे त्याच्याशी अदोनियाहसाठी बोलण्यास गेली, तिला पाहताच राजा तिला भेटण्यास उभा राहिला, त्याने तिच्यापुढे डोके लवविले. राजाच्या आईसाठी आसन मागविले आणि ती त्याच्या उजवीकडे बसली.

  5. शलोमोन राजाने त्याच्या आईला उत्तर दिले, “तू अदोनियाहसाठी शूनेमकरीण अबीशग हिची विनंती का करतेस? तू त्याच्यासाठी राज्य मागू शकतेस; शेवटी तो माझा थोरला भाऊ आहे; होय, त्याच्यासाठी आणि अबीयाथार याजक व जेरुइयाहचा पुत्र योआब यांच्यासाठी देखील मागू शकतेस!”

  6. तेव्हा शलोमोन राजाने याहवेहची शपथ घेतली: “अदोनियाहने ही जी विनंती केली आहे त्यासाठी त्याचा जीव देऊन त्याने किंमत मोजली नाही तर, परमेश्वर माझे पाहो आणि माझ्याशी अधिक कठोरपणे वागो!

  7. म्हणून शलोमोन राजाने यहोयादाचा पुत्र बेनाइयाह याला आज्ञा केली, आणि त्याने अदोनियाहवर वार केला आणि तो मेला.

  8. म्हणून शलोमोनने अबीयाथारला याहवेहच्या याजकपदावरून काढून टाकले, याप्रकारे एलीच्या घराण्याबद्दल याहवेहने शिलोह येथे बोललेले शब्द पूर्णतेस आले.

  9. शलोमोन राजाला सांगण्यात आले की योआब याहवेहच्या मंडपात पळून जाऊन वेदीच्या बाजूला आहे. तेव्हा शलोमोनने यहोयादाचा पुत्र बेनाइयाह याला हुकूम दिला, “जा, त्याच्यावर वार कर.”

  10. जेव्हा शलोमोनला सांगण्यात आले की शिमी यरुशलेमहून गथला गेला होता आणि परत आला आहे.

  11. परंतु शलोमोन राजा आशीर्वादित राहील आणि दावीदाचे राजासन याहवेहसमोर सदा सुरक्षित राहील.”

  12. तेव्हा यहोयादाचा पुत्र बेनाइयाह याला राजाने आज्ञा दिली आणि त्याने बाहेर जाऊन शिमीवर वार केला आणि तो मेला. आता शलोमोनच्या हातात राज्य प्रस्थापित झाले.

  13. शलोमोनने इजिप्तचा राजा फारोह याच्याशी सोयरीक केली व त्याच्या कन्येशी विवाह केला. त्याने तिला दावीदाच्या शहरात आणले आणि आपला राजवाडा, याहवेहचे मंदिर, यरुशलेमच्या सभोवतीचा कोट बांधून होईपर्यंत त्याने तिला तिथेच ठेवले.

  14. उच्च स्थानावर जाऊन यज्ञार्पणे करणे व धूप जाळणे, याशिवाय आपला पिता दावीदाने दिलेल्या सूचनांनुसार शलोमोन चालला व त्याने याहवेहवरील त्याची प्रीती व्यक्त केली.

  15. राजा गिबोन येथे यज्ञ करावयाला गेले, कारण ते सर्वात महत्त्वाचे उच्च स्थान होते आणि शलोमोनने त्या वेदीवर एक हजार होमार्पणे सादर केली.

  16. गिबोन येथे त्या रात्री याहवेहने शलोमोनला स्वप्नात दर्शन दिले आणि परमेश्वर म्हणाले, “मी तुला जे काही द्यावे असे तुला वाटते ते माग.”

  17. शलोमोनने उत्तर दिले, “आपला सेवक, माझे पिता दावीदाला आपण अपार दया दाखविली होती, कारण ते आपल्याशी विश्वासू होते, व हृदयाने नीतिमान व सरळ होते. आपण त्यांच्यावरील ही अपार दया पुढे चालू ठेवून आज त्यांच्या राजासनावर बसण्यासाठी त्यांना एक पुत्र दिला.

  18. शलोमोनाने हे मागितल्याने प्रभू परमेश्वर प्रसन्न झाले.

  19. नंतर शलोमोन जागा झाला; आणि त्याला कळले की ते एक स्वप्न होते. तो यरुशलेमास गेला आणि प्रभू परमेश्वराच्या कराराच्या कोशापुढे उभे राहून होमार्पणे व शांत्यर्पणे अर्पण केली. नंतर त्याने आपल्या दरबारात मोठी मेजवानी दिली.

  20. शलोमोन राजाने सर्व इस्राएलवर राज्य केले.

  21. शलोमोनने सर्व इस्राएलात बारा जिल्हाधिकारीही नेमले होते. ते राजाला आणि राजघराण्याला अन्नसामुग्री पुरवित असत. प्रत्येकाला वर्षातून एकदा, महिनाभर सामुग्री पुरवावी लागत असे.

  22. बेन-अबीनादाब हा नाफोथ दोर यावर (शलोमोनची कन्या ताफाथ हिच्याशी त्याचा विवाह झाला होता);

  23. अहीमाजकडे नफताली होते (त्याने शलोमोनची कन्या बासमाथ हिच्याशी विवाह केला होता);

  24. आणि फरात नदीपासून पलिष्ट्यांच्या देशापर्यंत आणि पुढे खाली इजिप्तच्या हद्दीपर्यंत या सर्व राज्यांवर शलोमोनचे राज्य होते. या सर्व राष्ट्रांनी शलोमोनला कर दिला व शलोमोनच्या सर्व आयुष्यभर ते त्याच्या अधीन राहिले.

  25. शलोमोनचा रोजचा पुरवठा तीस कोर सपीठ व साठ कोर पीठ,