मुख्य मजकुरावर जा

Genealogy बद्दल बायबलमधील वचने

114 वचने · 8 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. योआबाच्या कुळातील: यहीएलाचा पुत्र ओबद्याह व इतर 218 पुरुष;

  2. बानीच्या कुळातील: योसिफ्याचा पुत्र शेलोमीथ व इतर 160 पुरुष;

  3. बेबाई कुळातील: बेबाईचा पुत्र जखर्‍याह व इतर 28 पुरुष;

  4. अजगादाच्या कुळातील: हक्काटानाचा पुत्र योहानान व इतर 110 पुरुष;

  5. अदोनिकामच्या कुळातील: शेवटचे लोक ज्यांची नावे एलिफेलेत, ईयेल व शमायाह होते, आणि त्यांच्याबरोबर इतर 60 पुरुष;

  6. बिग्वईच्या कुळातील: ऊथय व जक्कूर आणि इतर 70 पुरुष.

  7. अहवाकडे जाणाऱ्या कालव्याजवळ मी सर्वांना एकत्र केले आणि तिथे तीन दिवस आम्ही तळ दिला. तिथे आलेल्या लोकांची व याजकांची पाहणी केली, तेव्हा लेवी वंशातील कोणीही मला आढळला नाही.

  8. अब्राहामाचा पुत्र दावीदाचा पुत्र, येशू ख्रिस्ताची ही वंशावळी:

  9. अब्राहाम इसहाकाचा पिता होता, इसहाक याकोबाचा पिता, याकोब यहूदाह व त्याच्या भावांचा पिता होता,

  10. यहूदाह पेरेस व जेरहचा पिता, त्यांची आई तामार होती. पेरेस हेस्रोनचा पिता, हेस्रोन अरामचा पिता,

  11. अराम अम्मीनादाबाचा पिता, अम्मीनादाब नहशोनाचा पिता, नहशोन हा सल्मोनाचा पिता,

  12. सल्मोन बवाजाचा पिता व त्याची आई राहाब होती, बवाज ओबेदाचा पिता, ओबेदची आई रूथ होती, ओबेद इशायाचा पिता,

  13. इशाय दावीद राजाचा पिता, दावीद शलोमोनाचा पिता, शलोमोनाची आई पूर्वी उरीयाहची पत्नी होती,

  14. शलोमोन रहबामाचा पिता, रहबाम अबीयाचा पिता, अबीया आसाचा पिता,

  15. आसा यहोशाफाटाचा पिता, यहोशाफाट योरामाचा पिता, योराम उज्जीयाहचा पिता,

  16. उज्जीयाह योथामाचा पिता, योथाम आहाजाचा पिता, आहाज हिज्कीयाचा पिता,

  17. हिज्कीयाह मनश्शेहचा पिता, मनश्शेह आमोनाचा पिता, आमोन योशीयाहचा,

  18. योशीयाह यखन्या व त्यांच्या भावांचा पिता होता, हे बाबेलमध्ये हद्दपार केले तेव्हा झाले.

  19. बाबेलमध्ये हद्दपार झाल्यावर: यखन्या शल्तीएलचा पिता, शल्तीएल जरूब्बाबेलाचे पिता,

  20. जरूब्बाबेल अबीहूदचा पिता, अबीहूद एल्याकीमचा पिता, एल्याकीम अज्जूरचा पिता,

  21. अज्जूर सादोकाचा पिता, सादोक याखीमचा पिता, याखीम एलीहूदाचा पिता,

  22. एलीहूद एलअज़ाराचा पिता, एलअज़ार मत्तानाचा पिता, मत्तान याकोबाचा पिता,

  23. याकोब योसेफाचा पिता, योसेफ मरीयेचा पती होता; मरीया, ज्यांना ख्रिस्त म्हणत त्या येशूची आई होती.

  24. येशूंनी आपले कार्य सुरू केले, त्यावेळी ते सुमारे तीस वर्षांचे होते. त्यांच्या वडिलांचे नाव योसेफ आहे, असे लोक समजत असत. योसेफ हा एलीचा पुत्र होता.

  25. एली हा मत्ताथाचा पुत्र, तो लेवीचा पुत्र, तो मल्खीचा पुत्र, तो यन्नयाचा पुत्र, तो योसेफाचा पुत्र,