Skip to content

Cyrus बद्दल बायबलमधील वचने

27 वचने · 2 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. यिर्मयाहने सांगितलेला याहवेहचा संकल्प पूर्ण व्हावा म्हणून पर्शियाचा राजा कोरेशच्या कारकिर्दीच्या पहिल्याच वर्षी पुढील जाहीरनामा लिहून आपल्या संपूर्ण साम्राज्यात पाठवावा अशी इच्छा याहवेहने राजाच्या मनात निर्माण केली.

  2. “पर्शियाचा राजा कोरेश, असे जाहीर करतो की: “ ‘याहवेह, जे स्वर्गाचे परमेश्वर आहेत, त्यांनी पृथ्वीवरील सर्व राज्ये माझ्याकडे दिली आहेत आणि यहूदीयातील यरुशलेमात त्यांचे मंदिर बांधण्यास माझी नियुक्ती केली आहे. तुमच्यातील जे याहवेहचे लोक आहात तुम्ही तिथे वर जाऊ शकता आणि त्यांचे परमेश्वर त्यांच्याबरोबर असोत.’ ”

  3. यिर्मयाहने सांगितलेला याहवेहचा संकल्प पूर्ण व्हावा म्हणून पर्शियाचा राजा कोरेशच्या कारकिर्दीच्या पहिल्याच वर्षी पुढील जाहीरनामा लिहून आपल्या संपूर्ण साम्राज्यात पाठवावा अशी इच्छा याहवेहने राजाच्या मनात निर्माण केली.

  4. “पर्शियाचा राजा कोरेश, असे जाहीर करतो की: “ ‘याहवेह, जे स्वर्गाचे परमेश्वर आहेत, त्यांनी पृथ्वीवरील सर्व राज्ये माझ्याकडे दिली आहेत आणि यहूदीयातील यरुशलेमात त्यांचे मंदिर बांधण्यास माझी नियुक्ती केली आहे.

  5. तुमच्यातील जे याहवेहचे लोक आहेत त्यांनी वर यहूदीयातील यरुशलेमास जाऊन याहवेह इस्राएलचे परमेश्वर, परमेश्वर जे यरुशलेमात आहेत त्यांचे मंदिर बांधावे आणि त्यांचे परमेश्वर त्यांच्याबरोबर असोत.

  6. आणि उरलेले जे यहूदी लोक जिथे कुठे असतील त्यांनी यरुशलेमला जाणार्‍या यहूदी लोकांना सोने, चांदी, अन्य वस्तू आणि पशू, तसेच यरुशलेमातील परमेश्वराच्या मंदिरासाठी स्वैच्छिक अर्पणेही पुरवावी.’ ”

  7. नंतर परमेश्वराने यहूदाह व बिन्यामीन वंशांचे पुढारी आणि लेवी व याजक यांच्या मनामध्ये याहवेहचे मंदिर पुन्हा बांधण्यासाठी यरुशलेमला ताबडतोब जाण्याची उत्कट इच्छा निर्माण केली.

  8. सर्व शेजाऱ्यांनी दिलेल्या स्वेच्छेने दिलेल्या देणग्यांबरोबरच सोने, चांदी, गुरे याशिवाय इतर मोलवान भेटवस्तूही देऊन त्यांची मदत केली.

  9. त्या शिवाय बाबेलच्या नबुखद्नेस्सर राजाने यरुशलेम येथील याहवेहच्या मंदिरातून नेलेल्या ज्या वस्तू आपल्या दैवतांच्या मंदिरात ठेवल्या होत्या, त्या कोरेश राजाने बाहेर काढल्या.

  10. कोरेश राजाने पर्शियाचा खजिनदार मिथ्रदाथला सूचना दिली की त्याने यहूदीयात परतणारा यहूद्यांचा पुढारी शेशबस्सरला सर्व वस्तू मोजून द्याव्या.

  11. यामध्ये पुढील वस्तूंचा समावेश होता: सोन्याच्या पराती 30, चांदीच्या पराती 1,000, चांदीची पात्रे 29,

  12. सोन्याचे कटोरे 30, चांदीचे कटोरे 410, इतर पात्रे 1,000.

  13. अशा एकूण 5,400 सोने व चांदीच्या वस्तू होत्या. या सर्व वस्तू बंदिवासातील लोकांसह शेशबस्सरने बाबेल देशातून यरुशलेमला परत नेल्या.

  14. “बाबेलच्या कोरेश राजाने त्याच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षी हे परमेश्वराचे मंदिर बांधले जावे असा हुकूम केला.

  15. नबुखद्नेस्सर राजाने परमेश्वराच्या मंदिराची जी सोन्याचांदीची पात्रे यरुशलेमाच्या मंदिरातून काढून नेली व बाबेलच्या मंदिरात ठेवली होती, ती कोरेश राजाने परत केली. ती पात्रे त्याने नेमलेला यहूदाहचा राज्यपाल शेशबस्सरच्या ताब्यात दिली.

  16. पाहा, ज्यांना चांदीची पर्वा नाही, आणि जे सोन्यामध्ये आनंद मानत नाहीत त्या मेदिया लोकांना मी त्यांच्याविरुद्ध चिथावणी देईन.

  17. त्यांची धनुष्ये तरुणांना मारून टाकतील; ते तान्ह्या बालकांवर दया करणार नाहीत, किंवा ते लहान मुलांकडे दयेने पाहणार नाहीत.

  18. खास्द्यांच्या राज्यांचे बहुमूल्य रत्न, बाबेलच्या लोकांचा अभिमान आणि गौरव, सदोम आणि गमोराप्रमाणे परमेश्वराकडून उद्ध्वस्त केल्या जाईल.

  19. तिच्यात कोणी कधीही वसती करणार नाही किंवा पिढ्यान् पिढ्या रहिवास करणार नाही; कोणीही अरब त्यांचे तंबू तिथे ठोकणार नाहीत, तिथे कोणीही मेंढपाळ त्यांच्या कळपांना विश्रांती देणार नाहीत.

  20. परंतु अरण्यातील प्राणी तिथे राहतील, तरसानी तिची घरे भरून जातील; तिथे घुबडे राहतील, आणि तिथे बोकडे उड्या मारतील.

  21. तरस प्राणी तिच्या गडांवर वस्ती करतील, कोल्हे तिच्या आलिशान राजवाड्यांमध्ये वस्ती करतील. तिची वेळ फार जवळ आली आहे, आणि तिचे दिवस लांबणार नाहीत.

  22. “त्यांच्या अभिषिक्ताला दिलेला याहवेहचा संदेश, कोरेशने अनेक देश जिंकावे आणि राजांना शस्त्र विरहित करावे यासाठी मी त्याचा उजवा हात धरला आहे. मी त्याच्यासाठी दारे उघडेन; यापुढे या वेशी बंद होणार नाहीत:

  23. हे कोरेशा, मी तुझ्यापुढे चालेन, मी पर्वत जमीनदोस्त करेन आणि कास्याच्या वेशी तोडेन व त्यांच्या लोखंडी सळया कापून टाकेन.

  24. दडवून ठेवलेली भांडारे, गुप्तस्थळी जमा करून ठेवलेली संपत्ती, मी तुला देईन, जेणेकरून तुला तुझ्या नावाने हाक मारणारा, याहवेह इस्राएलचा परमेश्वर मीच आहे हे तुला समजेल.

  25. माझा सेवक याकोबासाठी, माझ्या निवडलेल्या इस्राएलसाठी, तू जरी माझा अधिकार मान्य करत नाही, तरी मी तुला नावाने हाक मारून बोलाविले आणि तुला मानाच्या उपाधीने अलंकृत केले.