मुख्य मजकुरावर जा

Solomon

275 वचने · 27 कुटुंब सदस्य

हे नावानेही ओळखले जाते: Jedidiah

Solomon चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. शलोमोनच्या जीवनभरात यहूदीया आणि इस्राएलचे लोक, दानपासून बेअर-शेबापर्यंत सुरक्षित होते, प्रत्येकजण आपआपल्या द्राक्षवेली व अंजिराच्या झाडाखाली होते.

  2. शलोमोनकडे रथाच्या घोड्यांसाठी चार हजार तबेले आणि बारा हजार घोडे होते.

  3. जिल्हाधिकारी आपआपल्या महिन्यात शलोमोन राजाला व त्यांच्या मेजावर भोजन करणार्‍यांसाठी अन्नसामुग्रींचा पुरवठा करीत असत. कशाचीही वाण पडणार नाही याची ते दक्षता घेत असत.

  4. परमेश्वराने शलोमोनला ज्ञान व समुद्रकाठच्या वाळूप्रमाणे मोजमाप काढता येत नाही इतके फार मोठे शहाणपण व अगाध समज दिली होती.

  5. पूर्वेकडील देशातील सर्व लोकांपेक्षा किंवा इजिप्तमधील सर्व ज्ञानापेक्षा शलोमोनचे ज्ञान फार मोठे होते.

  6. शलोमोनच्या ज्ञानाचे बोल ऐकायला सर्व राष्ट्रांतून लोक येत असत, ते जगातील सर्व राजे ज्यांनी शलोमोनच्या ज्ञानाविषयी ऐकले होते, त्यांच्याद्वारे पाठवले जात असत.

  7. त्याचे पिता दावीदाचा अभिषिक्त वारस म्हणून शलोमोनचा राज्याभिषेक झाला आहे असे जेव्हा सोरचा राजा हीरामाने ऐकले, तेव्हा त्याने शलोमोनकडे आपले राजदूत पाठवले, कारण दावीदाशी त्याचे नेहमीच मैत्रीचे संबंध होते.

  8. शलोमोनने हीरामास परत निरोप पाठवला:

  9. शलोमोनचा निरोप ऐकून हीरामाला अतिशय आनंद झाला व म्हणाला, “आज याहवेहची स्तुती असो, कारण या महान देशावर राज्य करण्यासाठी याहवेहने दावीदाला ज्ञानी पुत्र दिला आहे.”

  10. तेव्हा हीरामाने शलोमोनला निरोप पाठवला: “आपण पाठविलेला निरोप मला मिळाला. देवदारू व गंधसरूच्या लाकडाचा पुरवठा आपल्या मागणीनुसार पुरविला जाईल.

  11. याप्रकारे हीरामाने शलोमोनला हवे तेवढ्या गंधसरू आणि देवदारू लाकडांचा पुरवठा केला.

  12. आणि शलोमोनने हीरामाला त्याच्या घराण्यासाठी अन्न म्हणून वीस हजार कोर गहू, त्याचबरोबर वीस हजार कोर दाबून काढलेले जैतुनाचे तेल दिले. याप्रकारे शलोमोन वर्षानुवर्षे ते पाठवित राहिला.

  13. अभिवचन दिल्याप्रमाणे याहवेहने शलोमोनला ज्ञान दिले. हीराम आणि शलोमोन यांच्यात शांतीचे संबंध होते आणि त्या दोघांनी शांतीचा करार केला.

  14. शलोमोन राजाने सर्व इस्राएलातून तीस हजार पुरुष मजूर घेतले,

  15. डोंगराळ प्रदेशात शलोमोनचे सत्तर हजार ओझी वाहणारे आणि ऐंशी हजार दगड घडविणारे होते,

  16. त्याचप्रमाणे शलोमोनचे तीन हजार तीनशे मुकादम होते, जे प्रकल्पाची देखरेख करून कामगारांचे मार्गदर्शन करीत असत.

  17. शलोमोनचे आणि हीरामाचे कारागीर व गिबली येथील कामकर्‍यांनी मंदिर बांधण्यासाठी लाकूड व दगडे कापून तयार केली.

  18. इस्राएली लोक इजिप्त देशातून बाहेर पडल्यावर चारशे ऐंशी वर्षानंतर, इस्राएलवर शलोमोनच्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षात, दुसर्‍या महिन्यात; म्हणजेच सीव महिन्यात, शलोमोनने याहवेहचे मंदिर बांधण्यास सुरुवात केली.

  19. शलोमोन राजाने याहवेहसाठी जे मंदिर बांधले, त्याची लांबी साठ हात, रुंदी वीस हात आणि उंची तीस हात होती.

  20. तेव्हा याहवेहचे वचन शलोमोनकडे आले:

  21. शलोमोनने मंदिर बांधून पूर्ण केले.

  22. शलोमोनने मंदिराच्या आतील भागाला शुद्ध सोन्याचे आच्छादन घातले, आणि पवित्रस्थानाच्या समोरून आतील बाजूने सोन्याच्या साखळ्या आडव्या लावल्या, व त्यांना देखील सोन्याचे आवरण दिले.

  23. शलोमोनच्या राजवाड्याचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी तेरा वर्षे लागली.

  24. आणि ज्या राजवाड्यात तो राहणार त्याची रचना याच खोलीप्रमाणे होती. फारोहच्या ज्या कन्येशी त्याने विवाह केला होता तिच्यासाठी सुद्धा शलोमोनने याच खोलीसारखा राजवाडा बनविला.

  25. शलोमोन राजाने सोर येथून हीरामला बोलावून घेतले.