Skip to content

Persia बद्दल बायबलमधील वचने: Prophecies concerning

94 वचने · 9 पैलू

Prophecies concerning बद्दल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. पाहा, ज्यांना चांदीची पर्वा नाही, आणि जे सोन्यामध्ये आनंद मानत नाहीत त्या मेदिया लोकांना मी त्यांच्याविरुद्ध चिथावणी देईन.

  2. समुद्राकाठी असलेल्या वाळवंटी प्रदेशाविरुद्ध भविष्यवाणी: ज्याप्रकारे वावटळ दक्षिणेकडील प्रदेशांना झाडून जाते, त्याच प्रकारे हल्ला करणारा वाळवंटी प्रदेशातून, दहशती भूमीमधून येतो.

  3. एक भयानक दृष्टान्त मला दाखविण्यात आला आहे: देशद्रोही विश्वासघात करतो, लूट करणारा लूट घेतो. हे एलाम, आक्रमण करा! मेदिया, वेढा घाला! तिने दिलेले दुःखाचे सर्व विव्हळणे मी संपवून टाकेन.

  4. यामुळे माझ्या शरीराला यातनेने दुखविले आहे, प्रसूत स्त्रीच्या वेदनांप्रमाणे मला वेदनांनी घेरले आहे. जे काही मी ऐकतो, त्यामुळे मी लटपटून जातो, मी जे काही पाहतो, त्यामुळे मी भांबावून जातो.

  5. माझे अंतःकरण अडखळते, भीती मला थरथर कापविते; ज्या संध्याकाळची मी आतुरतेने वाट पाहत असे ती माझ्यासाठी भयप्रद अशी झाली आहे.

  6. ते मेजावर भोजनाची तयारी करतात, ते गालिचे पसरवितात, ते खातात, ते पितात! अहो, अधिकारी, तुम्ही आता उठा, ढालींना तेल लावा!

  7. प्रभू मला असे म्हणत आहेत: “जा, टेहळणी करणारा उभा कर, आणि त्याला जे काही दिसते ते त्याने कळवावे.

  8. जेव्हा तो रथांना घोड्यांच्या ताफ्यासहीत, आणि गाढवावर स्वार असलेले किंवा उंटावर स्वार असलेले पाहतो, तेव्हा त्याने सावध राहावे, पूर्णपणे सावध राहावे.”

  9. त्याप्रमाणे तटावर ठेवलेला पहारेकरी सिंहगर्जना करीत ओरडला, “महाराज, मी दिवसेंदिवस, रात्रीच्या रात्री येथे पहारा करीत राहिलो.

  10. पाहा, एक मनुष्य रथात स्वार होऊन घोड्याच्या ताफ्याबरोबर इकडे येत आहे. आणि तो प्रत्युत्तर देत आहे: ‘बाबेल पडले आहे, ते पडले आहे! तिथे असलेल्या तिच्या दैवतांच्या सर्व मूर्तींचे तुकडे होऊन जमिनीवर पडले आहेत!’ ”

  11. माझे लोक जे खळ्यावर चिरडले गेले आहेत, इस्राएलचे परमेश्वर, सर्वसमर्थ याहवेह यांच्याकडून, मी जे ऐकले आहे ते मी तुम्हाला सांगतो.

  12. यहूदीयाचा राजा सिद्कीयाह, याच्या कारकिर्दीच्या आरंभी एलामविषयी याहवेहकडून हा संदेश यिर्मयाह संदेष्ट्याला प्राप्त झाला.

  13. सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: “मी एलामचा धनुष्य तोडणार आहे, जो त्यांच्या सामर्थ्याचा मुख्य आधार आहे.

  14. मी एलामच्या विरुद्ध चारही दिशातील वार्‍याला आणेन; ते आकाशाच्या चारही कोपऱ्यातून येतील; मी त्यांना चारही दिशातील वार्‍यावर पसरवून टाकेन, असे एकही राष्ट्र नसेल जिथे एलामचे निर्वासित नसतील.

  15. जे एलामचा वध करू इच्छितात, त्या त्यांच्या शत्रूदेखत मी पांगापांग करेन; मी त्यांच्यावर अरिष्ट आणेन, माझा भयंकर क्रोधही आणेन,” असे याहवेह जाहीर करतात. “मी त्यांचा समूळ नाश करेपर्यंत त्यांचा तलवारीने पाठलाग करेन.

  16. मी माझे राजासन एलाम येथे स्थापन करेन मी तिचा राजा व तिचे सरदार यांचा नाश करेन. असे याहवेह जाहीर करतात.

  17. “तरी येत्या दिवसात मी एलामची समृद्धी परत आणेन,” याहवेह जाहीर करतात.

  18. “बाणांना धार लावा, ढाली उचलून घ्या! याहवेहनी मेदियाच्या राजाला प्रेरित केले आहे, कारण त्यांचा हेतू बाबेलचा नाश करण्याचा आहे. याहवेह बाबेल्यांचा सूड उगवतील, हा त्यांच्या मंदिराबद्दलचा सूड आहे.

  19. बाबेलच्या तटबंदीविरुद्ध तुमचे झेंडे उंच करा! पहारेकऱ्यांची कुमक पाठवून मजबूत करा, पहारेकऱ्यांना स्थानबद्ध करा, दबा धरून बसण्याची तयारी करा! याहवेहनी बाबेलच्या लोकांविरुद्ध दिलेल्या फर्मानाचा हेतू ते सिद्धीस नेतील.

  20. तुम्ही, जे बऱ्याच जलाशयाकाठी वास करता, आणि अतिसंपन्न आहात, तुमचा अंत जवळ आला आहे, तुमचा नाश होण्याचा समय आला आहे.

  21. सर्वसमर्थ याहवेह, स्वतःच्याच नावाची शपथ घेतातः मी निश्चितच तुम्हाला टोळधाडीसारख्या असंख्य सैनिकांनी भरून टाकेन आणि लोक तुमच्यावरील विजयोन्मादाने गर्जना करतील.

  22. “त्यांनी त्यांच्या सामर्थ्याने पृथ्वीची निर्मिती केली; संपूर्ण विश्वाची प्रस्थापना त्यांच्या सुज्ञतेने केली आणि त्यांच्या बुद्धीने आकाश विस्तीर्ण केले.

  23. जेव्हा ते गर्जना करतात, तेव्हा आकाशातील मेघ गर्जना करतात; ते मेघांना पृथ्वीच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत उभारतात. ते विजा आणि पाऊस पाठवितात आणि त्यांच्या भांडारातून वारा बाहेर काढतात.

  24. “प्रत्येक मनुष्य असमंजस व ज्ञानहीन आहे; प्रत्येक सोनार त्याच्या मूर्तींनी लज्जित झाला आहे. त्याने घडविलेल्या प्रतिमा खोट्या आहेत. त्यांच्यामध्ये श्वास नाही.

  25. त्या व्यर्थ असून उपहासाचा विषय आहेत; जेव्हा त्यांचा न्याय होईल, तेव्हा त्यांचा नाश होईल.