मुख्य मजकुरावर जा

Solomon

275 वचने · 27 कुटुंब सदस्य

हे नावानेही ओळखले जाते: Jedidiah

Solomon चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. त्याची आई नफताली गोत्रातील एक विधवा होती आणि त्याचा पिता सोरचा होता, तो कास्याचे काम करण्यात निपुण कारागीर होता. हुराम सर्वप्रकारचे कास्याचे काम करण्यास ज्ञानाने, शहाणपणाने व विद्येने भरलेला होता. तो शलोमोन राजाकडे आला व त्याला नेमून दिलेली सर्व कामे केली.

  2. त्याने मडके आणि फावडे आणि शिंपडण्याचे भांडेही बनविले. हीरामाने याहवेहच्या मंदिरात शलोमोन राजासाठी हाती घेतलेले हे सर्व काम पूर्ण केले:

  3. भांडी, फावडे आणि शिंपडण्याच्या वाट्या. शलोमोन राजासाठी हीरामाने याहवेहच्या मंदिरातील बनविलेल्या या सर्व वस्तू उजळ कास्याच्या होत्या.

  4. शलोमोनने या सर्व वस्तूंचे वजन केले नाही, कारण ते पुष्कळ होते; कास्याचे वजन करणे शक्य नव्हते.

  5. याहवेहच्या मंदिरामध्ये असलेली उपकरणेसुद्धा शलोमोनाने तयार करून घेतली होती: सोन्याची वेदी; मेजावर समक्षतेची भाकर ठेवली होती;

  6. याहवेहच्या मंदिराचे सर्व काम शलोमोन राजाने पूर्ण केल्यानंतर, त्याने आपला पिता दावीदाने समर्पित केलेल्या वस्तू मंदिरात आणल्या; चांदी, सोने आणि पडदे; शलोमोनने त्या वस्तू याहवेहच्या मंदिराच्या भांडारात ठेवल्या.

  7. तेव्हा शलोमोन राजाने दावीदाचे नगर सीयोन येथून याहवेहच्या कराराचा कोश आणण्यासाठी इस्राएल लोकांच्या पुढाऱ्यांना, सर्व गोत्रप्रमुखांना आणि इस्राएली कुटुंबाच्या सर्व प्रमुखांना त्याच्यापुढे येण्यास यरुशलेमास बोलाविले.

  8. इस्राएलचे सर्व लोक एथानीम महिन्यात, म्हणजे सातव्या महिन्यातील सणाच्या काळात शलोमोन राजाकडे एकत्र आले.

  9. राजा शलोमोन आणि जमलेली इस्राएलची संपूर्ण मंडळी कोशासमोर इतक्या मेंढरांचा आणि गुरांचा बळी दिले की, त्यांची नोंद किंवा मोजणी करता येत नव्हती.

  10. तेव्हा शलोमोन म्हणाला, “याहवेहने म्हटले आहे की ते घनदाट मेघात राहतील;

  11. नंतर शलोमोनने इस्राएलच्या सर्व मंडळीदेखत याहवेहच्या वेदीसमोर उभे राहून वर स्वर्गाकडे आपले हात पसरले

  12. शलोमोनने वेदीसमोर गुडघे टेकून व स्वर्गाकडे हात पसरून याहवेहची प्रार्थना करून संपविल्यावर तो याहवेहच्या वेदीपुढून उठला.

  13. शलोमोनने शांत्यर्पणासाठी जी अर्पणे केली ती: बावीस हजार गुरे, एक लाख वीस हजार मेंढरे व बोकडे होती. याप्रकारे राजाने व सर्व इस्राएली लोकांनी याहवेहच्या मंदिराची प्रतिष्ठापना केली.

  14. तेव्हा शलोमोन आणि सर्व इस्राएली लोकांनी त्याच्याबरोबर त्यावेळी सण साजरा केला—एक मोठी मंडळी, म्हणजे लेबो हमाथपासून इजिप्तच्या खाडीपर्यंतचे रहिवासी आले होते. त्यांनी याहवेह आमच्या परमेश्वरापुढे सात दिवस व आणखी सात दिवस असे मिळून चौदा दिवस उत्सव साजरा केला.

  15. शलोमोनने जेव्हा याहवेहचे मंदिर व राजमहाल बांधण्याचे काम संपविले, आणि त्याला जे काही करावयाचे मनोरथ होते ते साधल्यानंतर,

  16. याहवेहने शलोमोनला जसे गिबोन येथे दर्शन दिले होते, तसे त्याला दुसर्‍यांदा दर्शन दिले.

  17. शेवटच्या वीस वर्षात शलोमोनने याहवेहचे मंदिर आणि राजमहाल या दोन इमारतींचे बांधकाम केले.

  18. शलोमोन राजाने सोरचा राजा हीराम याला गालील प्रांतातील वीस नगरे दिली, कारण त्याने हवे असलेले सर्व गंधसरू, देवदारू, आणि सोने शलोमोनला पुरविले होते.

  19. परंतु जेव्हा शलोमोनने त्याला दिलेली नगरे पाहण्यासाठी हीराम सोरवरून गेला, ते पाहून त्याला समाधान झाले नाही.

  20. शलोमोन राजाने ज्या मजुरांना याहवेहचे मंदिर, आपला स्वतःचा राजवाडा, स्तरीय बांधकाम, यरुशलेमचा तट आणि हासोर, मगिद्दो व गेजेर नगर बांधण्यासाठी कामावर लावले होते त्यांचा अहवाल अशाप्रकारे आहे.

  21. (इजिप्तचा राजा फारोहने गेजेरवर हल्ला करून ते ताब्यात घेतले होते. त्याने त्याला आग लावली व त्यातील कनानी रहिवाशांना मारून टाकले व ते नगर आपली कन्या, शलोमोनच्या पत्नीला तिच्या लग्नाची भेट म्हणून दिले.

  22. आणि शलोमोनने गेजेर नगराची पुनर्बांधणी केली.) त्याने खालचे बेथ-होरोन बांधले,

  23. त्याचप्रमाणे शलोमोनचे रथ व त्याचे घोडे यांच्यासाठी सर्व शहरे व नगरे; यरुशलेमात, लबानोनात आणि ज्या सर्व प्रदेशात त्याचे राज्य होते त्या हद्दींमध्ये त्याच्या मनास येईल ते त्याने बांधले.

  24. या लोकांचे वंशज जे देशात उरले होते त्यांनाही शलोमोनने सक्तीने गुलाम म्हणून भरती केले; हे ते लोक होते ज्यांना इस्राएली लोक पूर्णपणे नष्ट करू शकले नव्हते, आजवर हे तसेच आहेत.

  25. परंतु इस्राएली लोकांपैकी कोणावरही शलोमोनने गुलामी लादली नाही; ते त्याचे योद्धे, त्याचे सरकारी अधिकारी, सरदार, सेनापती व त्याच्या रथांचे व रथस्वारांचे अधिकारी होते.