मुख्य मजकुरावर जा

The Altar of Burnt Offering बद्दल बायबलमधील वचने

150 वचने · 30 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. होमार्पण व त्याबरोबर अन्नार्पणासाठी एकूण बारा तरुण बैल, बारा गोर्‍हे, एक वर्षाची बारा नरकोकरे होती. बारा बोकडे पापार्पणांसाठी वापरण्यात आली.

  2. शांत्यर्पणासाठी एकूण चोवीस बैल, साठ गोर्‍हे, साठ बोकडे व एक वर्षांची साठ नरकोकरे आणली होती.

  3. जेव्हा मोशे याहवेहशी बोलण्यासाठी सभामंडपात गेला, तेव्हा कराराच्या नियमाच्या कोशावर असलेल्या प्रायश्चिताच्या झाकणावरून, दोन करुबांमधून त्याच्याशी बोलत असलेली वाणी त्याने ऐकली. अशाप्रकारे याहवेह त्याच्याशी बोलले.

  4. ते तुला जबाबदार असणार व त्यांनी मंडपातील सर्व कर्तव्ये पार पाडावीत, परंतु त्यांनी पवित्रस्थानाच्या पात्रांजवळ किंवा वेदीजवळ जाऊ नये. नाहीतर ते व तुम्हीही मृत व्हाल.

  5. परंतु वेदी व आतील पडद्यासंबंधी केवळ तू व तुझ्या पुत्रांनीच याजक म्हणून पवित्रस्थानातील पडद्यामागील आणि वेदीवरील पवित्र सेवा करावी. याजकपणाची सेवा मी तुला भेट म्हणून देत आहे. इतर कोणीही जे पवित्रस्थानाच्या जवळ येतील त्यांना जिवे मारावे.”

  6. त्याच दिवशी राजाने याहवेहच्या मंदिरापुढच्या द्वारमंडपाचा मधला भाग पवित्र केला आणि तिथे त्याने होमार्पणे, धान्यार्पणे व शांत्यर्पणाची मांदे ही अर्पण केली, कारण याहवेहपुढे जी कास्याची वेदी होती ती होमार्पणे, धान्यार्पणे व शांत्यर्पणाची मांदे यासाठी फार लहान होती.

  7. मग आहाज राजा तिग्लथ-पिलेसर अश्शूरच्या राजाला भेटावयास दिमिष्क येथे गेला. त्याने दिमिष्क येथे एक वेदी पाहिली आणि त्याने, तिचा आकार व आराखडा तयार करून तो उरीयाह याजकाकडे पाठवून दिला.

  8. आहाज राजाने दिमिष्क येथून पाठविलेल्या सर्व आराखड्यानुसार उरीयाह याजकाने एक वेदी बांधली आणि राजा आहाज परत येण्यापूर्वी ती पूर्ण केली.

  9. जेव्हा राजा दिमिष्क येथून परत आला आणि त्याने वेदी पाहिली, तो वेदीजवळ गेला आणि त्यावर त्याने अर्पण सादर केले.

  10. त्याने वेदीवर त्याचे होमार्पण आणि अन्नार्पण अर्पण केले, त्याने आपले पेयार्पण अर्पण ओतले, आणि शांत्यर्पणाचे रक्त वेदीवर शिंपडले.

  11. मग त्याने कास्य वेदी जी याहवेहच्या समोर होती, ती त्याने मंदिराच्या पुढून आणली—नवीन वेदी आणि याहवेहच्या मंदिराच्या मधून आणली—आणि नवीन वेदीच्या उत्तरेस ठेवली.

  12. मग आहाज राजाने उरीयाह याजकाला हे आदेश दिले: “या नव्या मोठ्या वेदीवर सकाळचे होमार्पण, संध्याकाळचे अन्नार्पण, राजाची होमार्पण, अन्नार्पण आणि देशातील सर्व लोकांची होमार्पण, आणि त्यांची पेयार्पण ही अर्पण करीत जा. होमार्पणाचे सर्व रक्त आणि यज्ञाचे सर्व रक्त या वेदीवर शिंपडावे. कास्याची जुनी वेदी माझ्यासाठी शकुन पाहण्यासाठी असावी.”

  13. आहाज राजाने आदेश दिल्याप्रमाणे उरीयाह याजकाने केले.

  14. तेव्हा मी परमेश्वराच्या वेदीजवळ जाईन, तेच परमेश्वर जे माझे परमानंद आहेत; आणि तिथे हे परमेश्वरा, माझ्या परमेश्वरा, वीणेवर मी तुमची स्तुतिस्तोत्रे गाईन.

  15. याहवेहच परमेश्वर आहेत; त्यांनी त्यांचा प्रकाश आमच्यावर टाकला आहे. डहाळ्या हातात घेऊन वेदीच्या शिंगापर्यंत जाण्यासाठी मिरवणुकीत सामील व्हा.

  16. अशांना मी माझ्या पवित्र पर्वतावर आणेन आणि माझ्या प्रार्थना मंदिरामध्ये त्यांना आनंदित करेन. त्यांच्या होमार्पणे व अर्पणांचा माझ्या वेदीवर स्वीकार केला जाईल; कारण माझ्या घराला सर्व राष्ट्रांसाठी प्रार्थनेचे घर असे म्हणतील.”

  17. “तुम्ही माझ्या वेदीवर भ्रष्ट अर्पणे आणता तेव्हा. “परंतु तुम्ही विचारता, ‘आम्ही तुम्हाला कसे अमंगळ केले?’ “याहवेहचा मेज तुच्छ आहे असे तुमच्या म्हणण्याने.

  18. जेव्हा तुम्ही वेदीवर आंधळे पशू अर्पण करता, हे चुकीचे नाही काय? जेव्हा तुम्ही वेदीवर लंगडे वा रोगट पशू अर्पण करता, हे चुकीचे नाही काय? हे अर्पण तुम्ही आपल्या राज्यपालांना करून पाहा! ते तुमच्यावर प्रसन्न होतील का? ते तुमचा स्वीकार करतील का?” सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात.

  19. दुसरी गोष्ट तुम्ही ही करता: तुम्ही याहवेहच्या वेदीवर अश्रूंचा पूर वाहता. तुम्ही रडता व आक्रोश करता, कारण ते तुमच्या हातातील अर्पणांवर कृपादृष्टी टाकत नाहीत व प्रसन्नतेने त्यांचा स्वीकार करीत नाहीत.

  20. “यास्तव, जर तुम्ही वेदीवर भेट अर्पण करीत असाल आणि तिथे तुम्हाला आठवले की, तुझ्या बंधू किंवा भगिनीच्या मनात तुमच्याविरुद्ध काहीतरी आहे,

  21. तर तुमची भेट तिथेच वेदीपुढे ठेवा. आधी जाऊन त्यांच्याबरोबर समेट करा आणि मग येऊन आपली भेट अर्पण करा.

  22. तुम्ही असेही म्हणता, ‘मंदिरातील वेदीची शपथ घेतली आणि ती मोडली तरी चालेल,’ पण वेदीवरील दानाची शपथ घेतली तर तो त्यास बंधनकारक आहे.

  23. अहो आंधळ्यांनो, ती देणगी श्रेष्ठ आहे की त्या देणगीला पवित्र करणारी वेदी श्रेष्ठ आहे?

  24. जे मंदिरात सेवा करणारे आहेत त्यांना मंदिरातून अन्न मिळते आणि वेदीवर सेवा करणारे, वेदीवर अर्पण केलेल्या अर्पणाचा वाटा घेतात हे तुम्हाला माहीत नाही काय?

  25. आपली एक वेदी आहे, तेथील काही खाण्याचा, मंडपात जे सेवा करतात त्यांना अधिकार नाही.