Skip to content

Persia बद्दल बायबलमधील वचने

117 वचने · 9 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. बाबेलवर जी भयंकर अरिष्टे येणार होती, ती यिर्मयाहने एका गुंडाळीवर लिहिली—बाबेलवर येणाऱ्या सर्व अरिष्टांची नोंद करून ठेवण्यात आली होती.

  2. यिर्मयाह सेरायाहाला म्हणाला, “तू बाबिलोन येथे गेल्यावर मी लिहिलेले सर्व मोठ्याने वाच.

  3. मग म्हण, ‘हे याहवेह, तुम्ही म्हटले की तुम्ही बाबेलचा नाश कराल व तिथे कोणीही मनुष्य वा पशूप्राणी वसती करणार नाही; ती कायमची ओसाड होईल.’

  4. मग तू ही गुंडाळी वाचून संपवलीस की तिला एक दगड बांधून ती फरात नदीत फेकून दे.

  5. आणि म्हण, ‘बाबेलही अशीच बुडेल व पुन्हा कधीही वर येणार नाही, कारण मी तिच्यावर अरिष्ट आणणार आहे, आणि तिच्यामधील लोक पडतील.’ ” इथे यिर्मयाहच्या संदेशाचा शेवट होतो.

  6. “ ‘पर्शिया, लूद आणि पूत व कूशच्या माणसांनी तुझ्या सैन्यात योद्धे म्हणून सेवा केली. त्यांनी त्यांच्या ढाली व शिरटोप तुझ्या भिंतीवर टांगून तुला वैभवी बनविले.

  7. “एलाम तिथे आहे आणि तिच्याबरोबर तिचे मोठे सैन्य तिच्या कबरेभोवती आहेत. त्या सर्वांचा वध झाला आहे, ते तलवारीने पडले आहेत. ज्या सर्वांनी जिवंताच्या भूमीवर आतंक पसरविला ते पृथ्वीच्या खाली बेसुंत्यांबरोबर अधोलोकात गेले आहेत. जे खाली गर्तेत गेले आहेत, त्यांच्याबरोबर ते लज्जित झाले आहेत.

  8. वधलेल्यांबरोबर तिचा बिछाना केलेला आहे आणि तिचे सैन्य तिच्या कबरेभोवती आहेत. ज्यांना तलवारीने वधले आहे, ते सर्व बेसुंती आहेत, कारण जिवंतांच्या भूमीवर त्यांचा आतंक पसरला होता. जे खाली गर्तेत गेले आहेत त्यांच्याबरोबर ते लज्जित झाले आहेत; वधलेल्यांबरोबर त्यांना ठेवले आहे.

  9. पर्शिया, कूश आणि पूट हे सर्व त्यांच्या ढाली व शिरटोप यासह त्यांच्याबरोबर असतील.

  10. “महाराज, तुम्ही पाहिले की तुमच्यापुढे एक प्रचंड पुतळा उभा आहे—एक प्रचंड, चकाकदार पुतळा, दिसण्यात अद्भुत.

  11. त्या पुतळ्याचे डोके शुद्ध सोन्याचे होते, त्याची छाती व दंड चांदीचे होते, त्याचे पोट व मांड्या कास्याच्या होत्या,

  12. त्याचे पाय लोखंडाचे होते आणि पावले लोखंडाची व त्यात काही अंश मातीचा होता.

  13. तुम्ही पहात असताना, एका खडकाने कोणताही मानवी स्पर्श न होता स्वतःला छेदले आणि त्या मूर्तीच्या लोखंडी आणि मातीच्या पायावर अशा प्रकारे आदळले की त्याचा चुराडा झाला.

  14. मग लोखंड, माती, कास्य, चांदी आणि सोने यांचे तुकडे तुकडे झाले आणि ते उन्हाळ्यात खळ्यातील भुशाप्रमाणे झाले. वाऱ्याने त्यांना अशा प्रकारे उडवून दिले की त्यांचा एक छोटासा तुकडाही शिल्लक राहिला नाही. पण ज्या दगडाने पुतळा उलथून टाकला, त्या दगडाचा एक प्रचंड डोंगर झाला व त्याने सर्व पृथ्वी झाकून टाकली.

  15. “हे आपले स्वप्न आणि आता त्याचा अर्थ महाराजासाठी सांगतो.

  16. महाराज, आपण राजाधिराज आहात. स्वर्गाच्या परमेश्वरानेच आपणाला हे राज्य, सत्ता, सामर्थ्य आणि वैभव दिले आहे;

  17. आपल्या हाताखाली त्यांनी सर्व मनुष्यप्राणी, भूमीवरील प्राणी आणि आकाशातील पक्षी निर्माण केले आहेत. ते जिथे कुठेही राहतात, त्यांनी तुम्हाला त्यांचा अधिपती म्हणून नियुक्त केले आहे. ते सोन्याचे मस्तक म्हणजे आपण स्वतःच आहात.

  18. “तुमच्यानंतर आणखी एक राज्य उदयास येईल जे तुमच्या राज्यापेक्षा कमी दर्जाचे असेल. त्यानंतर, तिसरे राज्य उदयास येईल, एक कास्याची प्रतिमा, जी संपूर्ण पृथ्वीवर राज्य करेल.

  19. शेवटी, एक चौथे राज्य असेल जे लोखंडासारखे मजबूत असेल—कारण लोखंड सर्व गोष्टींचे तुकडे करतो आणि चुराडा करतो—आणि लोखंड ज्याप्रमाणे गोष्टींचे तुकडे करेल, त्याचप्रमाणे हे राज्य त्याचे तुकडे करून चुराडा करेल.

  20. जसे तुम्ही पाहिले की पाय आणि बोटे काही प्रमाणात भाजलेल्या मातीची होती आणि काही प्रमाणात लोखंडाची होती, म्हणून ते एक विभाजित राज्य असेल; तरीही त्यात काही लोखंडी ताकद असेल, जसे तुम्ही लोखंड मातीत मिसळलेले पाहिले.

  21. काही लोखंड व काही माती यांनी बनलेली पावले आणि बोटे आपल्याला दिसली म्हणजेच हे साम्राज्य काही मजबूत व काही दुबळी असतील.

  22. आणि जसे तुम्ही लोखंडाला भाजलेल्या मातीत मिसळलेले पाहिले, तसे लोक मिसळले जातील, पण एकरूप होणार नाहीत, कारण लोखंड मातीत मिसळत नाही.

  23. “त्या राजांच्या काळात, स्वर्गातील परमेश्वर एक राज्य स्थापन करतील, ज्याचा नाश होणार नाही किंवा इतर कोणीही त्याच्यावर राज्य करू शकणार नाही. हे त्या सर्व राज्यांना चिरडून टाकेल आणि त्यांचा नाश करेल, परंतु ते स्वतःच कायम टिकून राहील.

  24. हा त्या खडकाच्या दृष्टान्ताचा अर्थ आहे, जो मनुष्याच्या हातून नव्हता, परंतु स्वतः एका पर्वतापासून तो खडका वेगळा झाला होता—ज्याने लोखंड, कास्य, माती, चांदी आणि सोने यांचा सर्वांचा चुराडा केला होता. “महान परमेश्वराने महाराजांना भविष्यात काय घडणार आहे हे दाखवून दिले. हे स्वप्न खरे आहे आणि त्याचा अर्थ विश्वास ठेवण्यालायक आहे.”

  25. “फारसीन: आपल्या राज्याचे दोन भाग करण्यात आले आहे आणि मेदिया व पर्शियन यांना देण्यात आले आहेत.”