Persia बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
तलवारीच्या घातापासून सुटलेल्या लोकांना तो बाबेलला बंदिवासात घेऊन गेला आणि पर्शियाचे राज्य सत्तेवर येईपर्यंत ते त्याचे आणि त्याच्यानंतर येणाऱ्यांचे सेवक झाले.
आणि एज्रा, तुला परमेश्वराने दिलेली सुज्ञता वापरून परमेश्वराच्या नियमाचे पालन करणाऱ्या न्यायाधीश व इतर अधिकारी यांची निवड आणि नेमणूक करावी. हे अधिकारी फरात नदीच्या पश्चिमेकडील भागात न्यायदान करतील. जर त्यांना तुमच्या परमेश्वराचे नियम माहीत नसतील, तर तू ते त्यांना शिकवावे.
यरुशलेमच्या अर्ध्या जिल्ह्याचा अधिकारी हूरचा पुत्र रफायाहने त्यांच्या शेजारच्या तटाची डागडुजी केली.
त्याच्या शेजारी यरुशलेमच्या दुसर्या अर्ध्या जिल्ह्याचा अधिकारी हल्लोहेशचा पुत्र शल्लूमाने व त्याच्या कन्यांनी डागडुजी केली.
त्याच्या पलीकडे अजबुकाचा पुत्र नहेम्याह होता. तो बेथ-सूर जिल्ह्याच्या अर्ध्या भागाचा अधिकारी होता. त्याने दावीद राजाच्या कबरस्तानापर्यंत, कृत्रिम तळ्यापर्यंत आणि वीरांचे गृह या ठिकाणापर्यंत दुरुस्ती केली.
त्याच्या शेजारी लेवी बानीचा पुत्र रहूमच्या देखरेखीखाली डागडुजी करीत होता. त्याच्या शेजारी कईलाह जिल्ह्याच्या अर्ध्या भागाचा अधिकारी हशब्याह होता. त्याने आपल्या जिल्ह्यांच्या वतीने डागडुजी केली.
त्याच्या शेजारी हेनादादचा पुत्र बिनुई च्या देखरेखीखाली लेव्याच्या वंशजांनी डागडुजी केली. हा बवई कईलाह जिल्ह्याच्या दुसर्या अर्ध्या भागाचा अधिकारी होता.
भारतापासून कूशपर्यंत पसरलेल्या व एकशे सत्तावीस प्रांत असलेल्या या विस्तृत साम्राज्याचा बादशहा राजा अहश्वेरोश च्या कारकिर्दीत हे घडले:
आता तुम्ही राजाच्या नावाने यहूद्यांच्या वतीने तुम्हाला योग्य वाटेल तशी दुसरी राजाज्ञा लिहा आणि त्यावर राजाची मोहोर लावा—कारण राजाच्या नावाने लिहिलेले व राजाची मोहोर लावलेले पत्र कधीही रद्द होत नाही.”
पाहा, ज्यांना चांदीची पर्वा नाही, आणि जे सोन्यामध्ये आनंद मानत नाहीत त्या मेदिया लोकांना मी त्यांच्याविरुद्ध चिथावणी देईन.
समुद्राकाठी असलेल्या वाळवंटी प्रदेशाविरुद्ध भविष्यवाणी: ज्याप्रकारे वावटळ दक्षिणेकडील प्रदेशांना झाडून जाते, त्याच प्रकारे हल्ला करणारा वाळवंटी प्रदेशातून, दहशती भूमीमधून येतो.
एक भयानक दृष्टान्त मला दाखविण्यात आला आहे: देशद्रोही विश्वासघात करतो, लूट करणारा लूट घेतो. हे एलाम, आक्रमण करा! मेदिया, वेढा घाला! तिने दिलेले दुःखाचे सर्व विव्हळणे मी संपवून टाकेन.
यामुळे माझ्या शरीराला यातनेने दुखविले आहे, प्रसूत स्त्रीच्या वेदनांप्रमाणे मला वेदनांनी घेरले आहे. जे काही मी ऐकतो, त्यामुळे मी लटपटून जातो, मी जे काही पाहतो, त्यामुळे मी भांबावून जातो.
माझे अंतःकरण अडखळते, भीती मला थरथर कापविते; ज्या संध्याकाळची मी आतुरतेने वाट पाहत असे ती माझ्यासाठी भयप्रद अशी झाली आहे.
ते मेजावर भोजनाची तयारी करतात, ते गालिचे पसरवितात, ते खातात, ते पितात! अहो, अधिकारी, तुम्ही आता उठा, ढालींना तेल लावा!
प्रभू मला असे म्हणत आहेत: “जा, टेहळणी करणारा उभा कर, आणि त्याला जे काही दिसते ते त्याने कळवावे.
जेव्हा तो रथांना घोड्यांच्या ताफ्यासहीत, आणि गाढवावर स्वार असलेले किंवा उंटावर स्वार असलेले पाहतो, तेव्हा त्याने सावध राहावे, पूर्णपणे सावध राहावे.”
त्याप्रमाणे तटावर ठेवलेला पहारेकरी सिंहगर्जना करीत ओरडला, “महाराज, मी दिवसेंदिवस, रात्रीच्या रात्री येथे पहारा करीत राहिलो.
पाहा, एक मनुष्य रथात स्वार होऊन घोड्याच्या ताफ्याबरोबर इकडे येत आहे. आणि तो प्रत्युत्तर देत आहे: ‘बाबेल पडले आहे, ते पडले आहे! तिथे असलेल्या तिच्या दैवतांच्या सर्व मूर्तींचे तुकडे होऊन जमिनीवर पडले आहेत!’ ”
माझे लोक जे खळ्यावर चिरडले गेले आहेत, इस्राएलचे परमेश्वर, सर्वसमर्थ याहवेह यांच्याकडून, मी जे ऐकले आहे ते मी तुम्हाला सांगतो.
यहूदीयाचा राजा सिद्कीयाह, याच्या कारकिर्दीच्या आरंभी एलामविषयी याहवेहकडून हा संदेश यिर्मयाह संदेष्ट्याला प्राप्त झाला.
सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: “मी एलामचा धनुष्य तोडणार आहे, जो त्यांच्या सामर्थ्याचा मुख्य आधार आहे.
मी एलामच्या विरुद्ध चारही दिशातील वार्याला आणेन; ते आकाशाच्या चारही कोपऱ्यातून येतील; मी त्यांना चारही दिशातील वार्यावर पसरवून टाकेन, असे एकही राष्ट्र नसेल जिथे एलामचे निर्वासित नसतील.
जे एलामचा वध करू इच्छितात, त्या त्यांच्या शत्रूदेखत मी पांगापांग करेन; मी त्यांच्यावर अरिष्ट आणेन, माझा भयंकर क्रोधही आणेन,” असे याहवेह जाहीर करतात. “मी त्यांचा समूळ नाश करेपर्यंत त्यांचा तलवारीने पाठलाग करेन.
मी माझे राजासन एलाम येथे स्थापन करेन मी तिचा राजा व तिचे सरदार यांचा नाश करेन. असे याहवेह जाहीर करतात.