Nethinims बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
जे सर्वप्रथम स्वतःच्या वतनातील आपल्या नगरात राहण्यास आले, त्यातील काही इस्राएली, याजक, लेवी व मंदिराचे सेवक होते.
मंदिराचे सेवकांचे वंशज: झीहाचे, हसूफाचे, तब्बावोथचे,
मंदिराचे सेवक व शलोमोनच्या सेवकांचे वंशज एकूण 392.
इतर काही लोक आणि बाकीचे इस्राएल लोक जे आपआपल्या शहरात स्थायिक झाले होते त्यांच्याबरोबर याजक, लेवी, संगीतकार, द्वारपाल व मंदिरसेवक हे सुद्धा आपआपल्या नगरांत स्थायिक झाले.
काही इस्राएली लोक व तसेच याजक, लेवी, गायक, द्वारपाल व मंदिरातील सेवक यांनीही त्याच्याबरोबर प्रवास केला व ते अर्तहशश्त राजाच्या कारकिर्दीच्या सातव्या वर्षी यरुशलेमला पोहोचले.
मी अशीही आज्ञा देतो की याजक, लेवी, गायक, द्वारपाल, मंदिरात काम करणारे आणि मंदिरातील इतर कामगार यांच्यापासून कुठलाही कर, जकात वा चुंगी घेण्याचा तुला अधिकार नाही.
मी त्यांना कासिफ्या नावाच्या ठिकाणी असलेल्या यहूद्यांचा पुढारी इद्दो आणि मंदिरात काम करणारे त्याचे लेवीबंधू याजकडे अशी विनंती करण्यासाठी पाठविले की त्यांनी यरुशलेमातील आमच्या परमेश्वराच्या मंदिरातील सेवेसाठी सेवेकरी पाठवावेत.
दावीदाने व अधिकार्यांनी जे लेव्यांच्या सेवेसाठी नेमले होते, असे 220 मंदिरसेवकही आणले, ज्यांची नांवे नोंदण्यात आली.
ओफेलमध्ये राहणार्या मंदिराच्या सेवकांनी पूर्वेकडील पाण्याच्या वेशीपर्यंत कोटाची दुरुस्ती केली आणि बुरुजाचा पुढे आलेला भागही दुरुस्त केला.
सोनारांपैकी मल्कीयाहने मंदिराच्या सेवकांच्या व व्यापार्यांच्या घरांपर्यंतच्या निरीक्षण वेशीपर्यंतच्या आणि कोपर्यावरील वरच्या कोठडीपर्यंतच्या कोटाची दुरुस्ती केली.
मंदिराचे सेवक: खालील लोकांचे वंशज: झीहाचे, हसूफाचे, तब्बावोथचे,
मंदिराचे सेवक व शलोमोनच्या सेवकांचे वंशज एकूण 392.
इतर काही लोक आणि बाकीचे इस्राएली लोक जे आपआपल्या शहरात स्थायिक झाले होते त्यांच्याबरोबर याजक, लेवी, संगीतकार, द्वारपाल व मंदिरसेवक हे सुद्धा आपआपल्या नगरांत स्थायिक झाले. सातव्या महिन्यापर्यंत ते यरुशलेमला आपआपल्या नगरात स्थायिक झाले.
“बाकी सर्व—याजक, लेवी, द्वारपाल, संगीतकार, मंदिराचे सेवक आणि बाकीचे इतर सर्व, ज्यांनी आपल्या पत्नी व सज्ञान पुत्र व कन्या यांच्यासह, परमेश्वराच्या नियमासाठी स्वतःला सभोवतीच्या लोकांपासून वेगळे केले होते—
यरुशलेमला येणार्या प्रांताधिकार्यांच्या नावांची यादी पुढे दिली आहे (आता काही इस्राएली, याजक, लेवी, मंदिराचे सेवक व शलोमोनच्या सेवकांचे वंशज यहूदीयाच्या नगरात स्वतःच्या वतनांतच राहिले, प्रत्येकजण निरनिराळ्या नगरातील स्वतःच्या मालकीच्या भूमीवर स्थायी झाला.
तरी मंदिराची सेवा करणारे, ज्यांचे पुढारी झीहा व गिश्पा होते, ते सर्वजण ओफेल येथे राहत.