Skip to content

Persia बद्दल बायबलमधील वचने

117 वचने · 9 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. दारयावेश राजाने आपल्या मर्जीनुसार आपल्या संपूर्ण साम्राज्यात राज्य करण्यासाठी 120 प्रांताधिकारी नियुक्त करावे,

  2. व त्यांच्यावर तीन अध्यक्षांची नेमणूक करण्यात आली होती, ज्यामध्ये दानीएल एक होता. राजाला कोणत्याच प्रकारची हानी होऊ नये म्हणून प्रांताधिकार्‍यांनी त्यांना हिशोब द्यावा.

  3. दानीएल हा अध्यक्ष व प्रांताधिकारी यांच्यापेक्षा त्याच्या विलक्षण गुणांमुळे सरस असल्यामुळे शासक म्हणून त्यालाच संपूर्ण साम्राज्यावर नेमावे अशी राजाची योजना होती.

  4. यामुळे अध्यक्ष आणि प्रांताधिकारी दानीएलविरुद्ध राज्य कारभारातील दोष शोधण्याचा प्रयत्न करू लागले. त्यांना त्याच्यामध्ये कोणताही भ्रष्टाचार आढळला नाही, कारण तो विश्वासू होता आणि तो भ्रष्ट नव्हता किंवा निष्काळजीपणाही करीत नव्हता.

  5. शेवटी हे लोक म्हणाले, “आम्हाला दानीएलाविरुद्ध त्याच्या परमेश्वराच्या नियमाशिवाय कोणत्याही बाबतीत आरोपाचे कारण सापडणार नाही.”

  6. तेव्हा अध्यक्ष आणि प्रांताधिकारी हे राजाकडे गेले आणि म्हणाले, “दारयावेश महाराज चिरायू होवोत!

  7. आम्ही सर्वांनी म्हणजे अध्यक्ष, राज्यपाल, मंत्री नायब यांनी एकमताने ठरविले आहे की, महाराजांनी एक फर्मान काढावे व त्याचे पालन करण्यात यावे, त्यानुसार येणार्‍या तीस दिवसांमध्ये कोणीही, महाराजांऐवजी इतर कोणत्याही देवाकडे किंवा मनुष्याकडे प्रार्थना करेल, तर त्याला सिंहाच्या गुहेत टाकावे.

  8. तर आता महाराज, या फर्मानावर शिक्कामोर्तब करा आणि ते लिखित स्वरुपात द्या म्हणजे ते बदलता येणार नाही—म्हणजे मेदिया व पारसीच्या कायद्यानुसार जो रद्द करता येणार नाही.”

  9. तेव्हा दारयावेश राजाने या फर्मानावर सही केली.

  10. जेव्हा दानीएलला हे फर्मान निघाल्याचे समजले, तेव्हा तो घरी गेला व माडीवर खोलीत गेला. या खोलीच्या खिडक्या यरुशलेमच्या दिशेकडे उघडलेल्या होत्या. आपल्या नित्याच्या रिवाजाप्रमाणे दिवसातून तीन वेळा त्याने गुडघे टेकून प्रार्थना केली आणि त्याच्या परमेश्वराचे आभार मानले.

  11. नंतर हे लोक त्याच्या घरी जमावाने आले आणि त्यांनी दानीएलला परमेश्वराला प्रार्थना करताना व मदत मागताना पाहिले.

  12. मग ते राजाकडे गेले आणि त्याच्यासोबत त्याच्या फर्मानाबद्दल बोलले: तुम्ही फर्मान काढले नाही काय की येणार्‍या तीस दिवसांमध्ये कोणीही, महाराजांऐवजी इतर कोणत्याही देवाकडे किंवा मनुष्याकडे प्रार्थना करेल, तर त्याला सिंहाच्या गुहेत टाकण्यात यावे? राजाने उत्तर दिले, “हे फर्मान कायम आहे—मेदिया व पारसीच्या कायद्यानुसार जो रद्द करता येणार नाही.”

  13. मेदिया राजा दारयावेशच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षी, त्याला साहाय्य करण्यास आणि संरक्षण देण्यास मी उभा राहिलो.)

  14. “आता मी तुला सत्य सांगतो: आता पुढे घडणार्‍या गोष्टींचा दृष्टान्त मी तुला दाखवितो. पर्शियात आणखी तीन राजे उदयास येतील आणि मग चौथा राजा जो सर्वांहून अतिशय धनवान असेल. तो धनसंपत्तीने प्रबळ झाला म्हणजे तो सर्वांना ग्रीसच्या राज्याविरुद्ध उठवेल.

  15. तेव्हा आणखी एक पराक्रमी राजा उदयास येईल, जो महान पराक्रमाने राज्य करेल आणि त्याला वाटेल त्याप्रमाणे तो करेल.

  16. त्याचा उदय झाल्यानंतर त्याचे राज्य भंग पावेल आणि चार दिशांत त्याची विभागणी होईल. हे त्याच्या वंशजांकडे जाणार नाही किंवा ज्या सामर्थ्याने त्याने राज्य केले ते त्यांच्याकडे नसेल, कारण त्याचे साम्राज्य उपटले जाईल आणि ते दुसर्‍यांना दिले जाईल.

  17. शोमरोनच्या लोकांनी त्यांचा दोष वाहिलाच पाहिजे, कारण त्यांनी त्यांच्या परमेश्वराविरुद्ध बंड केले. ते तलवारीने पडतील; त्यांची बालके जमिनीवर आपटली जातील, आणि त्यांच्या गर्भवती स्त्रियांना चिरून टाकण्यात येईल.”