Skip to content

Zerubbabel

27 वचने · 12 कुटुंब सदस्य

हे नावानेही ओळखले जाते: Zorobabel, Sheshbazzar

Zerubbabel चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. पदायाहचे पुत्र: जरूब्बाबेल व शिमी. जरूब्बाबेलाचे पुत्र: मशुल्लाम, हनन्याह. त्याच्या कन्येचे नाव शेलोमीथ.

  2. कोरेश राजाने पर्शियाचा खजिनदार मिथ्रदाथला सूचना दिली की त्याने यहूदीयात परतणारा यहूद्यांचा पुढारी शेशबस्सरला सर्व वस्तू मोजून द्याव्या.

  3. अशा एकूण 5,400 सोने व चांदीच्या वस्तू होत्या. या सर्व वस्तू बंदिवासातील लोकांसह शेशबस्सरने बाबेल देशातून यरुशलेमला परत नेल्या.

  4. जरूब्बाबेल, येशूआ, नहेम्याह, सेरायाह, रेएलायाह, मर्दखय, बिलशान, मिस्पार, बिग्वई, रहूम व बाअनाह):

  5. नंतर योसादाकाचा पुत्र येशूआने आपल्या बरोबरीच्या याजकांना आणि शल्तीएलचा पुत्र जरूब्बाबेल व त्याच्या बंधूना बरोबर घेऊन इस्राएलांच्या परमेश्वराची वेदी पुन्हा बांधली आणि परमेश्वराचा मनुष्य मोशेच्या नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे वेदीवर होमार्पणे वाहिली.

  6. इस्राएली लोक यरुशलेमला परमेश्वराच्या भवनात आल्यानंतर दुसर्‍या वर्षाच्या दुसऱ्या महिन्यात मंदिराच्या बांधकामास सुरुवात झाली. शल्तीएलचा पुत्र जरूब्बाबेल, योसादाकाचा पुत्र येशूआ व त्यांच्याबरोबर त्यांचे याजकबंधू व लेवीबंधू या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली बंदिवासाहून परत आलेले सर्वजण कामास लागले. वीस वर्षे वा अधिक वयाच्या लेव्यांना याहवेहच्या मंदिराची देखरेख करण्यासाठी नेमण्यात आले.

  7. तेव्हा ते जरूब्बाबेल व इतर पुढाऱ्यांकडे आले व म्हणाले, “आपण मिळून काम करू या. कारण तुमच्या परमेश्वराची तुम्हाला जितकी आस्था आहे, तितकीच आम्हालाही आहे. अश्शूरचा राजा एसरहद्दोनने आम्हाला येथे आणल्यापासून आम्ही याहवेहला अर्पणे करीत आहोत.”

  8. पण जरूब्बाबेल, येशूआ व इतर यहूदी पुढार्‍यांनी उत्तर दिले, “तुम्हाला या कामात भाग घेता येणार नाही. पर्शियाचा राजा कोरेशच्या आज्ञेप्रमाणे याहवेह इस्राएलांच्या परमेश्वराचे मंदिर इस्राएली लोकांनीच बांधले पाहिजे.”

  9. मग शल्तीएलचा पुत्र जरूब्बाबेल व योसादाकाचा पुत्र येशूआ यांनी यरुशलेमातील परमेश्वराच्या मंदिराच्या पुनर्बांधणीचे काम सुरू केले. आणि परमेश्वराच्या संदेष्ट्यांनी त्यांच्याबरोबर राहून त्यांना साहाय्य केले.

  10. नबुखद्नेस्सर राजाने परमेश्वराच्या मंदिराची जी सोन्याचांदीची पात्रे यरुशलेमाच्या मंदिरातून काढून नेली व बाबेलच्या मंदिरात ठेवली होती, ती कोरेश राजाने परत केली. ती पात्रे त्याने नेमलेला यहूदाहचा राज्यपाल शेशबस्सरच्या ताब्यात दिली.

  11. “म्हणून शेशबस्सर आला व त्याने यरुशलेमच्या मंदिराची पायाभरणी केली त्या वेळेपासून लोक मंदिराचे बांधकाम करीत आहेत, पण ते अद्यापही पूर्ण झालेले नाही.”

  12. जरूब्बाबेल, येशूआ, नहेम्याह, अजर्‍याह, रामयाह, नहमानी, मर्दखय, बिलशान, मिस्पेरेथ, बिग्वई, नहूम व बाअनाह):

  13. शल्तीएलचा पुत्र जरूब्बाबेल व येशूआसह आलेल्या याजकांची व लेव्यांची यादी पुढीलप्रमाणे आहे: सेरायाह, यिर्मयाह, एज्रा,

  14. म्हणून सर्व इस्राएली जरूब्बाबेल आणि नहेम्याहच्या काळात द्वारपाल, लेवी व संगीतकारांसाठी दररोज अन्नाचा वाटा आणत असत. ते आपल्याला मिळालेल्या हिश्शातील काही भाग इतर लेव्यांसाठी ठेवीत आणि लेवी आपल्यातील वाटा अहरोनाच्या वंशजांसाठी समर्पित करीत असत.

  15. दारयावेश राजाच्या कारकिर्दीच्या दुसर्‍या वर्षी, सहाव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी, याहवेहचे वचन हाग्गय संदेष्ट्याला यहूदीयाचा राज्यपाल, शल्तीएलचा पुत्र जरूब्बाबेल, व प्रमुख याजक, यहोसादाकाचा पुत्र यहोशुआ यांना उद्देशून आला:

  16. तेव्हा यहूदीयाचा राज्यपाल, शल्तीएलचा पुत्र जरूब्बाबेल, आणि यहोसादाकाचा पुत्र यहोशुआ, प्रमुख याजक, आणि देशातील अवशिष्ट लोकांनी त्यांचे परमेश्वर याहवेहच्या वाणीचे व हाग्गयाला मिळालेल्या संदेशाचे पालन केले, कारण त्यांचे परमेश्वर याहवेहनेच त्याला पाठविले होते आणि लोकांना याहवेहचे भय वाटू लागले.

  17. याहवेहने यहूदीयाचा राज्यपाल, शल्तीएलचा पुत्र जरूब्बाबेलच्या आत्म्याला व यहोसादाकाचा पुत्र यहोशुआ, प्रमुख याजकच्या आत्म्याला आणि सर्व अवशिष्ट लोकांच्या आत्म्याला जागृत करून प्रेरित केले. ते आले व त्यांनी त्यांचे परमेश्वर सर्वसमर्थ याहवेहचे भवन बांधण्यास सुरुवात केली.

  18. शल्तीएलचा पुत्र जरूब्बाबेल, यहूदीयाचा राज्यपाल व यहोसादाकाचा पुत्र यहोशुआ, प्रमुख याजक आणि देशातील अवशिष्ट लोकांशी बोल. त्यांना विचार,

  19. परंतु हे जरूब्बाबेला, बलवंत हो. हे प्रमुख याजका यहोशुआ, यहोसादाकाच्या पुत्रा बलवंत हो. या देशातील सर्व लोकहो, बलवंत व्हा आणि कामाला लागा, याहवेह जाहीर करतात. कारण ‘मी तुम्हाबरोबर आहे,’ असे सर्वसमर्थ याहवेह जाहीर करतात.

  20. “यहूदीयाचा राज्यपाल जरूब्बाबेलला सांग, मी आकाश व पृथ्वी हलवून सोडणार आहे.

  21. “ ‘त्या दिवशी माझ्या सेवका,’ सर्वसमर्थ याहवेह म्हणतात, ‘हे शल्तीएलचा पुत्र जरूब्बाबेला, मी तुला माझ्या बोटातील मुद्रेची अंगठी करेन; कारण मी तुला निवडले आहे,’ असे याहवेह जाहीर करतात.”

  22. मग तो मला म्हणाला, “जरूब्बाबेलासाठी याहवेहचा हा संदेश आहे: ‘बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर माझ्या आत्म्याने कार्यसिद्धी होईल,’ असे सर्वसमर्थ याहवेह म्हणतात.

  23. “हे विशाल पर्वता, तू कोण आहेस? जरूब्बाबेलापुढे तू सपाट मैदान असा होशील. मग तो शिखरशिलेस बाहेर आणून प्रचंड गजर करेल, ‘याहवेह आशीर्वादित करो! याहवेह आशीर्वादित करो!’ ”

  24. “जरूब्बाबेलाच्या हस्ते या मंदिराचा पाया घातला; आणि तोच स्वहस्ते ते पूर्ण करेल. तेव्हा तुम्हाला समजेल की सर्वसमर्थ याहवेहने मला तुमच्याकडे पाठविले आहे.

  25. “ही सुरुवात अगदी लहान असली तरी तिला तुच्छ मानण्यास कोण धजावेल, कारण याहवेहचे सात नेत्र संपूर्ण पृथ्वीभर फिरतात व जरूब्बाबेलाच्या हातात शिखरशिला आहे, हे पाहून हर्षाने प्रफुल्लित होतात?”