The Altar of Burnt Offering बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
“बाभळीच्या लाकडाची वेदी तयार करावी, ती तीन हात उंच, पाच हात लांब व पाच हात रुंद असून ती चौकोनी असावी.
तिच्या चार कोपर्यांना प्रत्येकी एक शिंग बनवावे, शिंगे व वेदी अखंड असावी. वेदीला कास्याचे आवरण द्यावे.
वेदीवरील सर्व पात्रे, म्हणजेच राख उचलून नेण्याची भांडे, फावडे, शिंपडण्याचे भांडे, मांसाचे काटे आणि अग्निपात्रे कास्याचे असावीत.
तिच्यासाठी कास्याची जाळी तयार करावी आणि जाळीच्या चारही बाजूला कास्याच्या चार कड्या तयार कराव्या.
वेदीच्या काठाखाली ती अशाप्रकारे ठेवावी की ती वेदीच्या अर्ध्या उंचीपर्यंत यावी.
वेदीसाठी बाभळीच्या लाकडाचे दांडे तयार करून त्यांना कास्याचे आवरण द्यावे.
दांडे कड्यात असे घालावेत की, वेदी वाहून नेताना ते तिच्या दोन बाजूंनी असतील.
फळ्या लावून वेदी आतून पोकळ बनवावी. ती तुला पर्वतावर दाखविल्याप्रमाणेच बनवावी.”
गोर्ह्याचे थोडे रक्त घेऊन ते तू आपल्या बोटांनी वेदीच्या शिंगांवर लावावे व शिल्लक राहिलेले रक्त वेदीच्या पायथ्याशी ओतावे.
पापार्पण म्हणून दररोज तू एक गोर्हा प्रायश्चित्तासाठी अर्पण करावा. वेदीसाठी प्रायश्चित्त करून ती शुद्ध करावी व ती पवित्र करण्यासाठी तिला अभिषेक करावा.
सात दिवस वेदीसाठी प्रायश्चित करून ती पवित्र करावी. मग वेदी परमपवित्र होईल व ज्या कशाचा वेदीला स्पर्श होईल ते पवित्र होईल.
“दररोज तू वेदीवर जे अर्पण करावयाचे आहे ते हे: एक वर्षाची दोन कोकरे.
एक कोकरू सकाळी व दुसरे संध्याकाळी अर्पण करावे.
पहिल्या कोकराबरोबर कुटून काढलेल्या जैतुनाच्या एक पाव हीन तेलात मळलेल्या पिठाचा एक एफाचा दहावा भाग आणि पेयार्पण म्हणून एक पाव हीन द्राक्षारस अर्पण करावे.
संध्याकाळी दुसरे कोकरू सकाळच्या अर्पणाप्रमाणे धान्यार्पण व पेयार्पण यासहित अर्पण करावे. हे अन्नार्पण याहवेहसाठी सुवासिक अर्पण आहे.
“हे होमार्पण येणार्या पिढ्यान् पिढ्या पर्यंत, याहवेहसाठी सभामंडपाच्या प्रवेशद्वारात नित्य करावे. तिथे मी तुला भेटेन व तुझ्याशी बोलेन.
“तर मी सभामंडप व वेदी पवित्र करेन आणि अहरोन व त्याचे पुत्र यांना याजक म्हणून माझी सेवा करावी यासाठी पवित्र करेन.
त्यांनी बाभळीच्या लाकडाची होमार्पणाची वेदी तयार केली. ती तीन हात उंच, पाच हात लांब, पाच हात रुंद असून चौकोनी होती.
मग त्यांनी वेदीच्या चार कोपर्यांना प्रत्येकी एक शिंग बनविले, शिंगे व वेदी अखंड बनविली व वेदीला कास्याचे आवरण घातले.
वेदीची सर्व पात्रे, म्हणजे त्याचे भांडे, फावडे, शिंपडण्याचे भांडे, मांसाचे काटे आणि अग्निपात्रे कास्याचे बनविले.
त्यांनी वेदीसाठी कास्याच्या जाळीची चाळण तयार केली, जी वेदीच्या काठाखाली वेदीच्या अर्ध्या उंचीपर्यंत होती.
त्यांनी कास्याच्या चाळणीच्या चार कोपर्यांना दांडे अडकविण्यासाठी ओतीव कास्याच्या कड्या तयार केल्या.
त्यांनी बाभळीच्या लाकडाचे दांडे तयार करून त्यांना कास्याचे आवरण घातले.
त्यांनी ते दांडे कड्यात अडकविले, म्हणजे वेदी वाहून नेताना दांडे वेदीच्या दोन बाजूंनी असतील. वेदी लाकडाची असून ती आतून पोकळ बनविली.
कास्याची वेदी व तिची कास्याची जाळी, तिचे दांडे व तिचे सर्व साहित्य; गंगाळ व त्याची बैठक;